• Download App
    भारतात धार्मिक व राजकीय कार्यक्रमांतून कोरोनाचा फैलाव, ‘डब्लूएचओ’च्या अहवालात टीका|WHO targets India on tackling corona

    भारतात धार्मिक व राजकीय कार्यक्रमांतून कोरोनाचा फैलाव, ‘डब्लूएचओ’च्या अहवालात टीका

    विशेष प्रतिनिधी

    जीनिव्हा : भारतात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढण्यामागे धार्मिक आणि राजकीय कार्यक्रमांत जमा झालेली गर्दी हे एक प्रमुख कारण असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने साप्ताहिक अहवालात नमूद केले आहे.WHO targets India on tackling corona

    महिन्याभरापूर्वी भारतात निवडणूक प्रचार आणि धार्मिक कार्यक्रमांमुळे कोरोनाचा ‘बी.१.६१७’ हा प्रकार मोठ्या प्रमाणात फैलावण्यास मदत झाली. ‘बी.१.१.७’ या प्रकाराचा कोरोना विषाणू ब्रिटनमध्ये प्रथम आढळला आणि आता अमेरिकेत त्याचा प्रसार झाला आहे.



    बी. १.६१७ हा जास्त धोकादायक आहे, हे अद्याप सिद्ध झालेले नाही. पण आनुवंशिक क्रमवारीचा अभ्यास मोठ्या प्रमाणात झाल्याशिवाय कोरोना साथीच्या फैलावासाठी या अवताराला दोष देता येणार नाही, ‘डब्लूएचओ’च्या तज्ज्ञांनी स्पष्ट केले.

    कोरोनाचा ‘बी.१.६१७’ हा नवा अवतार प्रथम ऑक्टोबर २०२०मध्ये दिसून आला. याचे अनेक म्युटेशन आहेत. विषाणूच्या इतर प्रकारात हे म्युटेशन अधिक चिंताजनक असल्याचे सिद्ध झाले आहे.

    कोरोना अन्य प्रकाराच्या संसर्गानंतर शरीरात निर्माण होणाऱ्या प्रतिपिंडांना अन्य म्युटंटचा सामना करणे कठीण होऊ शकते. लसीकरणानंतर तयार झालेली प्रतिपिंडे ‘बी.१.६१७’ वर फारशी परिणामकारक ठरत नसल्याचे अभ्यासाअंती आढळले आहे.

    WHO targets India on tackling corona

    Related posts

    Food Delivery : चीनमध्ये फूड डिलिव्हरी बॉयला सर्वात मोठा साहित्यिक सन्मान; जेवण पोहोचवताना अनेक कविता लिहिल्या

    Ban Aid and Visas : ब्रिटनमध्ये विरोधकांची मागणी; पाकिस्तानला मदत-व्हिसावर बंदी घालावी, पाकने बाल लैंगिक गुन्हेगाराला परत घेण्यास नकार दिला होता

    US-Iran : अमेरिका-इराण तणावामुळे ब्रेंट क्रूड 90 डॉलरच्या पुढे; एका आठवड्यात 16% वाढ; भारतात महागाईचा धोका