• Download App
    वॉशिंग्टन डीसीच्या प्रेस क्लबमध्ये काश्मीर परिवर्तनाबाबत सुरू असलेल्या चर्चेत पाकिस्तानने घातला गोंधळ; अखेर अधिकाऱ्याला बाहेर हाकललं!Pakistanis heckle interrupt discussion on Kashmirs transformation in Washington DCs National Press Club

    वॉशिंग्टन डीसीच्या प्रेस क्लबमध्ये काश्मीर परिवर्तनाबाबत सुरू असलेल्या चर्चेत पाकिस्तानने घातला गोंधळ; अखेर अधिकाऱ्याला बाहेर हाकललं!

    या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, पाकिस्तानचा खरा चेहरा पुन्हा एकदा जगासमोर उघड झाला आहे.

    विशेष प्रतिनिधी

    अमेरिकेतील वॉशिंग्टन डीसीच्या प्रेस क्लबमध्ये काश्मीर बदलाबाबत सुरू असलेल्या चर्चेत पाकिस्तानकडून गोंधळ घालण्यात आला आणि ही चर्चा चिघळवण्याचा प्रयत्न करण्यात आला. एएनआय या वृत्तसंस्थेने इंटरनेटवरील एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये एक पाकिस्तानी अधिकारी अतिशय संतापलेला दिसत आहे, जो काश्मीरच्या स्थितीवर झालेल्या चर्चेवर नाराज दिसत आहे. याशिवाय, चिडलेला पाकिस्तानी अधिकारी स्पीकरवर ओरडत आहे आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटला जात असल्याचा आरोप करत आहे. त्यानंतर लगेचच त्या पाकिस्तानी व्यक्तीला तेथून हाकलून दिले जात असल्याचे दिसून येत आहे. Pakistanis heckle interrupt discussion on Kashmirs transformation in Washington DCs National Press Club

    कर्नाटक विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाने काँग्रेसच्या ‘बालेकिल्ल्यात’ फडकवला भगवा

    वॉशिंग्टन डीसी प्रेस क्लबने इंटरनॅशनल सेंटर फॉर पीस स्टडीजने ‘ Kashmir – From Turmoil to Transformation: perspectives from the ground’’ या विषयावर पॅनेल चर्चेचे काल आयोजन केले होते. पॅनेलमध्ये जम्मू काश्मीर वर्कर्स पार्टीचे अध्यक्ष मीर जुनैद आणि जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला नगरपरिषदेचे अध्यक्ष तौसीफ रैना यांचाही समावेश होता. तर, कालच संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत जम्मू आणि काश्मीरबाबत अजेंडा आयटम 4 वर बोलल्याबद्दल भारताने पाकिस्तानला फटकारले आहे.

    संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्रालय, स्थायी मिशनचे अप्पर सचिव पीआर थुलासीधास यांनी “आम्ही पाकिस्तानला निरर्थक प्रचारात गुंतण्याऐवजी आणि भारतात जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करण्याऐवजी त्यांच्या अल्पसंख्याक समुदायांची सुरक्षा आणि कल्याण यावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन करतो.” असे सांगितले.

    काश्मीरमधील कलम ३७० हटवल्यानंतर पाकिस्तानकडून सातत्याने अपप्रचार केला जात आहे. यामुळेच भारत सरकार पाकिस्तानी अपप्रचाराला जाहीरपणे सडेतोड प्रत्युत्तर देत आहे.

    Pakistanis heckle interrupt discussion on Kashmirs transformation in Washington DCs National Press Club

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    सिंगापूर-हाँगकाँगनंतर आता अमेरिकेत MDH आणि एव्हरेस्टची मसाल्यांची तपासणी; यूएस फूड रेग्युलेटर करतेय पडताळणी

    पाकिस्तानने म्हटले- भारतीय नेत्यांनी निवडणुकीत आमचा वापर करू नये; राजकारणासाठी मुद्दा करत आहेत

    US पोलिसांनी कृष्णवर्णीयाचा गळा दाबला, रुग्णालयात मृत्यू; श्वास गुदमरल्याचे सांगत होता, पोलिसांनी पाय काढलाच नाही