Asaduddin Owaisi : राहुल गांधींनी ऑपरेशन सिंदूरबाबत केलेल्या विधानावरून ओवैसींचा काँग्रेसला टोला!
ऑपरेशन सिंदूरवरील राजकीय विरोध विसरून आयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी आणि शशी थरूर यांच्यासह सर्व विरोधी नेत्यांनी परदेशात भारताची बाजू जोरदारपणे मांडली आहे, परंतु काँग्रेस नेते राहुल गांधी या युद्धाला पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आत्मसमर्पण म्हणत आहेत. ओवेसी मंगळवारीच भारतात परतले आणि मायदेशी परतताच त्यांनी राहुल गांधींच्या विधानापासून स्वतःला दूर केले.