देवाभाऊंच्या पक्षाचा वरून पहिला नंबर, तर शरद पवारांच्या पक्षाचा खालून पहिला नंबर; राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या सोशल मीडियावर सामसूम!!
महाराष्ट्रातल्या नगरपरिषदा, नगरपंचायत यांच्या निवडणुकीत महायुतीने जोरदार बाजी मारत महाविकास आघाडीला धोबीपछाड दिली. पण ती साधी धोबीपछाड नव्हे, तर आकड्यांच्या हिशेबात महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांचा सुपडा साफ केला.