• Download App
    तालिबानच्या सरकारला मान्यता देण्याची चीनची तयारी, अमेरिकेचे सैन्य पुन्हा अफगाणिस्तानात China ready to accept Taliban govt. in Afghanistan

    तालिबानच्या सरकारला मान्यता देण्याची चीनची तयारी, अमेरिकेचे सैन्य पुन्हा अफगाणिस्तानात

    विशेष प्रतिनिधी

    न्यूयॉर्क – अफगणिस्तानच्या संपूर्ण भूमीवर जर तालिबानने कब्जा मिळविला तर चीन त्यांच्या सरकारला मान्यता देण्याच्या तयारीत आहे, असा दावा अमेरिकेतील एका वृत्तसंकेतस्थळावरील वृत्तात केला आहे. China ready to accept Taliban govt. in Afghanistan

    अमेरिकी गुप्तचर विभागाच्या सूत्रांचा हवाला देत या वृत्तात म्हटले आहे की, चीनी अफगाणिस्तान सरकार व तालिबानमध्येह शांतता करार व्हावा, अशी चीनची अपेक्षा आहे. पण गोपनीय माहितीनुसार अफगाणिस्तानमधील वास्तव परिस्थिती पाहता तालिबानबरोबर औपचारिक संबंध प्रस्थापित करण्याणची तयारी चीन सरकारने सुरू केली आहे.


    दरम्यान, अफगाणिस्तानमधील अमेरिकी दूतावासातील अधिकाऱ्यांना बाहेर काढण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन प्रशासनाने पाठविलेले तीन हजार सैनिक काबूल विमानतळावर पोचले. उर्वरित सैनिक रविवारी येथे येणार आहे. या तैनातीमुळे अमेरिकेची सैन्य वापसीची ३१ ऑगस्टची मुदत पाळली जाणार का, याबद्दल प्रश्नरचिन्ह निर्माण झाले आहे. अफगाणिस्तानमध्ये नव्याने सैन्य पाठविण्याचा अर्थ अमेरिका पुन्हा तालिबानशी युद्ध करणार आहे, असा नाही. ही एक तात्पुरत्या स्वरूपाची मोहीम आहे, असे पेंटागॉनचे मुख्य प्रवक्ते जॉन किर्बी यांनी सांगितले.

    China ready to accept Taliban govt. in Afghanistan

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Trump : ट्रम्प यांनी होर्मुझमधील 20% कर आकारण्याचा निर्णय मागे घेतला; इराणने उपहास करत म्हटले- आम्ही थोडे कमी घेऊ

    Vietnam Boat : व्हिएतनाममध्ये 15 भारतीयांच्या मृत्यूनंतर बोट-कॅप्टनला अटक; कंपनीच्या रिवॉर्ड ट्रिपवर पर्यटक गेले होते; कुटुंबांना टीव्हीवरून बातमी मिळाली

    South China Sea : दक्षिण चीन समुद्राबाबत 14 देशांच्या निवेदनावर चीन संतापला; जपानी राजदूताला म्हटले- सागरावरील आमचे सार्वभौमत्व कधीही बदलले नाही