• Download App
    Maharashtra Latest News - Breaking news | Focus India

    आपला महाराष्ट्र

    CM Fadnavis : मंत्री नरहरी झिरवाळांना क्लीन चिट, लाचखोरी प्रकरणात मंत्र्यांचे नाव नाही, फडणवीसांचे स्पष्टीकरण

    अन्न आणि औषध प्रशासन विभागातील कर्मचारी राजू ढेरिंगे याला लाच घेताना रंगेहात पकडल्याच्या घटनेनंतर अडचणीत आलेले मंत्री नरहरी झिरवाळ यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी क्लीन चिट दिली आहे. या लाचखोरी प्रकरणात संबंधित मंत्र्यांविरोधात कोणताही ठोस पुरावा समोर आला नसल्याचे स्पष्ट करत, जर पुरावे उपलब्ध असतील तर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग स्वतःहून योग्य ती कारवाई करते, असे प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

    Read more

    Vijay Wadettiwar : विजय वडेट्टीवार म्हणाले- अजित पवारांचा अपघात की घातपात? सरकारकडून दोन ओळींत स्पष्टीकरण, मग आम्ही चहापानाला का जायचं?

    महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात झालेला मृत्यू हा केवळ अपघात आहे की त्यामागे काही घातपात दडलाय? यावर सरकारने मौन सोडून स्पष्टीकरण द्यावे. देशात यावर चर्चा सुरू असताना सरकार केवळ दोन ओळींच्या स्पष्टीकरणात बोळवण का करत आहे?” असा संतप्त सवाल विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे.

    Read more

    Mahayuti’s Resolve : अजितदादांचे स्वप्न पूर्ण करणार; अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महायुतीचा निर्धार

    महाराष्ट्रात सोमवारपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे. अधिवेशनाच्या पूर्वी आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली.

    Read more

    CM Devendra Fadnavis : अजित पवार विमान अपघात प्रकरणी CM देवेंद्र फडणवीस म्हणाले-13 निर्धारित मुद्यांवर सध्या चौकशी सुरू

    राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा 28 जानेवारी रोजी विमान अपघातात मृत्यू झाला होता. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली होती. तसेच अजित पवारांच्या विमान अपघातावर अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 13 निर्धारित मुद्यांवर सध्या चौकशी सुरू असल्याचे फडणवीसांनी सांगितले.

    Read more

    शरद पवारांच्या संसदीय कारकिर्दीची 60 वर्षे; सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या सोशल मीडिया पोस्ट, पण “विलीनीकरण” हा शब्दच नाही त्यात…!!

    शरद पवारांच्या संसदीय कारकिर्दीने आज साठी मध्ये पदार्पण केले. 1967 मध्ये ते विधानसभेवर निवडून पहिल्यांदा आमदार झाले त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. त्यांच्या संसदीय निवडणुकीत एकदाही पराभव झाला नाही. ते संसदीय परंपरेतल्या विधानसभा, विधान परिषद, लोकसभा आणि राज्यसभा अशा चारही सभागृहांचे सदस्य राहिले. बारामती पासून ते दिल्ली पर्यंत शरद पवार हे व्यक्तिमत्व कायम माध्यमांच्या चर्चेत राहिले. पंतप्रधान पदाची स्पर्धेपासून ते राज्यसभा सदस्यत्वासाठी धडपड या सगळ्या पातळ्यांवर शरद पवारांची चर्चा झडली

    Read more

    पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांची महाविकास आघाडीच्या बैठकीला दांडी; पार्थ पवार जमीन घोटाळ्यावर उत्तरे देताना शिवसेना आणि काँग्रेसच्या नेत्यांची अडचण!!

