जाणून घ्या, काय आहे संपूर्ण प्रकरण
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : सौदी अरेबियाने पाकिस्तानला अचानक मोठा धक्का दिला आहे. हे प्रकरण मुस्लिमांच्या श्रद्धेशी संबंधित आहे. सौदी अरेबियाने हज यात्रा करणाऱ्या पाकिस्तानी कंपन्यांची संख्या कमालीची कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा पुनर्विचार व्हावा अशी पाकिस्तानची इच्छा होती पण सौदी अरेबियाने स्पष्टपणे नकार दिला. सौदी अरेबियाच्या या निर्णयाचा पाकिस्तानवर काय परिणाम होणार आहे ते पाहूयात. Saudi Arabia gave a big blow to Pakistan
पाकिस्तानचे धार्मिक व्यवहार मंत्री अनिक अहमद यांनी सोमवारी सिनेट पॅनेलला सांगितले की, मंत्रालयाने हज यात्रेबाबत एक नवीन धोरण तयार केले आहे ज्यामध्ये कमी कालावधीचा प्रवास दिला जाईल.
सौदी अरेबियाच्या निर्णयाबाबत चर्चा करताना अनिक अहमद म्हणाले की, सौदी अरेबिया सरकारने पाकिस्तानातील केवळ ४६ कंपन्यांना हज यात्रा करण्याची परवानगी दिली आहे. यासोबतच सौदी अरेबियाच्या या निर्णयावर पाकिस्तान फार काही करू शकत नाही, असेही ते म्हणाले.
खरंतर आतापर्यंत पाकिस्तानातील 905 कंपन्या हज यात्रेच्या नियोजनात गुंतल्या होत्या. मात्र आता फक्त 46 कंपन्या हज करू शकणार आहेत. पाकिस्तान हज कमिटीचे सदस्य मौलाना फैज मुहम्मद यांनी म्हटले आहे की, “आम्हाला सौदी अरेबियाच्या अधिकाऱ्यांशी बोलून समस्या सोडवावी लागेल”.
Saudi Arabia gave a big blow to Pakistan
महत्वाच्या बातम्या