• Download App
    Sharad Pawar शरद पवार सोबत असते तर राष्ट्रपती झाले असते

    Sharad Pawar : शरद पवार सोबत असते तर राष्ट्रपती झाले असते; आताही त्यांचे स्वागतच; केंद्रीय मंत्र्याचे विधान

    Sharad Pawar

    विशेष प्रतिनिधी

    जालना : Sharad Pawar  शरद पवार महायुतीसोबत असते तर आज राष्ट्रपती झाले असते. आताही त्यांचे स्वागतच आहे, असे महत्वपूर्ण विधान केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी गुरुवारी येथे बोलताना केले. राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या एकीकरणाची चर्चा रंगली आहे. या पार्श्वभूमीवर आठवले यांनी विधान केल्यामुळे त्याला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.Sharad Pawar

    रामदास आठवले गुरुवारी जालन्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी उपरोक्त मत व्यक्त केले. ते म्हणाले, शरद पवार आमच्यासोबत आले असते तर आज या देशाचे राष्ट्रपती झाले असते. आताही त्यांचे स्वागतच आहे. शरद पवार व अजित पवार एकत्र होते. आजही ते एकत्रच आहेत. अजित पवारांचे एकच म्हणणे होते की, तुम्हाला शिवसेना चालते तर मग भाजप का चालत नाही?



    शरद पवारांचे आजही स्वागतच

    शरद पवारांसारखा माणूस आमच्यासोबत आला असता तर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खांद्याला खांदा लावून देशाच्या प्रगतीसाठी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी काम केले असते. कदाचित ते राष्ट्रपतीही झाले असते. अजूनही ती वेळे गेली नाही. शरद पवार व अजित पवार हे एकत्र आले आणि त्यांचा एनडीएला पाठिंबा मिळत असेल तर शरद पवारांचे स्वागतच आहे, असे ते म्हणाले.

    ..तर मला व प्रकाश आंबेडकरांना एकत्र यावे लागेल

    रामदास आठवले यांनी यावेळी राज व उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य युतीवरही भाष्य केले. ते म्हणाले, उद्धव ठाकरे व राज ठाकरे आणि शरद पवार व अजित पवार एकत्र येत असतील तर मला व प्रकाश आंबेडकर यांनाही एकत्र यावे लागेल. पण मला असे वाटते की राज व उद्धव ठाकरे एकत्र येणार नाहीत. आले तरी त्यामुळे महाविकास आघाडीत फूट पडेल आणि त्याचा अप्रत्यक्ष फायदा आम्हाला मिळेल. या दोघा भावांना एकत्र यायचे असेल तर यावे. पण त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात फारसा फायदा होणार नाही, असे आठवले म्हणाले.

    डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी फेटाळली

    रामदास आठवले यांनी यावेळी भारत-पाक वादात अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी जोरदारपणे फेटाळून लावली. पाक हा अतिरेक्यांना प्रोत्साहन देणारा देश आहे. आम्हाला डोनाल्ड ट्रम्प यांच्याविषयी आदर आहे. पण पाकव्याप्त काश्मीर भारताच्या ताब्यात आलेच पाहिजे. त्यासाठी युद्ध केले पाहिजे. वेळ आली तर पाकलाही ताब्यात घेतले पाहिजे, ही भूमिका मी अनेकदा मांडली. आम्हाला डोनाल्ड ट्रम्प किंवा इतर कोणत्याही नेत्याची मध्यस्थी नको आहे. पाकने दहशतवादी कारवाया थांबवून पीओके आम्हाला दिला तर भारत थेट पाकशी चर्चा करण्यास तयार आहे. यामुळे युद्धाची गरजच भासणार नाही, असे ते म्हणाले.

    If Sharad Pawar was with us, he would have become the President; He is still welcome; Union Minister’s statement

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Donald Trump : भारत-पाकिस्तान युद्धविरामावर डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी; मध्यस्थीचा दावा मागे

    Waqf Act : वक्फ कायद्याविरुद्धच्या याचिकेवर 20 मे रोजी सुनावणी; केंद्राने म्हटले- यथास्थिती कायम राहील

    Trump : 84 कोटींचे बक्षीस असलेल्या दहशतवादी अल-शाराला भेटले ट्रम्प; माजी अल कायदा दहशतवाद्याला सक्षम म्हटले