Donald Trump : अमेरिका-इराण युद्ध थांबणार? सामंजस्य करारावर स्वाक्षरी; पण ट्रम्प यांच्या विधानामुळे नवा सस्पेन्स
गेल्या काही महिन्यांपासून मध्य पूर्वेत सुरू असलेल्या अमेरिका-इराण संघर्षाबाबत मोठी घडामोड समोर आली आहे. दोन्ही देशांनी युद्ध थांबवण्यासाठी सामंजस्य करारावर (एमओयू) स्वाक्षरी केल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे चार महिन्यांपासून सुरू असलेल्या तणावाला पूर्णविराम मिळण्याची शक्यता निर्माण झाली असली, तरी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ताज्या वक्तव्यामुळे या कराराबाबतचा सस्पेन्स आणखी वाढला आहे.