• Download App
    WATCH : ठाकरे सरकार अनिल देशमुखांना ईडीच्या ताब्यात देण्याऐवजी त्यांना लपवण्यात मश्गुल, किरीट सोमय्यांचा आरोप । BJP Leader Kirit Somaiya accuses Thackeray government For hiding Anil Deshmukh instead of handing him over to ED in 100 crore Corruption Case

    WATCH : ठाकरे सरकार अनिल देशमुखांना ईडीच्या ताब्यात देण्याऐवजी लपवण्यात मश्गुल, किरीट सोमय्यांचा आरोप

     Anil Deshmukh : 100 कोटी रुपये खंडणीखोरीचा आरोप असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख अद्यापही तपास यंत्रणांसमोर हजर झालेले नाहीत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यामुळे ठाकरे सरकार चांगलेच अडचणीत आले आहे. सर्वोच्च न्यायालयानेही ठाकरे सरकारला फटकारत अनिल देशमुख यांना वाचविण्याचा प्रयत्न करत आहात का विचारत झापले आहे. BJP Leader Kirit Somaiya accuses Thackeray government For hiding Anil Deshmukh instead of handing him over to ED in 100 crore Corruption Case


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : 100 कोटी रुपये खंडणीखोरीचा आरोप असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख अद्यापही तपास यंत्रणांसमोर हजर झालेले नाहीत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यामुळे ठाकरे सरकार चांगलेच अडचणीत आले आहे. सर्वोच्च न्यायालयानेही ठाकरे सरकारला फटकारत अनिल देशमुख यांना वाचविण्याचा प्रयत्न करत आहात का विचारत झापले आहे.

    आता भाजप नेते किरीट सोमय्या यांनीही ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर करत त्यांनी याबद्दल आपली प्रतिक्रिया दिली आहे. सोमय्या म्हणाले की, ठाकरे सरकार अनिल देशमुखांना तपास यंत्रणेच्या, ईडीच्या ताब्यात देण्याऐवजी त्यांना लपविण्यात मशगूल आहे. आता तर सुप्रीम कोर्टाने ठाकरे सरकारची याचिकाही फेटाळून लावली आहे. परंतु यामुळे अनिल देशमुख यांनी वाझे वसुली गँगच्या पैसे वाटपाची माहिती ईडीला दिली तर आपलं काय होणार या चिंतेत ठाकरे सरकार असल्याचा आरोप त्यांनी केला.

    …तर देशमुखांना लवरकच अटक

    १०० कोटींच्या खंडणीखोरी प्रकरणात अनिल देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला होता. दुसरीकडे अनिल देशमुख यांना सक्तवसूली संचलनालयाने ED ने आज सकाळी ११ वाजता चौकशीला हजर राहण्याचे समन्स बजावले होते. या समन्सनुसार ते हजर राहिले नाहीत, तर देशमुखांना ED अटक करू शकते. कारण सुप्रिम कोर्टाने देशमुखांचे अटकेपासून बचावाचे सर्व अर्ज फेटाळले आहेत.

    अनिल देशमुख यांनी ईडीच्या अटकेपासून दिलासा मिळावा म्हणून सुप्रिम कोर्टात याचिका दाखल केली होती. मात्र न्यायालयाने देशमुख यांची याचिका सोमवारी फेटाळून लावली होती. त्यामुळे देशमुख यांची अटकेपासूनची वाचण्याची सर्व शक्यता संपल्या आहेत. अशा वेळी ईडीने मंगळवारी, १७ ऑगस्ट रोजी देशमुख यांना पाचवे समन्स जारी करून आज, सकाळी ११ वाजता ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगितले होते. त्यावेळी देशमुख ईडीच्या कार्यालयात हजर राहतात का?, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तेव्हा देशमुख यांना अटक होण्याची शक्यता वर्तवली आहे.

    काय होते प्रकरण?

    मुंबईतील बार आणि रेस्टॉरंट मालकांकडून १०० कोटींची खंडणी गोळा करून ती वरिष्ठांपर्यंत पोहोचवायचो, अशी साक्ष एपीआय सचिन वाझे याने मनसुख हिरेन हत्या प्रकरणात दिली होती. यात मुंबईचे बदली करण्यात आलेले पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचाही समावेश होता.

    अनिल देशमुख यांनी महिन्याभरापूर्वी एका व्हिडिओच्या माध्यमातून सुप्रिम कोर्टाचा जो काही निकाल येईल, त्यानंतर मी ईडीच्या कार्यालयात जबाब देण्यासाठी हजर होईन, असे म्हटले होते. परंतु, आता सुप्रिम कोर्टाने याचिका फेटाळून लावल्यानंतर देशमुख यांनी वकीलामार्फत व्यक्तीशः हजर राहण्यापासून सूट मिळावी यासाठी ईडीपुढे याचिका दाखल केली आहे.

    BJP Leader Kirit Somaiya accuses Thackeray government For hiding Anil Deshmukh instead of handing him over to ED in 100 crore Corruption Case

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    हेमंत सोरेन यांना पुन्हा धक्का! ED कोर्टाने फेटाळला अंतरिम जामीन

    उज्ज्वल निकमांना उमेदवारी; म्हणे, पूनम महाजनांचा पत्ता कट; पण हा तर खरा त्या पलीकडचा “मास्टर स्ट्रोक”!!

    ‘ममता बॅनर्जींना अटक करा, अन् ‘TMC’ला दहशतवादी संघटना घोषित करा’