• Download App
    Trump Warns ट्रम्प म्हणाले- इराण सुधारला नाही तर त्याचे अस्तित्वच संपेल; अमेरिकेचा इराणच्या 10 लष्करी तळांवर हल्ला; इराणचा कुवेत, बहरीनवर पलटवार

    Trump Warns : ट्रम्प म्हणाले- इराण सुधारला नाही तर त्याचे अस्तित्वच संपेल; अमेरिकेचा इराणच्या 10 लष्करी तळांवर हल्ला; इराणचा कुवेत, बहरीनवर पलटवार

    Trump Warns

    वृत्तसंस्था

    तेहरान : Trump Warns अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे की, इराणने आपली वर्तणूक सुधारली नाही, तर त्याचे अस्तित्वच संपेल. ‘ट्रुथ सोशल’वर (Truth Social) पोस्ट करताना ते म्हणाले, इराण कधीच बदलणार नाही असे दिसते, परंतु आता आम्ही संयम बाळगू शकत नाही. अशी वेळ येऊ शकते जेव्हा आम्हाला अत्यंत यशस्वीरीत्या सुरू केलेली लष्करी मोहीम पूर्ण करावी लागेल. तसे घडल्यास, इराणचे अस्तित्वच संपेल.Trump Warns

    दुसरीकडे, अमेरिकेच्या ‘सेंट्रल कमांड’ने (CENTCOM) दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेच्या नौदलाने इराणच्या १० लष्करी तळांवर हल्ले केले. ‘सेंटकॉम’ने स्पष्ट केले की, हे हल्ले ‘स्ट्रेट ऑफ होर्मुझ’जवळील इराणच्या ठिकाणांवर करण्यात आले. ‘एम/टी किकू’ (M/T Kiku) या तेलवाहू जहाजावर इराणने केलेल्या ड्रोन हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई करण्यात आली.Trump Warns



    दरम्यान, इराणच्या ‘इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स’ने (IRGC) दावा केला आहे की, त्यांनी क्षेपणास्त्रे आणि ड्रोनचा वापर करून कुवेतच्या ‘अली अल सालेम एअर बेस’ आणि बहरीनमधील अमेरिकेच्या नौदलाच्या ‘फिफ्थ फ्लीट’च्या तळावर हल्ले केले आहेत.

    अमेरिकेने इराणवर पुन्हा हवाई हल्ले केले

    अमेरिकेने शुक्रवारी एक तास इराणच्या क्षेपणास्त्र, ड्रोन ठिकाणांवर आणि किनारी रडार साइट्सवर हवाई हल्ले केले. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, इराणने युद्धविराम मोडला होता, त्यामुळे ही कारवाई करण्यात आली.

    इराणचा अमेरिकन ठिकाणांवर प्रतिहल्ला

    इराणच्या रेव्होल्यूशनरी गार्ड (IRGC) ने दावा केला की, त्यांनी अमेरिकन हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून प्रदेशातील अमेरिकन लष्करी ठिकाणांना लक्ष्य केले. मात्र, कोणत्या ठिकाणांवर हल्ला झाला, याची माहिती देण्यात आली नाही.

    होर्मुज सामुद्रधुनीमध्ये तेल टँकरवर हल्ला

    ब्रिटनच्या सागरी सुरक्षा एजन्सी UKMTO नुसार, होर्मुज सामुद्रधुनीतून जाणाऱ्या एका तेल टँकरवर हल्ला झाला. जहाजाच्या कंट्रोल रूमला नुकसान झाले आहे, परंतु सर्व चालक दलाचे सदस्य सुरक्षित आहेत आणि तेल गळतीची माहिती नाही.

    खामेनेई यांच्या अंत्यसंस्काराची तयारी

    इराणमध्ये सर्वोच्च नेते अली खामेनी यांच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू आहे. रिपोर्टनुसार, गर्दी आणि सुरक्षेचा विचार करता त्यांचे पार्थिव शरीर रस्त्याने नेण्याऐवजी हेलिकॉप्टरने किंवा लष्करी विमानाने नेण्यावर विचार केला जात आहे.

    US Hits 10 Iranian Bases After Tanker Attack; Trump Warns Iran ‘Will Cease to Exist’

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Tabriz Missile : अमेरिकेचा इराणवर सलग 9 व्या रात्री हल्ला; ‘ताब्रिज’ क्षेपणास्त्र संकुलाला लागली आग, इराकमध्ये अमेरिकन सैनिकाचा मृत्यू

    Trump : अमेरिकेतून 18 हजार भारतीय डिपोर्ट होणार; अपील करण्याचीही संधी नाही; ट्रम्प सरकारने 2025 मध्ये भारतीयांना बेड्या घालून पाठवले होते

    Pakistan Plans : गिलगिट-बाल्टिस्तानला 5वे राज्य बनवण्याच्या तयारीत पाकिस्तान; विधानसभेत ठराव मंजूर, संसदेकडून घटनादुरुस्तीची मागणी