• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 94 of 1317

    Pravin Wankhade

    Syrian government : सीरियात महिलांसाठी नवा ड्रेसकोड; समुद्रकिनाऱ्यावर संपूर्ण शरीर झाकणे अनिवार्य; पुरुषांनाही शर्टलेसला मनाई

    सीरिया सरकारने मंगळवारी पुरुष आणि महिलांसाठी एक नवीन ड्रेस कोड लागू केला. या अंतर्गत, महिलांना आता समुद्रकिनाऱ्यावर पूर्ण कपडे घालणे बंधनकारक असेल.

    Read more

    Raj Thackeray : वाढदिवशी भेटणार नाही, कोणतेही अर्थ काढू नका, राज ठाकरे यांचे पत्र

    महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा वाढदिवस 14 जून रोजी आहे. वाढदिवशी भेटणार नाही. मात्र कोणतेही अर्थ काढू नका, असे आवाहन त्यांनी पत्र लिहून मनसैनिकांना केले आहे. या पत्रात त्यांनी मनसैनिकांना शिवतीर्थावर येऊ नये असे आवाहन केले आहे.

    Read more

    Indian Railways : खुशखबर: वेटिंग तिकीट कन्फर्म झाले की नाही, 24 तास आधी कळणार; लवकरच लागू होणार नियम

    भारतीय रेल्वेने प्रतीक्षा यादीतील प्रवाशांसाठी नवीन नियम आणले आहेत. आता प्रवाशांना त्यांची सीट कन्फर्म आहे की नाही हे ट्रेन सुटण्याच्या एक दिवस आधी कळेल.

    Read more

    Narayan Rane : नारायण राणेंनी टोचले नितेश राणेंचे कान- मुख्यमंत्री कोणाचा बाप नसतो, तो जनतेचा सेवक असतो!

    मुख्यमंत्री कोणाचा बाप नसतो. मी नितेशला समज दिली आहे, असे भाजप खासदार नारायण राणे यांनी म्हटले आहे. भाजप आमदार व मंत्री नितेश राणे यांनी काही दिवसांपूर्वी धाराशिव येथे बोलताना महायुतीमध्ये भाजपचा मुख्यमंत्री सगळ्यांचा बाप आहे, असे वक्तव्य केले होते. त्यावरून महायुतीमध्ये अंतर्गत वाद पेटला होता. त्यानंतर नीलेश राणे यांनी देखील ट्विट करत नितेश राणे यांना विधाने जपून करावीत असा सल्ला दिला होता. आता नारायण राणे यांनी देखील समज दिल्याचे समजते.

    Read more

    Railway Tatkal Ticket : रेल्वेच्या तत्काळ तिकिटासाठी आता आधार अनिवार्य, 1 जुलैपासून लागू होणार हे महत्त्वाचे बदल

    आता तत्काळ तिकिटांसाठी आधार आवश्यक असेल. आयआरसीटीसीच्या अ‍ॅप किंवा वेबसाइटवर आधार पडताळणी करावी लागेल. हा नियम १ जुलैपासून लागू होईल. आयआरसीटीसीने म्हटले आहे की, पहिल्या ३० मिनिटांसाठी फक्त आधार प्रमाणित वापरकर्तेच तात्काळ तिकिटे बुक करू शकतील. या काळात एजंट तिकिटे बुक करू शकणार नाहीत.

    Read more

    द फोकस एक्सप्लेनर: सरकारचा नवा निर्णय- आता एसीचे तापमान 20°C पेक्षा कमी ठेवता येणार नाही

    गेल्या काही वर्षांत भारतात उन्हाळा प्रचंड वाढला आहे. अनेक ठिकाणी तापमान ४५°C पेक्षा जास्त जात आहे. त्यामुळे लोक जास्तीत जास्त एअर कंडिशनर (AC) वापरत आहेत. पण हे AC चालवण्यासाठी खूप वीज लागते. त्यामुळे विजेचा खर्चही वाढतो आणि पर्यावरणावरही परिणाम होतो. यामुळेच सरकारनं आता एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

    Read more

    Maratha reservation : द फोकस एक्सप्लेनर : मराठा समाजाच्या SEBC आरक्षणाला अद्याप स्थगिती नाही, पुढे काय? वाचा सविस्तर

    मराठा समाजासाठी दिलेलं SEBC (Socially and Educationally Backward Class) आरक्षण सध्या लागू आहे आणि त्यावर कोणतीही स्थगिती (stay) दिलेली नाही. मुंबई उच्च न्यायालयात या प्रकरणावर बुधवारी विशेष खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिल्यानुसार उच्च न्यायालयाने सर्व याचिकांवर एकत्रितपणे सुनावणी सुरू केली आहे. या सुनावणीमुळे मराठा विद्यार्थ्यांना सध्या शैक्षणिक प्रवेशासाठी SEBC आरक्षणाचा लाभ मिळत राहणार आहे.

    Read more

    जागतिक दहशतवादाशी लढायची अमेरिकेची तोंडी भाषा; प्रत्यक्षात जिहादी जनरलला army day मध्ये पायघड्या!!

