देशातील सर्वाधिक लोकांनी घेतलेल्या कोविशिल्ड लसीबाबत इंग्लंडमधून दिलासादायक बातमी आली आहे. अॅस्ट्राझेनेका लसीचा पहिला डोस घेतल्यानेच येथील मृत्यूंमध्ये ८० टक्के घट झाली आहे. भारतातील सीरम इन्स्टिट्यूट आॅफ इंडियाने बनविलेली कोविशिल्ड लस ही अॅस्ट्राझेनेकाच्याच फॉर्म्युलाने तयार केलेली आहे.Good news for Indians, a single dose of AstraZeneca reduces 80% of deaths in England
विशेष प्रतिनिधी
लंडन : देशातील सर्वाधिक लोकांनी घेतलेल्या कोविशिल्ड लसीबाबत इंग्लंडमधून दिलासादायक बातमी आली आहे. अॅस्ट्राझेनेका लसीचा पहिला डोस घेतल्यानेच येथील मृत्यूंमध्ये ८० टक्के घट झाली आहे.
भारतातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने बनविलेली कोविशिल्ड लस ही अॅस्ट्राझेनेकाच्याच फॉर्म्युलाने तयार केलेली आहे.इंग्लंडमध्ये जगातील सर्वाधिक प्रमाणावर वरिष्ठ नागरिकांना लसीकरण झाले आहे.
ऑक्सफर्ड अॅस्ट्राझिनेकाच्या लसीचा पहिला डोस घेणाऱ्यांना कोरानाचा धोका कमी असल्याचे अभ्यासात दिसून आले आहे. लस घेतल्यानंतर कोरोनाबाधित झालेल्यांच्या मृत्यूमध्ये 80 टक्के घट झाली आहे.
पब्लिक हेल्थ इंग्लंडने केलेल्या संशोधनानुसार अॅस्ट्राझिनेकाच्या लसीचा पहिला डोस घेतल्यास कोरोनामुळे मृत्यूचा धोका हा 80 टक्क्यांनी कमी होतो. अमेरिकेच्या फायझर कंपनीची लस घेतल्यास दोन डोसनंतर मृत्यूचा धोका हा 97 टक्यांनी कामी होतो.
इंग्लंडचे आरोग्यमंत्री मॅट हँकॉक म्हणाले, या आकड्यावरून स्पष्ट होते की कोरोना महामारीपासून वाचण्यासाठी लस खूप प्रभावी आहे. आतापर्यंत देशात जेवढे लसीकरण झालेय त्यातून दहा हजार लोकांचे जीव वाचविता आले आहेत.
ब्रिटनची लोकसंख्या ही 1 कोटी 80 लाख आहे. यापैकी तीन वयस्कर व्यक्तींमागे एकाला कोरोना लस टोचण्यात आली आहे. यामुळे ब्रिटनेमध्ये कोरोना संक्रमण, रुग्णांचे हॉस्पिटलायझेशन आणि मृतांचा आकडा खूप कमी झाला आहे.
यामुळे आता पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी सरकार नागरिकांना कोरोना व्हायरसमुळे लावलेल्या निबंर्धांमध्ये सूट देण्याचा विचार करत असल्याचे सूतोवाच केले आहे.
भारतीयांसाठी ही दिलासादायक बातमी ठरली आहे. भारतामध्ये सीरमकडून कोव्हिशिल्डचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होत आहे. देशातील आत्तापर्यंत झालेल्या लसीकरणाच ८० टक्यांहून अधिक वाटा कोविशिल्डचा वाटा मोठा आहे. त्यामुळे लसीकरणाचे प्रमाण वाढत जाईल तसे भारतातील कोरोनाने मृत्यू झालेल्यांचे प्रमाणही कमी होणार आहे.