• Download App
    इजिप्तमधील तब्बल एक हजार वर्षे जुन्या ऐतिहासिक अल-हकीम मशिदीला पंतप्रधान मोदींची भेट Prime Minister Narendra Modi visits Al Hakim Mosque in Cairo Egypt

    इजिप्तमधील तब्बल एक हजार वर्षे जुन्या ऐतिहासिक अल-हकीम मशिदीला पंतप्रधान मोदींची भेट

    मशीद इजिप्तमधील मुस्लिमांसाठी सर्वात पवित्र स्थळांपैकी एक आहे.

    विशेष प्रतिनिधी

    कैरो : इजिप्तच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी राजधानी कैरो येथील तब्बल एक हजार जुन्या ऐतिहासिक अल-हकीम मशिदीला भेट दिली. ११व्या शतकातील ही मशीद कैरोमधील दाऊदी बोहरा समुदायासाठी मोठे सांस्कृतिक महत्त्व आहे. या समाजाच्या मदतीने ही मशीद बांधण्यात आली आहे. फेब्रुवारीमध्ये मशीद पुन्हा उघडण्यात आले होते. Prime Minister Narendra Modi visits Al Hakim Mosque in Cairo Egypt

    पंतप्रधान मोदींच्या या हजार वर्ष जुन्या मशिदीच्या भेटीकडे अनेक तज्ज्ञ वेगळ्या पद्धतीने पाहत आहेत. इजिप्तमध्ये येणे आणि या मशिदीला भेट देणे हे द्विपक्षीय संबंधांमध्ये एक गेम चेंजर ठरेल, असे त्यांचे म्हणणे आहे. मशिदीच्या भेटीबद्दल त्यांनी कौतुक केले आहे.

    १९९७ नंतर पहिल्यांदाच भारतीय पंतप्रधानांनी इजिप्तला भेट दिली आहे. मशीद इजिप्तमधील मुस्लिमांसाठी सर्वात पवित्र स्थळांपैकी एक आहे. मशीद अल-मुइझ स्ट्रीटच्या पूर्वेला आहे. स्थानिक वृत्तानुसार, दाऊदी बोहरा इस्माइली शिया पंथाने मशिदीसाठी स्थानिक चलनात सुमारे £85 दशलक्ष दान केले. या वर्षी फेब्रुवारीमध्ये ती पुन्हा लोकांसाठी खुली करण्यात आली. या मशिदीच्या नूतनीकरणाचे श्रेय भारतीय बोहरा समाजातील सुलतान मुफद्दल सैफुद्दीन आणि त्यांचे अध्यात्मिक नेते, 53 वे अल-दाई अल-मुतलक यांना जाते.

    Prime Minister Narendra Modi visits Al Hakim Mosque in Cairo Egypt

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार

    Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या