• Download App
    ऑस्ट्रेलियात दोन महिन्यांनी सापडला कोरोनाबाधित, उगम शोधण्यासाठी प्रशासनाची उडाली धावपळ|Coronado found two months later in Australia, administration rushing to find source

    ऑस्ट्रेलियात दोन महिन्यांनी सापडला कोरोनाबाधित, उगम शोधण्यासाठी प्रशासनाची उडाली धावपळ

    व्हिक्टोरिया या ऑस्ट्रेलियातील राज्यातील दोन महिन्यांनी कोरोनाबाधित सापडला आहे. या कोरोनाचा उगम कोठून झाला हे शोधण्यासाठी प्रशासनाची धावपळ सुरू आहे. एप्रिलच्या पहिल्या पंधरवड्यात भारतातून परतलेल्या एकाला कोरोनाची बाधा झाली आहे. त्याने चौदा दिवसांचा क्वारंटाईन काळ पूर्ण केला होता. तरीही त्याला कोरोना दिसून आल्याने भीती वाढली आहे.Coronado found two months later in Australia, administration rushing to find source


    विशेष प्रतिनिधी

    व्हिक्टोरिया : व्हिक्टोरिया या ऑस्ट्रेलियातील राज्यातील दोन महिन्यांनी कोरोनाबाधित सापडला आहे. या कोरोनाचा उगम कोठून झाला हे शोधण्यासाठी प्रशासनाची धावपळ सुरू आहे.

    एप्रिलच्या पहिल्या पंधरवड्यात भारतातून परतलेल्या एकाला कोरोनाची बाधा झाली आहे. त्याने चौदा दिवसांचा क्वारंटाईन काळ पूर्ण केला होता. तरीही त्याला कोरोना दिसून आल्याने भीती वाढली आहे.



    तीस वर्षांचा एक तरुण एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात एक तरुण भारतातून आॅस्ट्रेलियात आला होता. ऑस्ट्रेलियामध्ये बाहेरील देशांतून आलेल्यास १४ दिवस क्वारंटाईन राहणे बंधनकारक आहे. त्याप्रमाणे या तरुणाने आपला क्वारंटाईनचा काळ पूर्ण केला होता. मात्र, गेल्या आठवड्यापासून त्याच्यात कोरोनाची लक्षणे आढळून आली.

    आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यानी या तरुणाची चौकशी केली. त्याच्या संपर्कात आलेल्या सर्वांना सेल्फ आयसोलेशनमध्ये जाण्याचा आणि कोरोना चाचणी करून घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. प्रशासनाने संभाव्य बाधित झालेल्या ठिकाणांची यादीही प्रसिध्द केली आहे.

    ऑस्ट्रेलियाने आपल्या सीमा बंद करून कोरोना व्हायरसचा नायनाट केल्याचे मानले जात होते. मात्र, व्हिक्टोरियामध्ये पहिल्या टप्यात मोठ्या प्रमाणावर कोरोनाबाधित सापडले होते. त्याचबरोबर कोरोनाचे बळी गेलेल्यांची संख्याही मोठी होती. त्यामुळे २०२० मध्ये बहुतांश काळ येथे लॉकडाऊन होता.

    गेल्या दोन महिन्यांपासून याठिकाणी कोरोनाचा रुग्ण सापडला नव्हता. त्यामुळे लोकांनी नियमांचे पालन करणे सोडून दिले होते. जणू गेल्या पंधरा महिन्यांत काही झालेच नाही त्याप्रमाणे लोक वागत होते.

    मात्र, हा आपल्यासाठी इशारा असल्याचे व्हिक्टोरियाच्या प्रशासनाने म्हटले आहे.कोरोनाचा एक रुग्ण सापडल्याने सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांची सक्ती किंवा मास्क घालण्याचे बंधन लावण्यात येणार नाही.

    त्यचाबरोबर कदाचित या तरुणाला भारतात नव्हे तर ऑस्ट्रेलियातच क्वारंटाईनमध्ये असताना कोरोनाची बाधा झाली असावी, असे प्रशासनाने म्हटले आहे. या एका रुग्णाशिवाय ऑस्ट्रेलियाच्या कोणत्याही भागात इतर रुग्ण सापडले नाहीत.

    Coronado found two months later in Australia, administration rushing to find source

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    सिंगापूर-हाँगकाँगनंतर आता अमेरिकेत MDH आणि एव्हरेस्टची मसाल्यांची तपासणी; यूएस फूड रेग्युलेटर करतेय पडताळणी

    पाकिस्तानने म्हटले- भारतीय नेत्यांनी निवडणुकीत आमचा वापर करू नये; राजकारणासाठी मुद्दा करत आहेत

    US पोलिसांनी कृष्णवर्णीयाचा गळा दाबला, रुग्णालयात मृत्यू; श्वास गुदमरल्याचे सांगत होता, पोलिसांनी पाय काढलाच नाही