• Download App
    पंचशेर खोऱ्यातल्या "सिंहा"चा पाकिस्तान - तालिबान यांना इशारा; अफगाणिस्तानचे स्वातंत्र्य गमावणार नाही!! |Pakistan warns Taliban of "lions" in Panchsher Valley; Afghanistan will not lose its independence !!

    पंचशेर खोऱ्यातल्या “सिंहा”चा पाकिस्तान – तालिबान यांना इशारा; अफगाणिस्तानचे स्वातंत्र्य गमावणार नाही!!

    वृत्तसंस्था

    पंचशेर : अफगाणिस्तानातील पंचशेर खोऱ्यातील नेते आणि अफगाणिस्तानच्या आधीच्या सरकारमधील उपाध्यक्ष अमर उल्ला सालेह यांनी पाकिस्तान आणि तालिबान यांना कठोर प्रतिकाराला तयार राहण्याचा इशारा दिला आहे. अफगाणिस्तानचे स्वातंत्र्य पंचशेर प्रांत गमावू देणार नाही.Pakistan warns Taliban of “lions” in Panchsher Valley; Afghanistan will not lose its independence !!

    अफगाणिस्तान गिळंकृत करण्यासाठी पाकिस्तान पुढे येतोय पण अफगाणिस्तान खूप मोठा आहे तो पाकिस्तानला गिळंकृत करणे शक्य नाही. आणि तालिबान्यांनाही येथे राज्य करता येणार नाही, असा इशारा अमर उल्ला सालेह यांनी दिला आहे.

    त्यांनी आपल्याला अफगाणिस्तानचे कार्यकारी अध्यक्ष घोषित केले आहे. ताजिकिस्तानची राजधानी दुशांबे येथील अफगाणी दूतावासात त्यांची प्रतिमा कार्यकारी अध्यक्ष या रुपात लावण्यात आली आहे.



    काय आहे पंचशेर खोरे?

    पंचशेर म्हणजे पाच सिंह इतिहासकाळात पाच भावांनी त्या परिसरात पुराचे पाणी अडवून लोकांचे रक्षण केले होते. आता तेथे सुलतान मेहमूद गजनी याच्या नावाचे धरण आहे. या पाच भावांच्या कर्तृत्वाचा सन्मान राखण्यासाठी या परिसराला पंचशेर असे ओळखले जाते.

    • अफगाणिस्तानच्या उत्तरेकडे ताजिकिस्तान बॉर्डरवर पंचशेर हे असे खोरे आहे जिथे कधीच खोऱ्या बाहेरची राजवट राज्य करू शकली नाही.
    •  रशियन आक्रमणापासून देखील पंचशेर खोरे बचावलेले राहिले. तालिबानीही आपल्या आधीच्या राजवटीत पंचशेर खोऱ्यात शिरकाव करू शकले नाहीत.
    • पंचशेर खोऱ्याची भौगोलिक रचनाच एखाद्या नैसर्गिक किल्ल्यासारखी आहे. अहमद मसूद, अमर उल्ला सालेह, बिस्मिल्ला खान मेहमूदी हे तिथले नेते आहेत. यातला अहमद मसुद हा नॉर्दन आलायन्सचा पूर्वीचा नेता अहमद शाह मसूद याचा पुत्र आहे.
    • तिथले लोक प्रामुख्याने ताजिक वंशाचे आहेत. स्वतंत्र वृत्ती ही त्यांच्या रक्तात भिनली आहे.
    •  तालिबान एकामागून एक अफगाणिस्तानचे सर्व प्रांत काबीज करत असताना पंचशेर खोऱ्याच्या वाटेला गेलेला नाहीत कारण तेथून होणारा प्रतिकार हा अत्यंत कडवा असेल याची त्याला जाणीव आहे.
    • त्यामुळेच इथून पुढे तालिबानी राजवटीला पंच शेर खोऱ्यातून विरोधाला सामोरे जावे लागणार आहे.
    • अफगाणिस्तानात आधीच्या तालिबानी राजवट विषयी लढणाऱ्या नॉर्दन अलायन्सचे मूळ देखील या पंचशेर खोऱ्यात आहे. नॉर्दन अलायन्स चे नेते अब्दुल्ला अब्दुल्ला यांना देखील पंचशेल खोऱ्याकडून तालिबान्यांना कडव्या विरोधाची अपेक्षा आहे.

    Pakistan warns Taliban of “lions” in Panchsher Valley; Afghanistan will not lose its independence !!

     

    Related posts

    Canada : कॅनडात मंदिराच्या भिंतीवर लिहिल्या खलिस्तानी घोषणा; नगर कीर्तनापूर्वी कारवाई

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार