• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 91 of 1316

    Pravin Wankhade

    चीन पुरस्कृत शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनचा इजरायल वर एकतर्फी हल्लाबोल; पण भारताने काढला वेगळा सूर!!

    इजराइल आणि इराण यांच्या संघर्षात चीन पुरस्कृत शांघाय को ऑपरेशन ऑर्गनायझेशन या संघटनेने फक्त इजरायल वर एकतर्फी हल्लाबोल केला, पण भारताने मात्र वेळीच वेगळा सूर काढून फक्त इजरायलवर होणाऱ्या टीकेतून अंग काढून घेतले.

    Read more

    Air India : अखेर अपघातग्रस्त एअर इंडिया विमानाचा ‘ब्लॅक बॉक्स’ सापडला!

    अहमदाबाद विमान अपघाताला सुमारे ४५ तास उलटून गेले आहेत. आठपेक्षा अधिक एजन्सी तपासात गुंतल्या आहेत. हा अपघात कसा झाला? का झाला? तांत्रिक बिघाड होता की आणखी काही? या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधली जात आहेत. जगभरातील तज्ज्ञ अपघाताची कारणे शोधत आहेत. अपघातग्रस्त एअर इंडिया विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला आहे. त्याची तपासणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर आपण जाणून घेऊयात, विमानामधील नारंगी रंगाच्या उपकरणाला ब्लॅक बॉक्स का म्हणतात?.

    Read more

    Manipur : मणिपूरमध्ये सुरक्षा यंत्रणांची मोठी कारवाई! तब्बल ३०० हून अधिक ऑटोमॅटिक शस्त्रं जप्त

    मणिपूर पोलिस, सीएपीएफ, लष्कर आणि आसाम रायफल्सच्या संयुक्त पथकांनी १३-१४ जूनच्या रात्री, खोऱ्यातील ५ जिल्ह्यांच्या बाहेरील भागात शोध मोहीम राबवली. यामध्ये स्फोटके आणि इतर युद्ध साहित्यांसह १५१ एसएलआर रायफल्स, ६५ इन्सास रायफल्स, ७३ इतर प्रकारच्या रायफल्स, ५ कार्बाइन गन, २ एमपी-५ गन आणि इतर युद्ध साहित्य जप्त करण्यात आले. या कारवाईत एकूण ३२८ बंदुका आणि रायफल्स जप्त करण्यात आल्या.

    Read more

    Tata Group : ‘IMA’च्या आवाहनानंतर टाटा ग्रुपची ‘त्या’ वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयासाठी मोठी घोषणा

    अहमदाबादेतील एअर इंडियाच्या विमान अपघाताने संपूर्ण देश हादरून गेला आहे. १२ जून रोजी झालेल्या या भयानक अपघातात २७४ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये केवळ विमानातील प्रवासीच नव्हते तर विमान ज्या इमारतीला धडकले तेथील वैद्यकीय विद्यार्थ्यांसह अन्य काही जणांचाही समावेश होता.

    Read more

    इस्रायल-इराण युद्धात भारत कोणासोबत? परराष्ट्र मंत्रालयाने जारी केले निवेदन

    इस्रायल आणि इराणमध्ये तणाव वाढत आहे. दोन्ही देश एकमेकांवर हल्ले करत आहेत. गेल्या २४ तासांत इस्रायलच्या हवाई हल्ल्यात इराणचे १३८ लोक मारले गेले.

    Read more

    Devendra Fadnavis : परदेशी शिक्षणाची गंगा आता मुंबईच्या अंगणी!

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज(शनिवार) मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्रात कॅम्पस स्थापन करण्यासाठी 5 आंतरराष्ट्रीय विद्यापीठांना ‘लेटर ऑफ इंटेंट’ (LOIs) प्रदान केले. हा कार्यक्रम ‘मुंबई रायझिंग – क्रिएटिंग अ‍ॅन इंटरनॅशनल एज्युकेशन सिटी’ अभियानांतर्गत आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहमदाबाद-लंडन विमान अपघातसारख्या कठीण प्रसंगी भारताच्या पाठीशी उभे राहिल्याबद्दल जागतिक समुदायाचे आभार मानले.

