• Download App
    अमेरिकी माध्यमांचा दुटप्पीपणा उघड, कोरोनामृत्यूंच्या शवांवर अजून नाहीत अंत्यसंस्कार American media's duplicity exposed: Bodies of Covid-19 victims still waiting for burials

    अमेरिकी माध्यमांचा दुटप्पीपणा उघड, कोरोनामृत्यूंच्या शवांवर अजून नाहीत अंत्यसंस्कार

    कोरोना महामारीमध्ये सापडलेल्या भारतामध्ये अत्यंत दुरवस्था असल्याचा कांगावा अमेरिकी प्रसारमाध्यमांनी चालवला आहे. भारतामधील कोरोनाग्रस्तांच्या शवांचे फोटो, अंत्यसंस्कारांचे फोटो अमेरिकी प्रसारमाध्यमांनी गेल्या आठवड्यात ठळकपणे प्रसिद्ध केले. प्रत्यक्षात अमेरिकेची आर्थिक राजधानी असलेल्या न्यूयॉर्क शहरातील परिस्थितीवर मात्र त्यांनी सोईस्करपणे पांघरुण घातले आहे. कोविड-19 च्या संसर्गामुळे मृत्यू झालेल्यांवर अंत्यसंस्कार करण्यास न्यूयॉर्क प्रशासनाला अद्याप वेळ मिळालेला नाही. त्यामुळे शेकडो कोरोना बळींची पार्थिवं न्यूयॉर्क शहराबाहेरील रेफ्रिजरेटर ट्रकमध्ये वर्षापासून पडून आहेत. American media’s duplicity exposed: Bodies of Covid-19 victims still waiting for burials


    वृत्तसंस्था

    न्यूयॉर्क : जगप्रसिद्ध असणारे आणि अमेरिकेची आर्थिक राजधानी मानले जाणारे न्यूयॉर्क शहर कोरोना विषाणूच्या कचाट्यात सापडले आहे. परिस्थिती एवढी विचित्र आहे की तब्बल वर्षापूर्वी कोरोना संसर्गाने बळी पडलेल्यांची शरीरे अजूनही तात्पुरत्या मॉर्गेजमध्ये रुपांतरित केलेल्या रेफ्रिजरेटेड ट्रेलरमध्ये साठवली जात आहेत.

    स्थानिक वैद्यकीय परीक्षक कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार दक्षिण ब्रूकलीन मरीन टर्मिनलमध्ये दीर्घकालीन तात्पुरत्या शवागृहात 750 मृतदेह ठेवले आहेत. हे सर्व कोविड-19 चे बळी नाहीत. गेल्यावर्षी रुग्णालयांवर, अंत्यसंस्कार होणाऱ्या दफनभूमीवर कोरोना साथीमुळे प्रचंड ताण आला. वाढत्या प्रेतांच्या संख्येमुळे सर्व पार्थिवांवर अंत्यसंस्कार होऊ शकले नाहीत. या भयानक स्थितीमुळे न्यूयॉर्क परिसरात असणाऱ्या सार्वजनिक उद्यानांमध्येही तात्पुरते दफन केले जात असल्याची चर्चा सुरु झाली.

    मात्र न्यूयॉर्कच्या महापौरांनी त्याचे खंडन केले. ते म्हणाले की, सार्वजनिक उद्यानात दफन केल्याच्या अफवा ‘पूर्णपणे चुकीच्या’ आहेत. एप्रिल 2020 च्या सुरुवातीस, न्यूयॉर्क शहरात एका दिवसात 800 पेक्षा जास्त कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाली. पाच एप्रिलच्या आठवड्यात दिवसाला सरासरी 566 कोरोनाबळी न्यूयॉर्क शहरात झाले असे अमेरिकेच्या रोग नियंत्रण व प्रतिबंध केंद्राच्या आकडेवारीवरुन स्पष्ट होते.



    ऑफिस ऑफ चीफ मेडिकल एक्झामिनरचे प्रवक्ते मार्क डिजायर यांनी सांगितले, “कोरोनाची साथ सर्वोच्च टोकावर असताना दीर्घकालीन शव साठवण गृहे तयार करण्यात आली होती. मार्च २०२० च्याअखेरीस, या रेफ्रिजरेटेड ट्रेलर्सनी शहराबाहेरील रुग्णालयांसाठी तात्पुरती शवागृहे म्हणून काम केले. त्यावेळी संपूर्ण देशभरातच कोरोनाची साथ आणि कोरोना बळींची संख्या भीषण होती.

    न्यूयॉर्कने 11 सप्टेंबर 2001 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यांनंतरही अशाच कठोर उपायांचा अवलंब केला होता. वैद्यकीय परीक्षकाच्या कार्यालयाने वर्ल्ड ट्रेड सेंटर कोसळल्यामुळे ठार झालेल्या 2 हजार 753 लोकांपैकी शेकडो शवांची ओळख पटवण्यासाठी ते दीर्घकाळ साठवून ठेवले होते.

    मृतांच्या अंत्यसंस्काराची व्यवस्था करण्यासाठी वैद्यकीय परीक्षक कार्यालय संबंधितांच्या कुटुंबियांना मदत करत असल्याचे डिजायर यांनी सांगितले. तात्पुरत्या शवागृहांसाठी त्यांनी अतिरीक्त रेफ्रिजरेटेड ट्रक खरेदी केले. फेडरल इमर्जन्सी मॅनेजमेंट एजन्सीने गेल्या वर्षी शहराला न्यूयॉर्कला असे 80 ट्रक देऊ केले होते.

    दरम्यान न्यूयॉर्क प्रशासनाने घोषित केले होते की, ओळख न पटणाऱ्या, गरीबांच्या प्रेतांची विल्हेवाट हार्ट बेटावरील शेतात केली जाईल. तसेच आपल्या व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी त्यांच्या कुटुंबियांना वेळ मिळावा यासाठी कोरोना बळींची पार्थिवे साठवून ठेवल्याचे कारण न्यूयॉर्क प्रशासन देत आहे.

    American media’s duplicity exposed: Bodies of Covid-19 victims still waiting for burials

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    सिंगापूर-हाँगकाँगनंतर आता अमेरिकेत MDH आणि एव्हरेस्टची मसाल्यांची तपासणी; यूएस फूड रेग्युलेटर करतेय पडताळणी

    पाकिस्तानने म्हटले- भारतीय नेत्यांनी निवडणुकीत आमचा वापर करू नये; राजकारणासाठी मुद्दा करत आहेत

    US पोलिसांनी कृष्णवर्णीयाचा गळा दाबला, रुग्णालयात मृत्यू; श्वास गुदमरल्याचे सांगत होता, पोलिसांनी पाय काढलाच नाही