• Download App
    इस्राईलमधील ब्लू फ्लॅग २०२१ या हवाई सरावात मध्ये भारताचाही समावेश |India is part of Blue flag exersice

    इस्राईलमधील ब्लू फ्लॅग २०२१ या हवाई सरावात मध्ये भारताचाही समावेश

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली – इस्राईलमध्ये सध्या ‘ब्लू फ्लॅग २०२१’ हा आंतरराष्ट्रीय हवाई सराव सुरू असून त्या सरावामध्ये भारताबरोबर जर्मनी, इटली, ब्रिटन, फ्रान्स, ग्रीस आणि अमेरिकेच्या हवाई दलांच्या तुकड्या सहभागी झाल्या आहेत.India is part of Blue flag exersice

    या सरावात सात देशांतील चौथ्या आणि पाचव्या पिढीतील लढाऊ विमानांचा सहभाग आहे. दर दोन वर्षांनी या सरावाचे आयोजन केले जाते. यंदाचा सराव सर्वात अत्याधुनिक आणि मोठा आहे. इस्राईलच्या स्थापनेनंतर तेथे प्रथमच ब्रिटिश हवाई दलाचे पथक, भारतीय हवाई दलाच्या मिराज विमानांची तुकडी गेली आहे.



    तसेच फ्रान्सच्या हवाई दलातील राफेल लढाऊ विमानाची तुकडीही प्रथमच गेली आहे़, असे इस्राईलच्या हवाई दलाने म्हटले आहे. विविध राष्ट्रांबरोबरचे संबंध दृढ करण्यासाठी हा सराव आयोजित केला जात असल्याचे इस्राईलच्या हवाई दलाच्या वतीने सांगण्यात आले.

    भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी इस्राईलमधील ‘ओव्हडा एअरबेस’वर भेट देत या सरावाची पाहणी केली. त्यांनी भारतीय हवाई दलाच्या पथकासोबतचे फोटो ट्विट केले आहेत. त्यामध्ये त्यांनी ‘भारतीय आणि इस्राईलच्या संबंधांचा मुख्य आधार संरक्षण आहे,’ असे म्हटले आहे.

    India is part of Blue flag exersice

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Europe Heatwave : युरोपमधील 23 देशांमध्ये विक्रमी उष्णतेची लाट; उष्णतेमुळे 11 लाख कोटींचे नुकसान, पुढील वर्षी 34% लोकसंख्या पाण्यासाठी त्रस्त असेल

    Jammu and Kashmir : जम्मू – काश्मिरातील सरकारी शाळांना वाटलेल्या पुस्तकावरून वाद; हाफिज सईदला महान म्हटले; भाजप म्हणाली- हा शैक्षणिक जिहाद; UAPA अंतर्गत FIR

    Trump : ट्रम्प म्हणाले – एका हल्ल्यात इराणी नेतृत्व संपले असते; इराण – तुमच्याकडे ना सभ्यता ना सन्मान; खामेनींच्या अंत्यसंस्काराला जनसागर