• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 84 of 1316

    Pravin Wankhade

    Imtiaz Jaleel : ​​​​​​​इम्तियाज जलील यांच्याकडे कोट्यवधींची प्रॉपर्टी कुठून आली? वंचित बहुजन आघाडीचा सवाल

    एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी नुकतेच राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्यावर मालमत्तेसंबंधी गंभीर आरोप केले होते. आता याला प्रत्युत्तर म्हणून वंचित बहुजन आघाडीने खुद्द जलील यांच्यावरच कोट्यवधी रुपयांची मालमत्ता जमवल्याचा आरोप केला आहे. वंचितचे स्थानिक पदाधिकारी अफसर खान यांनी प्रश्न उपस्थित केला आहे की, “इम्तियाज जलील ५ वर्षे खासदार आणि ५ वर्षे आमदार होते. या १० वर्षांत त्यांच्याकडे कोट्यवधी रुपयांची प्रॉपर्टी कुठून आली?”

    Read more

    Fadnavis : बोल बच्चन भैरवींना मी उत्तर देत नाही; फडणवीस यांचा ठाकरेंच्या टीकेवर पलटवार

    उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीवर टीका केली होती. मराठी माणसांची शक्ती एकत्र येऊ नये म्हणून यांच्या मालकांचे नोकर भेटीगाठी घेत आहेत,

    Read more

    Iran Urges : ‘भारताने इस्रायलवर दबाव आणावा…’, इराणची भारताला विनंती

    इराणचे भारतातील उपराजदूत मोहम्मद जावेद हुसैनी यांनी इस्रायलविरुद्ध कठोर भूमिका घेतली आहे आणि भारताला इस्रायलचा उघडपणे निषेध करण्याचे आणि त्यावर दबाव आणण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले की, भारतासारख्या मोठ्या आणि शांतताप्रिय देशांनी, जे जागतिक दक्षिणेचा आवाज आहेत, इस्रायलवर टीका करून आघाडीची भूमिका बजावली पाहिजे.

    Read more

    द फोकस एक्सप्लेनर : इराणचे पहिले सर्वोच्च नेते खोमेनी यांचे मूळ भारतात, यूपीच्या बाराबंकीतून कसे जोडले इराणशी नाते

    इराणमध्ये इस्लामिक क्रांती घडवणारे अयातुल्लाह रुहोल्लाह खोमेनी हे जगभरात ओळखले जाणारे एक प्रभावशाली व्यक्तिमत्त्व होते. आजही त्यांच्या नावावर तेहरानमध्ये रस्ते, विद्यापीठे आणि चलन नोटा आहेत. पण त्यांच्याशी संबंधित एक रोचक माहिती अशी आहे की, त्यांच्या पूर्वजांचे मूळ भारतातील उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यात होते.

    Read more

    West Bengal : पश्चिम बंगालमध्ये कायद्याचा बळी! डॉक्टरच्या भेटीला गेलेल्या भाजप प्रदेशाध्यक्ष व केंद्रीय मंत्र्यांना अटक

    पश्चिम बंगालमधील राजकारण पुन्हा एकदा पेटले आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या कारभारावर प्रश्न उपस्थित करणाऱ्या लंडनस्थित डॉक्टर राजतशुभ्र बंधोपाध्याय यांना भेटायला गेलेल्या भाजप प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री सुकांत मजुमदार यांना कोलकाता पोलिसांनी अटक केल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेने केंद्र-राज्य संघर्षाचे नवे पर्व सुरू झाले असून भाजपने राज्य सरकारवर “गुंडशाही”चा आरोप करत थेट हल्ला चढवला आहे.

    Read more

    सीबीआयने केला १८३ कोटींच्या बनावट बँक हमी घोटाळ्याचा पर्दाफाश

    केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) ने इंदूरस्थित खासगी कंपनी मेसर्स तीर्थ गोपिकॉन लिमिटेडशी संबंधित १८३ कोटी रुपयांच्या मोठ्या बनावट बँक हमी घोटाळ्याचा पर्दाफाश केला आहे.

    Read more

    Yoga Day 2025 आंतरराष्ट्रीय योग दिन २०२५: पंतप्रधान मोदी आज विशाखापट्टणममध्ये, तर अमित शहा अहमदाबादमध्ये

    आज म्हणजेच २१ जून रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यानिमित्ताने विशाखापट्टणममध्ये योगासनं करतील.

