• Download App
    अमेरिका, नाटो सैन्याला मदत केलेले नागरिक तालिबानच्या रडारवर, घराघरांत झाडाझडती सुरु People got in trouble who helped USA in Afghanistan

    अमेरिका, नाटो सैन्याला मदत केलेले नागरिक तालिबानच्या रडारवर, घराघरांत झाडाझडती सुरु

    विशेष प्रतिनिधी

    काबूल – तालिबानने आता घरोघरी जाऊन झाडाझडती सुरु केली आहे. अमेरिकी सैन्याला मदत केलेल्यांना हुडकून काढण्याचाच त्यांचा हेतू आहे.
    यामुळे अफगाण लष्कर, पोलिस आणि गुप्तचर शाखा यांना मदत केलेल्या लोकांचा जीव धोक्यात आला आहे. People got in trouble who helped USA in Afghanistan

    त्यामुळे राजधानी काबूलमधून पलायन करण्यासाठी असंख्य नागरिक अजूनही प्रयत्नशील आहेत. यामुळे ही भीती वाढली आहे. विमानतळाकडे जाणाऱ्या प्रत्येक नागरिकाला थांबवून त्याची झाडाझडती घेतली जात आहे. तालिबानने याचा यापूर्वीही इन्कार केला असून दहशतवाद्यांना खासगी घरांत प्रवेश करण्यास मनाई असल्याचे निवेदन अनेक वेळा जारी केले आहे.



    महिला आणि पत्रकारांना घाबरण्याचे कारण नसल्याचा दावाही तालिबान करते, मात्र काबूलमध्ये अलीकडच्या काही दिवसांत अनागोंदीचे चित्रण करताना आपल्याला काठी किंवा चाबकाने फोडून काढण्यात आले असा आरोप अनेक माध्यमांच्या कर्मचाऱ्यांनी केला आहे.

    शरण येण्यास नकार देणाऱ्यांच्या कुटुंबीयांना तालिबान्यांनी लक्ष्य केले आहे. शरीयत कायद्यानुसार त्यांच्यावर कारवाई आणि शासन केले जात आहे. अमेरिका तसेच नाटो सैन्याला मदत केलेले सहकारी व त्यांच्या कुटुंबीयांचा नजिकच्या काळात छळ होईल अशी लोकांना भीती वाटते.

    People got in trouble who helped USA in Afghanistan

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Anthony : ‘भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार’; ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांकडून कौतुक, भारतीय रेल्वे प्रवासाचाही उल्लेख

    Trump : डोनाल्ड ट्रम्प यांची ओमानला उघड धमकी; ‘ऐकलं नाही तर उडवून देऊ’, मध्यपूर्वेत तणाव वाढला

    White House : व्हाइट हाऊसमध्ये UFC फाइटचा ‘मेगा शो’; ट्रम्प यांच्या कल्पनेला UFC प्रमुखांचा पाठिंबा, अमेरिकेत नवा राजकीय-खेळीय वाद