    नाशिक : विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्यापूर्वी आज विरोधी पक्षांनी मुंबईत एकत्रित बैठक घेतली, पण महाविकास आघाडीच्या या बैठकीला शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांनी दांडी मारली. […]

    Read more

    Shatrughan Sinha : शत्रुघ्न सिन्हा यांच्या बाजूने मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय;‘खामोश’ डायलॉग, नाव-आवाज-फोटोच्या गैरवापरावर बंदी

    बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते आणि राजकारणी शत्रुघ्न सिन्हा यांनी त्यांच्या व्यक्तिमत्त्व हक्कांच्या संरक्षणासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. आज, म्हणजेच 21 फेब्रुवारी 2026 रोजी, उच्च न्यायालयाने त्यांच्या याचिकेवर सुनावणी केल्यानंतर एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे, ज्यात म्हटले आहे की, अभिनेत्याचा प्रसिद्ध संवाद ‘खामोश’ त्यांच्या व्यक्तिमत्त्वाशी विशेषतः जोडलेला आहे आणि तो त्यांच्या नाव, आवाज किंवा चित्रासोबत परवानगीशिवाय वापरला जाऊ शकत नाही.

    Read more

    शरद पवार गटाला वगळून उद्धव ठाकरे आणि काँग्रेस यांच्यात परस्पर चर्चा; राज्यसभा आणि विधान परिषदेचे गणित बसवायची तयारी

    नाशिक : एकीकडे शरद पवार आजारी असताना आणि तरीसुद्धा शरद पवार गटाने त्यांच्याच नावाचा आग्रह राज्यसभेसाठी धरला असताना उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या नेत्यांनी मात्र परस्पर […]

    Read more

    त्याग, पराक्रम आणि सेवा हे गुण समाजघडणीसाठी आवश्यक; नारी तू नारायणी परिषदेत डॉ. अनघा लवळेकर यांचे प्रतिपादन

    त्याग, पराक्रम आणि सेवा समाजघडणीसाठी आवश्यक आहे. महिलांमध्ये ऋजुता असते.त्यामुळे सेवेची प्रेरणा मुळातच त्यांच्या अंगी असते.

    Read more

    Maharashtra Recruitment : ५६१२ प्राध्यापकांची महाभरती, महाविद्यालयांमधील ५०१२ तर विद्यापीठांमधील ६०० पदांचा मार्ग मोकळा

    राज्यातील उच्च शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी) २०२० ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमधील रिक्त असलेली ५०१२ सहायक प्राध्यापकांची आणि विद्यापीठांमधील ६०० अशा एकूण ५६१२ पदांची भरती प्रक्रिया येत्या जूनमध्ये नवीन शैक्षणिक सत्र सुरू होण्यापूर्वी पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी (२१ फेब्रुवारी) येथे दिली.

    Read more

    Sanjay Raut : आदित्य ठाकरेंच्या भूमिकेवर संजय राऊत म्हणाले – ते मोठे नेते, त्यांचा मुद्दा गांभीर्याने घेतला पाहिजे

    संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राज्यसभेत जावे, अशी भूमिका मांडली होती. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. मात्र त्याच वेळी युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी राज्यसभेची जागा शिवसेना ठाकरे गटालाच मिळाली पाहिजे,

    Read more

    Dada Bhuse : संजय राऊत यांच्या दिलगिरीनंतर दादा भुसेंकडून अब्रुनुकसानीचा दावा मागे; कोर्टात समझोता

    मालेगाव येथील न्यायालयात शनिवारी घडलेल्या घडामोडींनी राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना सुरुवात झाली. मंत्री दादा भुसे यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या खटल्याच्या सुनावणीसाठी खासदार संजय राऊत स्वतः उपस्थित राहिले. मात्र यावेळी वातावरण आधीपेक्षा वेगळे होते. न्यायालयीन प्रक्रियेनंतर दोन्ही नेत्यांनी एकत्र येत माध्यमांशी संवाद साधला आणि वादावर पडदा टाकल्याची घोषणा केली.

    Read more

    Sharad Pawar : शरद पवारांनाच संसदेत पाठवायची अजितदादांची इच्छा होती, रोहित पवारांचा दावा

    देशातील ३७ आणि महाराष्ट्रातील ७ राज्यसभेच्या जागांसाठी पुढील महिन्यात निवडणूक होत आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (शरद पवार गट) उमेदवारीवरून मोठे दावे-प्रतिदावे सुरू झाले आहेत. आमदार रोहित पवार यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन एक खळबळजनक खुलासा केला. “अजितदादांना शरद पवारांनीच राज्यसभेवर जावे अशी इच्छा होती,” असे म्हणत त्यांनी खासदार अमोल कोल्हे यांनी केलेला छगन भुजबळांच्या उमेदवारीचा दावा खोडून काढला आहे.