    जागतिक दहशतवादाशी लढायची अमेरिकेची तोंडी भाषा; प्रत्यक्षात जिहादी जनरलला army day मध्ये पायघड्या!! असला प्रकार अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने केलाय.

    Read more

    Mohammad Yunus : मोहम्मद युनूस यांनी लंडनमध्ये शेख हसीना यांच्याबद्दल केला मोठा दावा

    बांगलादेशमध्ये राजकीय गोंधळ सुरू आहे. अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांनी माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्याबद्दल मोठा दावा केला, त्यांनी सांगितले की ते या विषयावर पंतप्रधान नरेंद्र मोदींशी बोलले होते. यासोबतच त्यांनी असेही म्हटले की शेख हसीना यांनी भारतात राहून केलेल्या विधानांमुळे बांगलादेशात असंतोष पसरला.

    Read more

    Satyajit Patankar : सत्यजित पाटणकरांनी शरद पवारांचा पक्ष सोडण्यामागचे सांगितले कारण, म्हणाले..

    माजीमंत्री विक्रम सिंह पाटणकर यांचे पुत्र सत्यजित सिंह पाटणकर यांनी शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून भारतीय जनता पक्षात सामील होण्याचे कारण सांगितले आहे. सत्यजित पाटणकर म्हणाले की, पाटण विधानसभा मतदारसंघातील रखडलेले प्रकल्प भाजप सरकारमार्फत पूर्ण करण्याचा प्रयत्न करू.

    Read more

    Karnataka : बेल्लारीतील काँग्रेस खासदार अन् कर्नाटकातील तीन आमदारांवर EDचे छापे

    कर्नाटक वाल्मिकी घोटाळ्याची चौकशी करताना ईडीने बेल्लारी येथील काँग्रेस खासदार ई. तुकाराम आणि तीन आमदारांच्या निवासस्थानांवर हे छापे टाकले आहे. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे.

    Read more

    DK Shivakumar : कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार विराट कोहलीची RCB टीम खरेदी करणार?

    कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी आरसीबी फ्रँचायझी खरेदी करण्याच्या अफवांबद्दल आणि जातीय जनगणनेबाबत भूमिका स्पष्टे केली आहे. ते म्हणाले की आम्हाला लोकांच्या भावना माहीत आहेत आणि आम्ही त्यांच्या जीवनाचा आदर करतो. त्यांनी विचारले की मला आरसीबीची कशासाठी गरज आहे?

    Read more

    Rajiv Ghai : ऑपरेशन सिंदूरचे नेतृत्व करणारे लेफ्टनंट जनरल राजीव घई यांच्या मुलीची भावनिक पोस्ट चर्चेत!

    ऑपरेशन सिंदूर नंतर भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीचे नेतृत्व करणारे लेफ्टनंट जनरल राजीव घई पुन्हा एकदा चर्चेत आहेत. ४ जून रोजी त्यांना उत्तम युद्ध सेवा पदक (UYSM) प्रदान करण्यात आले. तसेच, सोमवारी त्यांना DGMO तसेच उप-प्रमुख लष्कर प्रमुख (रणनीती) म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

    Read more

    Rahul Gandhi : राहुल गांधी यांचे पंतप्रधान मोदींना पत्र, आता उपस्थित केला ‘हा’ मुद्दा!

    काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून देशभरातील दलित आणि वंचित समुदायातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आव्हानांवर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. राहुल गांधी यांनी त्यांच्या पत्रात लिहिले आहे की देशातील सुमारे ९०टक्के विद्यार्थी वंचित समुदायातून येतात आणि त्यांच्या शिक्षणाच्या मार्गात दोन मोठे अडथळे आहेत. ते म्हणजे १. निवासी वसतिगृहांची वाईट अवस्था आणि २. मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीमध्ये प्रचंड अनियमितता आणि विलंब.

    Read more

    डोनाल्ड ट्रम्प यांचा बनत चाललाय “रिचर्ड निक्सन”; जागतिक सत्ता संतुलनात अमेरिकेचा घसरतोय पाय!!

    अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा बनत चाललात “रिचर्ड निक्सन” आणि जागतिक सत्ता संतुलनात अमेरिकेचा घसरत चाललाय पाय असेच ट्रम्प यांच्या सध्याच्या राजकीय हालचालींमधून समोर आले.

    Read more

    Himanta Sharma : ‘हिंदूंविरुद्ध गोमांस हे शस्त्र बनवले जात आहे’, मुख्यमंत्री हिमंता शर्मा यांचं विधान

    ईदच्या उत्सवानंतर सार्वजनिक ठिकाणी मांसाचे तुकडे फेकल्या जात असल्याच्या घटनांचा उल्लेख करत, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी आरोप केला की राज्यातील हिंदूंविरुद्ध गोमांस हे शस्त्र बनवले जात आहे.

