विशेष प्रतिनिधी
न्यूझीलंड : महिला विश्वचषक संयत दमदार खेळी करत भारतीय क्रिकेट संघाने पाकिस्तानवर १०७ धावांनी विजय मिळवला आहे. भारताने पाकिस्तानसमोर २४५ धावांचे आव्हान उभे केले होते. हे आव्हान गाठताना पाकिस्तानी संघाला अवघ्या १३७ धावा करता आल्या. फक्त ४३ षटकांमध्ये पाकिस्तानचा पूर्ण संघ बाद झाला. India beat Pakistan in Women’s World
या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. राजेश्वरी गायकवाडने चार फलंदाजांना बाद करुन भारताच्या विजयावर शिक्का मोर्तब केले. झुलन गोस्वामी, स्नेह राणा, यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. तर मेघना सिंघ आणि दिप्ती शर्मा यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.
सुरुवातीला १२० धावांमध्ये पाच फलंदाज तंबूत परतल्यामुळे भारतीय संघ २०० धावातरी करु शकणार का अशी चिंता निर्माण झाली होती. मात्र पूजा वस्त्रकर आणि स्नेह राणा यांनी धडाकेबाज फलंदाजी केली. या दोन्ही खेळाडूंनी १२२ धावांची शतकी भागिदारी केल्यामुळे भारतीय संघ पाकिस्तानपुढे २४४ धावांचा डोंगर उभा करु शकला.
India beat Pakistan in Women’s World
महत्त्वाच्या बातम्या
- PM Modi Pune : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुणे दौर्यातला भर राजकारणावर नव्हे; विद्यार्थ्यांशी संवादावरच का ठेवला…??
- PM Modi Symbiosis : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सिंबायोसिसच्या विद्यार्थ्यांना दिला देशाच्या विकासाच्या थीमवर काम करण्याचा मंत्र!!
- आधुनिक सुविधा ही पुण्यातील लोकांची गरज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उदगार
- जवानाचा अंदाधुंद गोळीबार ; ४ ठार, ६ जखमी ;साथीदारांवर गोळ्या झाडून स्वत : लाही संपवले