    Read more

    Rohit Pawar : अजितदादांना मोदी, शहाच न्याय देऊ शकतात, रोहित पवारांनी केली उड्डयण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

    राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आज पुन्हा एकदा राष्ट्रीय राजधानी असणाऱ्या नवी दिल्लीत एक पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी केंद्रातील मोदी सरकारला पाठिंबा देणाऱ्या तेदेपाचे व्हीएसआर विमान कंपनीशी साटेलोटे असल्याचा आरोप करत केंद्रीय नागरी उड्डयण मंत्री राममोहन नायडू यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

    Read more

    Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख हत्या प्रकरण- फरार कृष्णा आंधळे तीनदा गावी येऊन गेला, धनंजय देशमुख यांचा दावा

    संतोष देशमुख हत्याकांडातील फरार आरोपी कृष्णा आंधळे हा आतापर्यंत 3 वेळा मस्साजोगला येऊन गेल्याची धक्कादायक बाब आज समोर आली. त्यामुळे पीडित देशमुख कुटुंबीयांनी त्याच्यापासून आपल्या जिवाला धोका असल्याचा दावा करत सुरक्षेची मागणी केली आहे.

    Read more

    पिंपरी-चिंचवडमध्ये “अजित सृष्टी”उभारणीला महापालिकेची मंजुरी; भाजप आमदार महेश लांडगेंचा पुढाकार

    पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांच्या एकमताने दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी “अजित सृष्टी” उभारण्याचा प्रस्ताव मान्य झाला.

    Read more

    आजोबांचा नातवाकरवी सुनेकडे राज्यसभेसाठी वशिला!!

    आजोबांचा नातवाकरवी सुनेकडे राज्यसभेसाठी वशिला!!, हेच राजकीय चित्र आज दिल्लीतून समोर आले. शरद पवारांच्या राज्यसभा उमेदवारी विषयी गेले

    Read more

    Nagpur Anganwadi : नागपुरात 4 वर्षीय मुलगा रात्रभर अंगणवाडीतच, आई-वडिलांसह पोलिसांची शोधाशोध, अखेर वर्गखोलीतच आढळला

    एक 4 वर्षीय चिमुरडा अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या चुकीमुळे रात्रभर वर्गखोलीतच कुलुपबंद अवस्थेत अडकल्याची भयंकर बाब उजेडात आली आहे. या प्रकरणी मुलाच्या आई-वडिलांनी पोलिसांकडे धाव घेतल्यानंतर त्याचा कसून शोध घेण्यात आला. अखेर पोलिसांच्या सूचनेनुसार, शाळेचे कुलूप उघडण्यात आल्यानंतर हा मुलगा अंगणवाडीतच भीतीने थरथरत बसल्याचे दिसून आले. या घटनेमुळे पालकवर्गात एकच खळबळ माजली आहे.

    Read more

    मोदी – शाहांना चुचकारा, भाजपच्या मित्रपक्षांना डिवचा; विलीनीकरण फसल्याच्या डावाचे वड्याचे तेल वांग्यावर काढा!!

    मोदी – शाहांना चुचकारा, भाजपच्या मित्रपक्षांना डिवचा आणि विलीनीकरण फसल्याच्या डावाचे वड्याचे तेल वांग्यावर काढा!!, असलाच प्रकार रोहित पवारांच्या आजच्या दिल्लीतल्या पत्रकार परिषदेतून समोर आला.

    Read more

    शरद पवार महाविकास आघाडीचे उमेदवार असतील, तर नाड्या काँग्रेस हायकमांडच्या हातात!!; राष्ट्रवादीचे उमेदवार असतील, तर नाड्या भाजपच्या हातात!!

