• Download App
    इस्रायलमध्ये हमासने 'या' देशातील १७ नागरिकांना घेतले ताब्यात, आतापर्यंत ४० जणांचा झाला मृत्यू In Israel Hamas detained 17 citizens of Nepal country 40 people have died so far

    इस्रायलमध्ये हमासने ‘या’ देशातील १७ नागरिकांना घेतले ताब्यात, आतापर्यंत ४० जणांचा झाला मृत्यू

    रशिया आणि युक्रेनमधील युद्ध अजून संपले नव्हते तोच जगासमोर आणखी एक युद्ध आले आहे.

    विशेष प्रतिनिधी

    गाझा :  पॅलेस्टिनी सशस्त्र दहशतवादी संघटना हमास आणि इस्रायल यांच्यात युद्ध सुरू झाले आहे. रशिया आणि युक्रेनमधील युद्ध अजून संपले नव्हते तोच जगासमोर आणखी एक युद्ध आले आहे. हमास इस्रायलवर आकाशातून आणि जमिनीवरून हल्ले करत आहे. या हल्ल्यात आतापर्यंत ४० इस्रायली लोकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, हमासच्या दहशतवाद्यांनी एका देशातील १७ नागरिकांना बांधून ठेवल्याची मोठी बातमी समोर आली आहे. In Israel Hamas detained 17 citizens of Nepal country 40 people have died so far

    हमासच्या दहशतवाद्यांनी गाझा पट्टीतून इस्रायलच्या भूमीवर सात हजार रॉकेट डागले आहेत. या हल्ल्यात ४० जणांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर शेकडो लोक गंभीर जखमी झाले आहेत. तसेच हमासचे दहशतवादी इस्रायलमध्ये घुसले आहेत. यावर इस्रायलही सक्रिय झाले आणि त्यांनी युद्ध घोषित केले. यानंतर जेरुसलेमसह संपूर्ण इस्रायलमध्ये हवाई हल्ल्याचे सायरन वाजवण्यात आले. इस्रायलने प्रत्युत्तर दिले आहे.

    हमासने दोन तासांत पाच हजारांहून अधिक रॉकेट हल्ले केल्याने इस्रायलनेही केली युद्धाची घोषणा

    इस्रायलमधील नेपाळच्या राजदूताने एएनआयला सांगितले की, इस्रायलमध्ये सात नेपाळी जखमी आहेत आणि १७ नेपाळी नागरिकांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, गाझा शहरातून इस्रायलच्या हवाई दलाच्या डझनभर लढाऊ विमानांनी गाझा पट्टीत अनेक ठिकाणी हमास या दहशतवादी संघटनेच्या स्थानांवर हल्ले केल्याची बातमी आली आहे.

    In Israel Hamas detained 17 citizens of Nepal country 40 people have died so far

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार

    Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या