    Read more

    …अखेर मोदींनी स्वत:च सांगितलं अमेरिकेस न जाण्यामागचं नेमकं कारण!

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ओडिशाचा दौरा केला. त्यांच्या दौऱ्याच्या सुरुवातीला त्यांनी राजधानी भुवनेश्वरमध्ये रोड शो केला.

    Read more

    Rajnath Singh : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह चीनला जाणार ; पाकिस्तानचे संरक्षणमंत्रीही समोर असणार

    संरक्षण मंत्री राजनाथ सिंह चीनला भेट देणार आहेत. ते २५ ते २७ जून दरम्यान चीनच्या दौऱ्यावर असतील. चीन दौऱ्यादरम्यान राजनाथ किंगदाओ शहरात होणाऱ्या शांघाय सहकार्य संघटनेच्या संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ देखील या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

    Read more

    Sheikh Hasina : सत्ताबदलानंतर पहिल्यांदाच बांगलादेशमध्ये मिळाला शेख हसीना यांना मोठा दिलासा

    बंडखोरीनंतर पहिल्यांदाच बांगलादेशमध्ये शेख हसीना यांना मोठा दिलासा मिळाला आहे. बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरण-१ ने हसीना यांना खटला लढण्यासाठी आणि त्यांची बाजू मांडण्यासाठी वकील उपलब्ध करून दिला आहे.

    Read more

    Upendra Kushwaha : ‘१० दिवसांत मारून टाकू’, लॉरेन्स बिश्नोई गँगकडून उपेंद्र कुशवाह यांना धमकी!

    राष्ट्रीय लोक मोर्चाचे अध्यक्ष आणि खासदार उपेंद्र कुशवाह यांनी दावा केला आहे की त्यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. उपेंद्र कुशवाह यांना लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून ही धमकी मिळाली आहे

    Read more

    आंबेडकरांच्या प्रतिमेसोबत लालूंच्या ‘त्या’ व्हायरल फोटोवर मोदींनी साधला निशाणा

    पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारच्या दौऱ्यावर आहेत. पंतप्रधानांनी सिवानमधील एका सभेला संबोधित केले.

    Read more

    railway passengers : रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी! कन्फर्म तिकिटांची हमी वाढली, वेटींगला ब्रेक

    जर तुम्हालाही रेल्वे तिकीट बुक करताना वेटिंग लिस्ट पाहून काळजी वाटत असेल, तर आता तुमच्यासाठी एक दिलासादायक बातमी आहे. वेटिंग तिकिटांची अनिश्चितता कमी करण्यासाठी भारतीय रेल्वेने एक मोठा निर्णय घेतला आहे. आता कोणत्याही ट्रेनमध्ये बुकिंग फक्त एका निश्चित मर्यादेपर्यंतच केले जाईल – आणि ती मर्यादा एकूण जागांच्या फक्त २५टक्के असेल. म्हणजेच, आता ‘वेटिंगमध्ये टाकूया, कदाचित तिकीट कन्फर्म होईल’ हा विचार देखील बंद होणार आहे.

    Read more

    Pakistan Economic : पाकिस्तानवर आर्थिक निर्बंध शक्य; FATF चौथ्यांदा ग्रे लिस्टमध्ये टाकण्याच्या तयारीत

    भारतातील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या अडचणी पुन्हा एकदा वाढू शकतात. आंतरराष्ट्रीय संघटना FATF (फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स) पाकिस्तानला चौथ्यांदा ग्रे लिस्टमध्ये टाकण्याची तयारी करत आहे.

    Read more

    भाजप सोडून पवारांबरोबर जाताना उद्धव ठाकरेंचा निर्णय स्वतःचा; पण भावाबरोबर जायचं का नाही?, विचारताहेत शिवसैनिकांना!!

    2019 ची विधानसभा निवडणूक भाजप सोबत महायुती मधून लढवून देखील भाजपला सोडून शरद पवारांबरोबर जाताना उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना विचारले नाही.

    Read more

    Himanta Biswa Sarma : जर त्यांनी मंदिरासमोर बीफ फेकलं, तर हिंदूंनी प्रत्युत्तर म्हणून पोर्क फेकावं, मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमांचे संतप्त आवाहन

    आसाममधील धुब्रीतील हनुमान मंदिरासमोर बकरी ईदच्या दुसऱ्या दिवशी गोमातेचे शीर सापडल्याने आसाममध्ये धार्मिक तणाव निर्माण झाला आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. “जर मंदिरासमोर बीफ फेकलं जात असेल, तर हिंदूंनी त्याला संतुलित उत्तर म्हणून पोर्क फेकावं,” असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं.