    Read more

    South Africa : तब्बल २७ वर्षानंतर दक्षिण आफ्रिकेने रचला इतिहास, ICC ट्रॉफीवर कोरले नाव!

    दक्षिण आफ्रिकेने २७ वर्षांची प्रतीक्षा संपवून ICC ट्रॉफी जिंकून इतिहास रचला आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आफ्रिकन संघाचा सामना ऑस्ट्रेलियाशी झाला

    Read more

    Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद प्लेन क्रॅश, 270 मृतदेह सापडले; 7 जणांची ओळख पटली; ब्लॅकबॉक्सही सापडला

    अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमान एआय-१७१ अपघाताच्या २७ तासांनंतर, शुक्रवारी विमान अपघात तपास ब्युरो (एएआयबी) ने ब्लॅक बॉक्स जप्त केला. ते वसतिगृहाच्या छतावर सापडले. याद्वारे आपल्याला अपघातापूर्वीच्या शेवटच्या क्षणांमध्ये काय घडले हे कळू शकेल.

    Read more

    अहमदाबाद दुर्घटनेतील एअर इंडियाच्या विमानात ६५० फूट उंचीवर झाला होता बिघाड!

    अहमदाबाद विमान अपघाताने केवळ गुजरातच नाही तर संपूर्ण देशाला हादरवून टाकले आहे. अपघाताला ४८ तास उलटले आहेत, परंतु त्याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. १२ जून रोजी दुपारी नेमके काय घडले?

    Read more

    Sanjay Raut : अहमदाबाद विमान अपघातामागे सायबर हल्ला? संजय राऊत यांची गंभीर शंका; अदानींवरही अप्रत्यक्ष टोला

    अहमदाबाद येथील भीषण विमान अपघातामागे सायबर हल्ला असू शकतो, अशी गंभीर शंका शिवसेना (ठाकरे गट)चे खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केली.

    Read more

    Vijay wadettiwar : वडेट्टीवारांनी हाणली पवारांची कॉपी; पण निदान त्यांची कारणे तरी मोठी!!

    काँग्रेसचे वरिष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी शरद पवारांची कॉपी हाणली, पण निदान ती कॉपी करण्याची वडेट्टीवार यांची कारणे तरी मोठी निघाली.

    Read more

    B.J. Medical College : बी.जे. मेडिकल कॉलेजमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांना टाटा समूह देणार एक कोटींची भरपाई; होस्टेलच्या पुनर्बांधणीसाठीही मदतीचा हात

    अहमदाबादमधील एअर इंडिया ड्रीमलाइनर विमानाच्या भीषण अपघातात मृतांचा आकडा २७४ वर पोहोचला आहे. यामध्ये २४१ प्रवासी आणि क्रू मेंबर्स हे विमानात होते, तर उर्वरित ३३ जण बी.जे. मेडिकल कॉलेजच्या आवारात जमिनीवर उपस्थित होते. टाटा समूहाने या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या सर्वांनाच प्रत्येकी एक कोटी कोटींची भरपाई देण्याची घोषणा केली आहे मग ते प्रवासी असोत किंवा जमिनीवरचे नागरिक जे विमान पडल्याने मृत्युमुखी पडले.

    Read more

    Ajit Pawar : पुण्यात पाऊस अन् कोरोनाबाबत प्रशासन सतर्क, ठोस उपाययोजना करण्यास सुरूवात

    पुण्यात मुसळधार पावसामुळे आणि सध्याच्या आरोग्यविषयक आव्हानांमुळे जनतेला सावध राहण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. शुक्रवारी रात्री पावसामुळे पुणे शहरातील अनेक भागांमध्ये, विशेषतः हिंजवडीमध्ये पाणी साचले होते, त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला.

    Read more

    म्हणे, राष्ट्रवादीची भाजप सोडून इतरांशी युती; पण पवारांच्या आमदारांच्या मनात रूतली भीती!!

    राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) NCP SP अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी भाजप सोडून इतर पक्षांशी युती करायची तयारी केली, त्याबरोबर पवारांच्या आमदारांच्या मनात वेगळीच भीती रुतून बसली.

    Read more

    Israel : इस्रायलने इराणचे चार आण्विक तळ नष्ट केले, २ लष्करी तळही उद्ध्वस्त; लष्करप्रमुख, विशेष दल प्रमुख आणि दोन अणुशास्त्रज्ञांचा मृत्यू

    शुक्रवारी सकाळी इस्रायलने २०० लढाऊ विमानांचा वापर करून ४ अणु क्षेपणास्त्रे आणि इराणच्या २ लष्करी तळांवर हल्ला केला. या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख, विशेष दल प्रमुख, २ अव्वल अणुशास्त्रज्ञांसह ५ उच्च अधिकारी ठार झाले.

    Read more

    DGCA : DGCAने म्हटले- प्रत्येक उड्डाणापूर्वी बोईंग 787ची तपासणी; इंधन प्रणाली, इंजिन नियंत्रण आणि उड्डाणाचा आढावा घेणार

    डीजीसीएने शुक्रवारी एअर इंडियाच्या बोईंग ७८७ ड्रीमलायनरची सुरक्षा तपासणी करण्याचे आदेश दिले. १२ जून रोजी अहमदाबाद विमान अपघातात २४१ जणांचा मृत्यू झाल्यानंतर एका दिवसात हा आदेश जारी करण्यात आला. त्यात म्हटले आहे की बोईंगच्या ७८७-८ आणि ७८७-९ विमानांची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी केली जाईल. सर्व अहवाल डीजीसीएला सादर केले जातील.

    Read more

    महात्मा गांधींचा दक्षिण आफ्रिकेत गुलामगिरी विरुद्ध लढा; पण त्यांच्या दिवट्या पणतीला कोट्यावधींच्या फसवणुकीबद्दल तुरुंगवासाची सजा!!

    महात्मा गांधींचा दक्षिण आफ्रिकेत गुलामगिरी विरुद्ध लढा; पण त्यांच्या दिवट्या पणतीला कोट्यावधींच्या फसवणुकीबद्दल तुरुंगवासाची सजा!!, हे खरंच घडले आहे.

    Read more

    इजरायली हल्ल्याच्या धसक्यातून इराणला स्वतःचा देश सावरता येईना, पण त्याच्या इतर देशांना धमक्या!!

    ऑपरेशन रायझिंग लायन मधून इजराइलने केलेल्या हल्ल्यात इराणच्या अण्वस्त्र केंद्रांचे प्रचंड नुकसान झाले. इराणी लष्कर प्रमुख आणि अणुशास्त्रज्ञ मारले गेले.

    Read more

    Air India flight : एअर इंडियाच्या विमानाचे थायलंडमध्ये इमर्जन्सी लँडिंग; बॉम्ब असल्याची माहिती; विमानात 156 प्रवासी होते

    थायलंडमधील फुकेत आंतरराष्ट्रीय विमानतळावर एअर इंडियाच्या विमान AI-379 चे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. विमानात बॉम्ब असल्याची माहिती मिळाली होती. विमानात 156 लोक होते. हे विमान फुकेतहून दिल्लीला येत होते.

    Read more

    Ajit Pawar : स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी दोन्ही राष्ट्रवादींची युती? शरद पवार भाजप वगळता कुणासोबतही जाण्यास तयार!

    आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप वगळता इतर कोणत्याही पक्षाशी युती करण्यास पक्ष सकारात्मक असल्याचे पक्षातील वरिष्ठ सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. विशेष म्हणजे, यामध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही पर्याय असणार आहे. यामुळे काका-पुतणे एकत्र येणार का? याची चर्चा सुरू आहे.

