• Download App
    2006 मुंबई ट्रेन बॉम्बस्फोटाच्या मास्टरमाइंडचा पाकिस्तानमध्ये मृत्यू; आझम चिमा लष्कर-ए-तैयबाचा होता गुप्तचर प्रमुख होता|2006 Mumbai train bombing mastermind dies in Pakistan; Azam Cheema was the intelligence chief of Lashkar-e-Taiba

    2006 मुंबई ट्रेन बॉम्बस्फोटाच्या मास्टरमाइंडचा पाकिस्तानमध्ये मृत्यू; आझम चिमा लष्कर-ए-तैयबाचा होता गुप्तचर प्रमुख होता

    वृत्तसंस्था

    इस्लामाबाद : दहशतवादी आझम चिमा याचा पाकिस्तानमध्ये मृत्यू झाला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फैसलाबादमध्ये 70 वर्षीय चीमाला हृदयविकाराचा झटका आला. तो लष्कराच्या गुप्तचर शाखेचा प्रमुख होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, चिमा 2006 च्या मुंबई ट्रेन बॉम्बस्फोटाचा मास्टरमाइंड होता. 26/11 च्या हल्ल्यातही त्याचा हात होता2006 Mumbai train bombing mastermind dies in Pakistan; Azam Cheema was the intelligence chief of Lashkar-e-Taiba

    11 जुलै 2006 रोजी मुंबईच्या पश्चिम उपनगरी भागात रेल्वेच्या 7 डब्यांमध्ये बॉम्बस्फोट झाले होते. यामध्ये 189 प्रवाशांचा मृत्यू झाला, 824 जण जखमी झाले आहेत. संध्याकाळी 6.24 ते 6.35 च्या दरम्यान हे स्फोट झाले. मुंबईच्या लोकल ट्रेनमधून लाखो प्रवासी काम संपवून घरी परतण्याची हीच वेळ होती.



    2008 मध्ये मुंबईत दहशतवादी हल्ला झाला होता. 10 दहशतवाद्यांनी मिळून ही कारवाई केली. या हल्ल्यात 166 जणांचा मृत्यू झाला होता. मृतांमध्ये अमेरिका आणि ब्रिटनच्या नागरिकांचाही समावेश आहे.

    26 नोव्हेंबर 2008 च्या रात्री कुलाब्याच्या किनाऱ्यावरून पाकिस्तानची दहशतवादी संघटना लष्करचे 10 दहशतवादी बोटीतून भारतात घुसले होते. ते पूर्णपणे सशस्त्र होते. येथून हे सर्व दहशतवादी दोन गटांत विभागले गेले आणि वेगवेगळ्या दिशेने गेले. यापैकी दोन दहशतवाद्यांनी दक्षिण मुंबईतील कुलाबा येथील लिओपोल्ड कॅफेला लक्ष्य केले होते, दोन दहशतवाद्यांनी नरिमन हाऊसला लक्ष्य केले होते, तर उर्वरित दोन दहशतवाद्यांनी छत्रपती शिवाजी टर्मिनस, हॉटेल ट्रायडेंट ओबेरॉय आणि ताज हॉटेलच्या दिशेने कूच केले होते.

    2006 Mumbai train bombing mastermind dies in Pakistan; Azam Cheema was the intelligence chief of Lashkar-e-Taiba

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Canada : कॅनडात मंदिराच्या भिंतीवर लिहिल्या खलिस्तानी घोषणा; नगर कीर्तनापूर्वी कारवाई

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार