• Download App
    पाकिस्तानात कोरोनाचा उद्रेक, अनेक प्रांतात पूर्ण लॉकडाऊन, बंदोबस्तासाठी लष्कर तैनात|Corona outbreak in Pakistan, complete lockdown in several provinces, troops deployed for security

    पाकिस्तानात कोरोनाचा उद्रेक, अनेक प्रांतात पूर्ण लॉकडाऊन, बंदोबस्तासाठी लष्कर तैनात

    पाकिस्तानातील अनेक प्रांत कोरोनाचा उद्रेक झाला आहे. त्यामुळे ऐन ईद-उल-फत्रच्या काळात अनेक प्रांतात लॉकडाऊनची घोषा करण्यात आली आहे. त्यासाठी लष्करालाही तैनात करण्यात येणार आहे.Corona outbreak in Pakistan, complete lockdown in several provinces, troops deployed for security


    विशेष प्रतिनिधी

    लाहोर : पाकिस्तानातील अनेक प्रांत कोरोनाचा उद्रेक झाला आहे. त्यामुळे ऐन ईद-उल-फित्रच्या काळात अनेक प्रांतात लॉकडाऊनची घोषा करण्यात आली आहे. त्यासाठी लष्करालाही तैनात करण्यात येणार आहे.

    पंजाबच्या अनेक प्रांतांमध्ये ८ ते १५ मेदरम्यान पूर्ण लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. ईद-उल-फित्रच्या या काळात पंजाब, सिंध, खैबर पख्तूनख्वा व पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये प्रशासनाने लॉकडाऊनची घोषणा केली.



    पाकिस्तानात कोरोना संक्रमण वाढत आहे. पंजाबच्या आरोग्यमंत्री यास्मिन राशीद यांनी दिलेल माहितीनुसार, आठ दिवसांच्या लॉकडाऊनच्या काळात दुकाने, शॉपिंग मॉल व बाजार बंद राहतील.

    लोकांच्या येण्या-जाण्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस, रेंजर्स व लष्कराचे जवान तैनात करण्यात येणार आहेत. लॉकडाऊनच्या कालावधीत औषधी, कोरोना व्हायरस लसीकरण, पेट्रोल पंप, किराणाची छोटी दुकाने, डेअरी, भाज्या, फळे आदी दुकाने सुरूराहतील.

    खैबर पख्तूनख्वा, सिंध व पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मीरच्या प्रशासनांनीही अशाच प्रकारचे आदेश काढले आहेत.पाकिस्तानात आतापर्यंत कोरोना व्हायरसमुळे १८,५३७ जणांचा मृत्यू झाला आहे व एकूण संक्रमितांची संख्या ८,४५,८३३ वर गेली आहे.

    Corona outbreak in Pakistan, complete lockdown in several provinces, troops deployed for security

     

    Related posts

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार

    Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या