• Download App
    लैंगिक शोषणाबद्दल अखेर पोप यांनी मागितली पीडितांची माफी |Pope apologies on sexual harassment

    लैंगिक शोषणाबद्दल अखेर पोप यांनी मागितली पीडितांची माफी

    विशेष प्रतिनिधी

    व्हॅटिकन सिटी – गेल्या सात दशकांत सुमारे ३ लाख ३० हजार मुलांचे लैंगिक शोषण झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आल्यानंतर पोप यांनी या घटनेतील पीडितांची माफी मागितली आहे.Pope apologies on sexual harassment

    सुमारे अडीच हजार पानी आयोगाच्या अहवालात १९५० पासून चर्चमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींनी सुमारे तीन लाखांहून अधिक मुलांचे लैंगिक शोषण केल्याचे म्हटले आहे. चर्चमधील तीन हजार व्यक्तींपैकी एक तृतीयांश पाद्री किंवा धर्मोपदेशकांचा समावेश होता,



    असे अहवालात उघड झाले आहे. फ्रान्समधील चर्च येथे लैंगिक शोषण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी २०१८ रोजी आयोगाची नियुक्ती केली होती. आयोगात कायदा, आरोग्य, इतिहास, समाजशास्त्र, धर्मशास्त्रसह अन्य विविध विषयांचे २२ तज्ञ सहभागी झाले होते.

    व्हॅटिकनच्या प्रवक्त्याने फ्रान्सच्या स्वतंत्र आयोगाने प्रसिद्ध केलेल्या अहवालातील निष्कर्ष क्लेषदायक असल्याचे म्हटले आहे. प्रवक्ते माटेओ ब्रुनी यांनी म्हटले की, पोप यांनी पीडितांच्या वेदनांचा विचार केला आहे. त्यांना झालेल्या त्रासाबद्दल दु:ख व्यक्त केले असून बोलण्याचे धाडस दाखवल्याबद्दल पोप यांनी आभार मानले आहे.

    Pope apologies on sexual harassment

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Donald Trump : ट्रम्प म्हणाले- अमेरिकेकडे शस्त्रास्त्रांची कमतरता नाही; इराणला पुन्हा धमकी दिली; खार्ग बेटावरील हल्ल्याचा AI फोटो केला शेअर

    PoK Assembly : पीओकेत निवडणुकीत हिंसाचार, गोळीबार; 1 ठार, अनेक जखमी, घोटाळ्याच्या आरोपांमुळे वाद वाढला

    Hormuz : होर्मुझमध्ये तेलवाहू जहाजाची सागरी सुरुंगाला धडक; जहाजाला आग, युद्ध सुरू झाल्यापासून पहिला अपघात