Devendra Fadnavis : दावोसमध्ये पहिल्याच दिवशी 6,25,497कोटींचे सामंजस्य करार, महाराष्ट्राच्या विकासाला मोठा बुस्ट : देवेंद्र फडणवीस
दावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे काल रात्री उदघाटन झाल्यानंतर आज पहिल्याच दिवशी महाराष्ट्राने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात विक्रमी 6 लाख 25 हजार 497 कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार केले आहेत. यातून सुमारे 1 लाखाच्या वर इतकी रोजगारनिर्मिती होणार आहे. यातील एकच करार 3 लाख कोटींचा असून हा जेएसडब्ल्यू यांच्यासोबत करण्यात आला आहे. तो स्टील, नवीनीकरणीय ऊर्जा, पायाभूत सुविधा, सिमेंट, लिथियम-आयर्न बॅटरिज, सोलर वेफर आणि सेल मॉड्युल्स इत्यादी क्षेत्रात करण्यात आला आहे.