    राज्यसभा निवडणुकीसाठी शरद पवार महाविकास आघाडीचे उमेदवार असतील तर नाड्या काँग्रेस हायकमांडच्या हातात आणि ते जर सुनेच्या पाठिंब्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असतील, तर नाड्या भाजपच्या हातात!!, हीच शरद पवारांच्या राजकीय कारकीर्दीच्या अखेरच्या निवडणुकीतली खरी गोष्ट असेल.

    Read more

    AI फॉर एग्रीकल्चर वर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा AI इंडिया समिटमध्ये विशेष संवाद!!; महाराष्ट्राचे मॉडेल स्वीकारले संपूर्ण देशाने!!

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026’ येथे ‘AI फॉर ॲग्रीकल्चर: स्केलिंग इंटेलिजेंस फॉर फूड अँड क्लायमेट रेझिलियन्स’ या विषयावर संवाद साधला.

    Read more

    राज्यसभा निवडणुकीत महायुतीचे सहा उमेदवार निवडून येणे पक्के; उरलेला एक उमेदवार महाविकास आघाडीने ठरवावा!; फडणवीसांनी मारली पाचर

    राज्यसभा निवडणुकीत महायुतीचे सहा उमेदवार निवडून येणे पक्के आहे; उरलेला एक उमेदवार महाविकास आघाडीने ठरवावा!!, अशा स्पष्ट शब्दांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यसभा निवडणुकीतले चित्र स्पष्ट केले. त्यामुळे शरद पवार महाविकास आघाडीचे राज्यसभा उमेदवार म्हणून उभे राहणार की कुठला वेगळाच मार्ग अवलंबणार??, यावर दाट संशय निर्माण झाला.

    Read more

    महाराष्ट्रातल्या राजकीय धबडग्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मात्र दिल्लीतल्या AI समिटमध्ये मुशाफिरी; महाराष्ट्रासाठी महत्त्वपूर्ण करार आणि घोषणा

    एकीकडे महाराष्ट्रात दोन राष्ट्रवादींच्या विलीनीकरणावरून राजकीय घमासान सुरू असताना तसेच ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये दरार पैदा झाली असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र महाराष्ट्राच्या राजकारणातल्या धबडग्याच्या पलीकडे जाऊन राजधानी दिल्लीतल्या भारत मंडप मध्ये सुरू असलेल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI समिटमध्ये महाराष्ट्रासाठी मोठी मुशाफिरी केली

    Read more

    Ganesh Naik : मंत्री गणेश नाईक म्हणाले- मराठी लोकांनी गुजरातमध्ये जाऊन व्यवसाय करावा, गुजराती लोकांनीच इकडे यावे असे काही नाही

    मुंबईत ते गुजरात असा बुलेट ट्रेनचा मोठा प्रकल्प येणाऱ्या काळात सुरू होणार आहे. यावरून गुजराती लोक मुंबईत येऊन व्यवसाय सुरू करणार आणि मराठी माणसाला मुंबईच्या बाहेर जावे लागणार अशी टीका विरोधकांनी केली आहे. यावर आता भाजप नेते व मंत्री गणेश नाईक यांनी मोठे विधान केले आहे. येत्या काळात बुलेट ट्रेन सारखा मोठा प्रकल्प सुरू होणार असून यातून गुजरातमधील लोकांनी महाराष्ट्रात येऊ नये तर महाराष्ट्रातील लोकांनी देखील गुजरातमध्ये जाऊन व्यवसाय सुरू करावे, असे नाईक यांनी म्हटले आहे.

    Read more

    Chhagan Bhujbal : रोहित पवारांच्या दाव्यावर भुजबळांचा टोला- उपमुख्यमंत्री कोण, राष्ट्रीय अध्यक्ष कोण, हेही ठरले असेल

    दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्यास संघटनेत मोठे बदल होतील, असा दावा आमदार रोहित पवार यांनी केला होता. त्यांच्या मते, दिवंगत नेते अजित पवार यांना नेतृत्वात फेरबदल करायचे होते आणि प्रदेशाध्यक्षपदी तरुण चेहरा द्यायचा होता. त्यासाठी अमोल कोल्हे यांच्या नावाची चर्चा झाली होती. या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. आता या दाव्यावर अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया देत रोहित पवार यांच्या भूमिकेची खिल्ली उडवली आहे.

    Read more