• Download App
    Intelligence Report Contradicts Trump: Iran Retains 70% Missile Stockpile गुप्तचर अहवालात दावा; इराणची क्षेपणास्त्र क्षमता कायम, 70%साठा अन् 90% भूमिगत नेटवर्क सुरक्षित, ट्रम्प यांचा दावा चुकीचा

    Intelligence Report : गुप्तचर अहवालात दावा; इराणची क्षेपणास्त्र क्षमता कायम, 70%साठा अन् 90% भूमिगत नेटवर्क सुरक्षित, ट्रम्प यांचा दावा चुकीचा

    Intelligence Report

    वृत्तसंस्था

    वॉशिंग्टन डीसी : Intelligence Report इराणची लष्करी क्षमता उद्ध्वस्त झाल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प करत असले तरी, अमेरिकन गुप्तचर अहवाल याच्या उलट चित्र दर्शवत आहे. अहवालानुसार, इराणने अद्यापही युद्धापूर्वीच्या क्षेपणास्त्र साठ्यापैकी ७०% साठा सुरक्षित ठेवला आहे. त्यांची ९०% भूमिगत क्षेपणास्त्र साठवणूक व प्रक्षेपण क्षमता कार्यान्वित आहे. तसेच, होर्मुझ मार्गाजवळ इराणने ३३ पैकी ३० क्षेपणास्त्र स्थळांवर ताबा मिळवला आहे. ही ठिकाणे अमेरिकन युद्धनौका व तेलवाहू जहाजांसाठी धोकादायक ठरू शकतात. इराणचे ७०% मोबाईल लाँचर्स सुरक्षित आहेत.Intelligence Report

    मस्क, कुक, जेन्सेनसह १७ बडे उद्योजक सोबत

    राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या चीन दौऱ्यात १७ प्रमुख सीईओंचा ताफाही सहभागी झाला आहे. व्हाईट हाऊसच्या यादीनुसार यामध्ये टेस्लाचे इलॉन मस्क, ॲपलचे टिम कुक, बोईंगचे केली ऑर्टबर्ग, ब्लॅकरॉकचे लॅरी फिंक आणि गोल्डमन सॅक्सचे डेव्हिड सोलोमन यांचा समावेश आहे.Intelligence Report



    क्वालकॉमचे क्रिस्टियानो अमोन आणि मायक्रॉनचे संजय मेहरोत्रा हे देखील या ताफ्यात आहेत. अलास्कात विमानामध्ये इंधन भरत असताना एनवीडियाचे जेन्सेन हुआंग यांना ट्रम्पनी स्वतः दौऱ्यात सामील करून घेतले.

    पुतीन १८ मे तर शाहबाज २३ मे रोजी चीन दौऱ्यावर : पाकचे पीएम शाहबाज शरीफ २३ मे रोजी चीन दौऱ्यावर जाणार आहेत. त्याआधी रशियाचे अध्यक्ष पुतीन १८ मे रोजी चीन दौऱ्यावर जातील.

    ट्रम्पची धमकी : इराणसमोर दोन मार्ग; करार किंवा पूर्ण विनाश

    चीनला रवाना होण्यापूर्वी ट्रम्प यांनी इराणला इशारा दिला. इराणने अमेरिकेच्या अटींवर तडजोड करावी, अन्यथा विनाशाला सामोरे जावे, असे त्यांनी म्हटले आहे. इराणसमोर तडजोड किंवा पूर्ण विनाश असे दोनच मार्ग आहेत.

    व्यापार करार : चीनच्या ५० लाख कोटी निर्यातीवर कर सवलत

    ट्रम्प यांच्या चीन दौऱ्याचा उद्देश अमेरिका आणि चीनमधील व्यापारी तणाव कमी करणे हा देखील आहे. कर वादामुळे चीनच्या अमेरिकेला होणाऱ्या ५० लाख कोटी रुपयांच्या निर्यातीवर परिणाम झाला. यासाठी व्यापार करार शक्य आहे.

    Intelligence Report Contradicts Trump: Iran Retains 70% Missile Stockpile

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    China : कर्करोग उपचारात चीनची मोठी झेप; अमेरिकन रुग्णांवर चाचणीसाठी चिनी औषध कंपनीचे संशोधन, जागतिक औषध उद्योगाचे लक्ष वेधले

    Chinese : कर्करोग उपचारात चीनची मोठी झेप; अमेरिकन रुग्णांवर चाचणीसाठी चिनी औषध कंपनीचे संशोधन, जागतिक औषध उद्योगाचे लक्ष वेधले

    US : अमेरिकेत स्थलांतरितांवरील निर्बंध आणखी कडक; मदत सेवा, आश्रय प्रक्रिया आणि कायदेशीर सुविधा मर्यादित करण्याच्या हालचालींमुळे चिंता