    Read more

    Digvijay Singhs : काँग्रेसने दिग्विजय सिंह यांच्या धाकट्या भावास पक्षातून काढलं

    काँग्रेसने मध्य प्रदेशचे माजी आमदार आणि दिग्विजय सिंह यांचे धाकटे भाऊ लक्ष्मण सिंह यांच्यावर मोठी कारवाई केली आहे. पक्षविरोधी कारवायांमुळे लक्ष्मण सिंह यांना काँग्रेसने ६ वर्षांसाठी पक्षातून काढून टाकले आहे.

    Read more

    Modi Government मोदी सरकारची तीन राज्यांमधील सात जिल्ह्यांना मोठी भेट

    केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत बुधवारी भारतीय रेल्वेच्या दोन मल्टीट्रॅकिंग प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे, ज्यामध्ये झारखंड, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या तीन राज्यांमधील सात जिल्ह्यांचा समावेश आहे.

    Read more

    Elon Musk : अखेर ट्रम्प यांच्यासमोर मस्क नरमलेच! माफी मागत सर्व पोस्टही केल्या डिलीट

    टेस्लाचे प्रमुख एलोन मस्क यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी मागितली आहे. बुधवारी सोशल मीडियावर पोस्ट करून मस्क यांनी आपली चूक मान्य केली.

    Read more

    Muhammad Yunus’ : बांगला देशातील लष्करप्रमुखांनी उधळून लावला अंतरिम सरकार प्रमुख माेहम्मद युनूस यांचा युध्दाचा डाव

    बांगलादेशातील अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांनी भारताविराेधातच संघर्ष करण्याची तयारी केली हाेती. मात्र, बांग्ला देशाच्या लष्करप्रमुखांनीच हा डाव उधळून लावला. सरकारवरील नाराजीवरून लक्ष हटवण्यासाठी युनूस यांनी भारतासोबत सीमेवर छोटा मोठा संघर्ष करण्याची योजना बनवली होती. त्यातून देशप्रेमाची भावना निर्माण होईल आणि लोक त्यांच्यासोबत उभे राहतील ही अपेक्षा होती. विना निवडणूक सरकार टिकवण्याचा त्यांचा मार्ग मोकळा झाला असता. परंतु बांगलादेशाचे सैन्य प्रमुख वकार उज जमां यांची माहिती मिळाल्यावर त्यांनी हा डाव उधळून लावला.

    Read more

    Praful Patel : भाजपसाेबत जाण्याचा पूर्वीही दाेन तीन वेळा अंतिम निर्णय, प्रफुल्ल पटेल यांचा शरद पवारांवर निशाणा

    भाजपसाेबत जाण्याचा निर्णय दाेन ते तीन वेळा अंतिम झाला हाेता. मात्र नंतर भूमिका बदलण्यात आली असा गाैप्यस्फाेट करत राष्ट्रवादी काॅंग्रेस अजित पवार गटाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे.

    Read more

    बिहारमध्ये नितीश कुमारांवर over dependency ने भाजपला तोटा; चिराग पासवानने मध्येच दामटला घोडा!!

    नितीश कुमार यांच्यावर over dependency म्हणजेच ज्यादा अवलंबित्व ठेवल्याने भाजपला तोटा चिराग पासवान यांनी मध्येच दामटला घोडा!! ही बिहारच्या राजकारणातल्या निवडणुकीपूर्वीची सुरुवात आहे.

    Read more

    municipal elections : मुंबईत एकचा तर इतर शहरांत चार सदस्यीय प्रभाग रचना, महापालिका निवडणुकीसाठी नव्याने प्रभागरचना

    राज्य निवडणूक आयोगाने राज्य शासनाला महापालिका निवडणुकीसाठी प्रक्रिया करण्याचे आदेश दिल्यानंतर नगर विकास विभागाने मंगळवारी रात्री राज्यामधील अ, ब आणि क या वर्गवारी मधील नऊ आणि ड वर्गातील 19 महापालिकेंच्या निवडणुकीसाठी नव्याने प्रभाग रचना करण्याचे आदेश दिले आहे. मुंबई वगळता राज्यात इतरत्र चारचा प्रभाग होणार आहे.

    Read more

    Israel Deport : इस्रायलने ग्रेटा थनबर्गला स्वीडनला परत पाठवले; काल गाझाला जाताना ताब्यात घेतले

    इस्रायलने स्वीडिश पर्यावरण कार्यकर्त्या ग्रेटा थनबर्गला त्यांच्या ताब्यातून स्वीडनला परत पाठवले आहे. ग्रेटाला फ्रान्सला जाण्यासाठी विमानाने पाठवण्यात आले आहे, जिथून हद्दपार केले जाईल.

    Read more

    Thank God सध्याच्या आव्हानात्मक काळात नरेंद्र मोदी आपले पंतप्रधान आहेत; उद्योगपती बाबा कल्याणी असं का म्हणाले??

    Thank God सध्याच्या या अडचणी आणि आव्हानांनी भरलेल्या काळात नरेंद्र मोदी आपले पंतप्रधान आहे, असे उद्गार उद्योगपती बाबा कल्याणी यांनी काढले.

    Read more