• Download App
    महिला विश्वचषक  सामन्यात भारताकडून पाकिस्तानचा पराभव|India beat Pakistan in Women's World

    महिला विश्वचषक  सामन्यात भारताकडून पाकिस्तानचा पराभव

    विशेष प्रतिनिधी

    न्यूझीलंड : महिला विश्वचषक संयत दमदार खेळी करत  भारतीय क्रिकेट  संघाने पाकिस्तानवर १०७ धावांनी विजय मिळवला आहे. भारताने पाकिस्तानसमोर २४५ धावांचे  आव्हान उभे  केले  होते. हे आव्हान गाठताना पाकिस्तानी संघाला  अवघ्या १३७ धावा करता आल्या. फक्त ४३ षटकांमध्ये पाकिस्तानचा पूर्ण संघ बाद झाला. India beat Pakistan in Women’s World

    या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. राजेश्वरी गायकवाडने चार फलंदाजांना बाद करुन भारताच्या विजयावर शिक्का मोर्तब केले. झुलन गोस्वामी, स्नेह राणा, यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. तर मेघना सिंघ आणि दिप्ती शर्मा यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.



    सुरुवातीला १२० धावांमध्ये पाच फलंदाज तंबूत परतल्यामुळे भारतीय संघ २०० धावातरी करु शकणार का अशी चिंता निर्माण झाली होती.  मात्र पूजा वस्त्रकर आणि स्नेह राणा यांनी  धडाकेबाज फलंदाजी केली. या दोन्ही खेळाडूंनी १२२ धावांची शतकी भागिदारी केल्यामुळे भारतीय संघ पाकिस्तानपुढे २४४ धावांचा डोंगर उभा करु शकला.

    India beat Pakistan in Women’s World

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार

    Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या