• Download App
    पाकव्याप्त काश्मीरमधील तथाकथित निवडणुकांवरून इम्रान खान अडचणीत Opposition parties targets Imran Khan

    पाकव्याप्त काश्मीरमधील तथाकथित निवडणुकांवरून इम्रान खान अडचणीत

    विशेष प्रतिनिधी

    इस्लामाबाद – भारताने रद्दबातल ठरविलेल्या पाकव्याप्त काश्मीरमधील तथाकथित निवडणुकांवरून आता पाकिस्तानमध्ये राजकारण झडू लागले आहे. या निवडणुकीत इम्रान खान यांच्या पक्षाने गैरमार्गाने विजय मिळवल्याचा आरोप विरोधकांनी करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे इम्रान खान यांच्या अडचणीँत वाढ होणार आहे. Opposition parties targets Imran Khan

    पाकव्याप्त काश्मीरमध्ये नुकत्याच घेतलेल्या निवडणुकांबद्दल पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरुद्ध निदर्शने करण्याची घोषणा पाकिस्तान मुस्लीम लीग-नवाझ या मुख्य विरोधी पक्षाने घेतली आहे. या निवडणुकीत गैरप्रकार घडल्याचा आरोप करण्यात आला आहे.



    या निवडणुकीत इम्रान यांच्या पक्षाने सर्वाधिक २५ जागा जिंकत बहुमत संपादन केले. पाकिस्तान पीपल्स पार्टीला (पीपीपी) ११ जागा मिळाल्या. पीएमएल-एन पक्षाला केवळ सहा जागांवर समाधान मानावे लागले. निवडणुकीदरम्यान विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये हिंसक झटापटी झडल्या होत्या.

    पक्षाचे सरचिटणीस एहसान इक्बाल यांनी सांगितले की, आमच्या पक्षाचे उमेदवार पाकव्याप्त काश्मीरमधील आपापल्या मतदारसंघांमध्ये निदर्शने करतील. पहिल्या टप्प्यातील या कृतीनंतर पक्ष पुढील रणनीती ठरवेल. या निवडणुकीच्या तसेच सियालकोटमधील पोटनिवडणुकीच्या निकालांवरून इम्रान यांचे सरकार जनतेचे खरेखुरे प्रतिनिधित्व करीत नसल्याचे सिद्ध होते. हे सरकार जबरदस्तीने तसेच गैरप्रकारांच्या मार्गाने जनतेवर लादण्यात आले आहे.

    Opposition parties targets Imran Khan

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    सौदी अरेबिया-चीनचा पाकिस्तानवर दबाव, लष्कराला इम्रान यांच्याशी समेट करण्याची इच्छा, तुरुंगामध्ये मनधरणी सुरू

    अमेरिकेने युक्रेनला गुप्तपणे लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे दिली; रशियात 300 किमीपर्यंत हल्ल्यास सक्षम

    भारताशी व्यापार सुरू करण्याची पाक व्यावसायिकांची मागणी; PM शाहबाज शरीफ यांच्यावर आणला दबाव