अमेरिकेचे परराष्ट्र सचिव अँटनी ब्लिंकन यांनी सुरक्षा परिषदेच्या बैठकीत दहशतवादावर केली टिप्पणी
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : इस्रायल-गाझा परिस्थितीवर सुरक्षा परिषदेच्या बैठकीत पाकिस्तानने काश्मीरचा केलेल्या उल्लेखास कोणतंही महत्त्व देणार नसल्याचं भारताने म्हटले आहे. संयुक्त राष्ट्रातील भारताचे उप-स्थायी प्रतिनिधी आर रवींद्र यांनी मंगळवारी ही माहिती दिली. संयुक्त राष्ट्रातील पाकिस्तानचे राजदूत मुनीर अक्रम यांनी पश्चिम आशियातील परिस्थितीवर सुरक्षा परिषदेच्या बैठकीत काश्मीरचा उल्लेख केला होता. Pakistan again mentions Kashmir in UNSC Know what is Indias reaction
रवींद्र म्हणाले, ‘एका प्रतिनिधीने सवयीने आपल्या देशाचा अभिन्न आणि अविभाज्य भाग असलेल्या केंद्रशासित प्रदेशांचा उल्लेख केला आहे. मी या टिप्पण्यांना जितके महत्त्व दिले पाहिजे तितकेच देईन आणि वेळ लक्षात घेता मी त्यावर प्रतिक्रिया देणार नाही.’
तत्पूर्वी, अमेरिकेचे परराष्ट्र सचिव अँटनी ब्लिंकन यांनी सुरक्षा परिषदेच्या बैठकीत सांगितले की, सर्व प्रकारच्या दहशतवादी कृत्ये बेकायदेशीर आणि अन्यायकारक आहेत, मग ती मुंबईतील लोकांना लक्ष्य करून लष्कर-ए-तैयबाने केली असतील किंवा किबुत्झ बेरी मध्ये हमासने नागरिकांना लक्ष्य केलेले असेल.
Pakistan again mentions Kashmir in UNSC Know what is Indias reaction
महत्वाच्या बातम्या
- द फोकस एक्सप्लेनर : भारताचा ड्रीम प्रोजेक्ट IMEEC ला सुरुवात, चीनच्या BRI ला देणार टक्कर, वाचा सविस्तर
- गाझाचा दावा, इस्रायली हल्ल्यात ७०० पॅलेस्टिनी एका रात्रीत मारले गेले!
- उद्धव ठाकरेंकडून जरांगे पाटलांचे कौतुक, तर छत्रपती शिवाजी महाराजांसमोर नतमस्तक होत मराठा आरक्षणाचे मुख्यमंत्री शिंदेंचे आश्वासन
- अनेक वर्षानंतर अभिनेता भरत जाधव यांचा रंगभूमीवर होणार आगमनं! वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला.