वृत्तसंस्था
वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी आणि माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. जो बायडेन यांनी म्हटले की, अमेरिकेत खूप धोकादायक घडत आहे. जो बायडेन म्हणाले की, देशातील लोकशाहीला गंभीर धोका निर्माण होत आहे. अमेरिकेत पुढील वर्षी होणाऱ्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा सातत्याने वाढत असून, जो बायडेन यांचे ताजे वक्तव्यही याच संदर्भात दिल्याचे मानले जात आहे.Something very dangerous is happening in America, President Joe Biden accused Donald Trump
‘लोकशाहीला वाढता धोका’
जो बायडेन यांनी गुरुवारी अमेरिकेच्या अॅरिझोना राज्यात एका भाषणादरम्यान सांगितले की, आता अमेरिकेत काहीतरी धोकादायक घडत आहे… देशात एक कट्टरपंथी मोहीम सुरू आहे जी लोकशाहीच्या आधारावर नाही. बायडेन म्हणाले की, आपण सर्वांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की शस्त्रांच्या बळावर लोकशाही नष्ट होऊ शकत नाही, परंतु जेव्हा लोक शांत राहतील आणि त्याच्या बाजूने उभे राहत नाहीत, तेव्हा मात्र ती नष्ट होऊ शकते.
विरोधी पक्ष रिपब्लिकनवर निशाणा साधत बायडेन म्हणाले की रिपब्लिकन पक्ष आज MAGA चळवळीच्या कट्टर समर्थकांकडून चालवला जात आहे. अमेरिकेतील लोकशाही संस्था बदलणे हा कट्टरपंथीयांचा अजेंडा आहे. MAGA आंदोलन हे डोनाल्ड ट्रम्प यांच्या मेक अमेरिका, ग्रेट अगेन या निवडणूक घोषणेचे एक लघुरूप आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी 2016च्या अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीदरम्यान हा नारा दिला होता, जो आता पुन्हा लोकप्रिय होत आहे.
Something very dangerous is happening in America, President Joe Biden accused Donald Trump
महत्वाच्या बातम्या
- कावेरी पाणी वाटपाचा मुद्दा तापला, आज शेतकऱ्यांची कर्नाटक बंदची हाक; 30 हून अधिक शेतकरी गट, व्यापारी संघटनांचा पाठिंबा
- Asian Games 2023: भारताला नेमबाजीत आणखी एक सुवर्ण, पुरुष संघाने केला विश्वविक्रम
- इंडिया एजिंग रिपोर्ट 2023 : भारतीय लोकसंख्येची झपाट्याने वृद्धत्वाकडे वाटचाल, शतकाअखेरीस 36 टक्के राहील प्रमाण
- राहुल गांधींची फर्निचर मार्केटला भेट; लाकूड कापून खुर्ची बनवायला शिकले; मजुरांच्या समस्या घेतल्या जाणून