    Read more

    Raj Thackeray : डीजीसीएने आधीच कारवाई का नाही केली?; राज ठाकरे यांचा सरकारला सवाल; ‘ड्रीमलाइनर’ची सेवा खंडित करण्याची मागणी

    अहमदाबाद येथून लंडनला जाणाऱ्या विमानाचा अपघात झाल्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित केले आहे. या विमानाला जगभरात बंदी असताना भारतात डीजीसीएने आधीच कारवाई का केली नाही? असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. इतकेच नाही तर कोणत्याही दबावाला बळी न पडता आता तरी तात्काळ या विमानांची सेवा खंडित करून देण्यात आलेल्या ऑर्डर रद्द करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे.

    Read more

    Pune Heavy Rain : पुण्यात मुसळधार पावसाने हाहाकार; पिंपरी चिंचवडमध्ये वाहने पाण्यात वाहून गेली; जनजीवन विस्कळीत

    पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांना सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पावसाने झोडपले. या पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून, अनेक भागांमध्ये पाणी साचल्याने वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. काही ठिकाणी तर वाहने अक्षरशः पाण्यात वाहून गेल्याचे पाहायला मिळाले. दिवे घाटात ढगफुटीसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने रस्त्यांना ओढ्यांचे स्वरूप आले, तर पुण्याच्या आयबी गेस्ट हाऊसमध्येही पाणी शिरले होते.

    Read more

    Devendra Fadnvis : नागपुरात हेलिकॉप्टर निर्मिती कारखाना; 8 हजार कोटींची गुंतवणूक, 2 हजार रोजगार; ‘मॅक्स एअरोस्पेस’सह शासनाचा सामंजस्य करार

    नागपुरात सुमारे ८ हजार कोटी रुपये गुंतवणुकीचा हेलिकॉप्टर उत्पादन निर्मिती कारखाना उभारण्यात येणार आहे. पुढील वर्षी २०२६ पर्यंत कारखाना सुरु होण्याची शक्यता आहे. ८ हजार कोटींची ही गुंतवणूक येत्या आठ वर्षात टप्प्प्याटप्याने होणार आहे. यासंदर्भात शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेस अँड एव्हिएशन प्रा. लि. आणि महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागात नागपूरमध्ये हेलिकॉप्टर उत्पादन कारखाना उभारण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला.

    Read more

    Shani Shingnapur : शनिशिंगणापूर देवस्थानचा मोठा निर्णय; 114 मुस्लिम कर्मचाऱ्यांसह 167 जणांना नारळ; हिंदुत्ववादी संघटनांचा होता आक्षेप

    जिल्ह्यातील प्रसिद्ध शनिशिंगणापूर देवस्थानने एक मोठा निर्णय घेतला असून, त्यांच्या १६७ कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकले आहे. या कर्मचाऱ्यांमध्ये ११४ मुस्लिम कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या कारवाईमागे हिंदुत्ववादी संघटनांचा दबाव असल्याचा आरोप केला जात आहे, कारण या संघटनांनी नुकतीच या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा इशारा दिला होता.

    Read more

    द फोकस एक्सप्लेनर : इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानंतर कच्च्या तेलाच्या किमतीत 10% वाढ; तुमच्यावर कसा होईल परिणाम?

    मध्य पूर्वेतील भू-राजकीय (geopolitical) घडामोडींचा जागतिक ऊर्जा बाजारावर नेहमीच मोठा परिणाम होतो. इस्रायल आणि इराण यांच्यातील वाढता तणाव आणि आता प्रत्यक्ष हल्ल्यांच्या सत्रामुळे जागतिक बाजारात तीव्र अस्थिरता निर्माण झाली आहे. १३ जून २०२५ रोजी मिळालेल्या वृत्तानुसार, इस्रायलने इराणच्या अणु आणि लष्करी तळांवर हवाई हल्ले केले आहेत, ज्यामुळे या दोन देशांमधील संघर्ष अधिकच तीव्र झाला आहे. यामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत १०% पेक्षा जास्त वाढ झाली आहे. या वाढीमुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर आणि विशेषतः भारतासारख्या तेल आयातदार देशांवर गंभीर परिणाम होतील.

    Read more