विशेष प्रतिनिधी
डेनव्हर – कोलोरॅडो राज्यातील डेनव्हरच्या जंगलातील आगीच्या ज्वाळांमध्ये परिसरातील सुमारे ५८० घरे, हॉटेल आणि एक व्यापारी संकुल भस्मसात झाले आहे. त्यामुळे हजारो रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.Huge fire in USA forest
कोलोरॅडोच्या जंगलात हा वणवा गुरुवारी भडकला. ६.५ वर्ग किलोमीटर परिसरात आग फैलावल्याने अनेक भाग धुराने गुदमरले आहेत. आकाशात आगीच्या ज्वाळा दिसत आहेत.या परिसरात १६९ किलोमीटर प्रती तीस वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे वणव्याची व्याप्ती वाढणार असल्याने नागरिकांना त्याचा मोठा फटका बसण्याची भीती आहे.
यामध्ये मृत्यू व जखमींची संख्याही वाढू शकेल. ही आग एवढी भीषण आहे की, ती तातडीने नियंत्रणात येणे अवघड आहे. वणव्यामुळे लुईसव्हिले हे २१ हजार लोकसंख्येचे शहर रिकामे करण्याचा आदेश दिला आहे. याआधी सुपिरियर शहर सोडण्याचा आदेश नागरिकांना देण्यात आला होता. तेथील लोकसंख्या १३ हजार आहे. हे शहर डेनव्हरच्या उत्तर- पश्चिमेकडे साधारणपणे ३२ किलोमीटर अंतरावर आहे.
Huge fire in USA forest
महत्त्वाच्या बातम्या
- मुस्लिमांबद्द विद्वेष पसरविणाऱ्या हिंदूत्ववादी नेत्यांचा जाहीर निषेध करावा, देशातील शंभर मान्यवरांचे राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना पत्र
- पाकिस्तान आणि चीनवर एकाच वेळी ठेवता येणार नजर, पंजाबमध्ये एस-४०० क्षेपणास्त्र युनिट तैनात
- स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरीनिमित्त ७५ कोटी लोक घालणार सूर्यनमस्कार, केंद्रीय अनुदान आयोगाचे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनाही सहभागी होण्याचे आवाहन
- राजकारणासाठी अर्थकारण पणाला, अखिलेश यादव यांनी उत्तर प्रदेशात केली मोफत वीजेची घोषणा
- मनी लाँड्रिंग प्रकरणातील आरोपी सुकेश चंद्रशेखरने दिली जॅकलीनसोबतच्या संबंधांची कबुली