    Read more

    Greater Balochistan : इस्रायल-इराण संघर्षामुळे पाकिस्तान धास्तावले; ‘ग्रेटर बलुचिस्तान’ चळवळीचा धोका

    इस्रायल-इराण संघर्षाने पश्चिम आशियातील तणाव शिगेला पोहोचला असताना, या संघर्षाचे परिणाम आता दक्षिण आशियातही जाणवू लागले आहेत. पाकिस्तानने गुरुवारी गंभीर चिंता व्यक्त करत म्हटले की, इराणची अस्थिरता ही संपूर्ण प्रादेशिक सुरक्षेसाठी घातक ठरू शकते. विशेषतः इराण-पाकिस्तान सीमावर्ती भागात अतिरेकी गट सक्रिय होण्याच्या शक्यतेने पाकिस्तान सरकार सतर्क झाले आहे.

    Read more

    Cash Case : कॅश केस- तपास समितीचा जज वर्मा यांना हटवण्याचा प्रस्ताव; म्हटले- स्टोअर रूमवर जज- कुटुंबाचे नियंत्रण

    न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या घरातून सापडलेल्या रोख रकमेच्या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या पॅनलचा अहवाल गुरुवारी प्रसिद्ध झाला. त्यात म्हटले आहे की, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे स्टोअर रूमवर गुप्त किंवा सक्रिय नियंत्रण होते. १४ मार्चच्या रात्री आग लागल्यानंतर येथेच मोठ्या प्रमाणात अर्ध्या जळालेल्या नोटा सापडल्या.

    Read more

    Raj Thackeray : धमक्या देणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांना सदावर्ते यांनी सुनावले, राज ठाकरेंना सुधारायला सांगा असा दिला सल्ला

    ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मनसेच्या प्रमुख राज ठाकरे यांना चांगलेच अंगावर घेतले आहे. राज यांच्या विरोधातील तक्रारीनंतर मनसे कार्यकर्त्याकडून धमकी देण्यात आली आहे. राज ठाकरे यांना सुधारायला सांगा असा सल्ला सदावर्ते यांनी धमकी देणाऱ्या कार्यकर्त्याला दिला.

    Read more

    ठाकरे बंधू अजून एकत्र येईनात, तोच पवारांचा त्यांच्यात महाविकास आघाडीचा खोडा!!

    मुंबईत ठाकरे बंधू अजून एकत्र येईनात, तोच शरद पवारांनी घातला त्यांच्यात महाविकास आघाडीचा खोडा!!, असे आज बारामतीतून घडले. उद्धव आणि राज ठाकरे यांच्या युतीची चर्चा महाराष्ट्राच्या राज्याचे वातावरणात रंगत असतानाच शरद पवारांनी महापालिका निवडणुकांसाठी उद्धव ठाकरे, काँग्रेस शेतकरी कामगार पक्ष आणि अन्य छोट्या पक्षांशी चर्चा करून निर्णय घेऊ, असे वक्तव्य शरद पवारांनी बारामतीत केले.

    Read more

    Rahul Gandhi : राहुल गांधींचा नवा पत्ता- लुटियन्स झोनमधील सुनहरी बाग; 55व्या वाढदिवशी झाले शिफ्ट

    लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा आज ५५ वा वाढदिवस आहे. आज राहुल सुनहरी बाग रोडवर बांधलेल्या टाइप-८ बंगल्यात स्थलांतरित झाले आहेत. हा बंगला त्यांना लोकसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून देण्यात आला आहे.

    Read more

    कर्नाटकात काँग्रेस सरकारचे फक्त मुस्लिमांना सरकारी घर योजनांमध्ये 15 % पर्यंत वाढीव आरक्षण!!

    कर्नाटकात काँग्रेस सरकारने मुस्लिमांचे तुष्टीकरण चालूच ठेवले आहे. भारतीय राज्यघटनेत कुठल्याही स्वरूपाचे धार्मिक आरक्षण नाकारले असताना कर्नाटक सरकारने आधी मुस्लिमांना सरकारी कंत्राटांमध्ये 5 % आरक्षण दिले.

    Read more

    बारामती PDCC बँक रात्री उघडण्याचे “पवार संस्कारितांचे” प्रताप; पण माळेगाव कारखान्याच्या मतदार यादीबाबत बँक मॅनेजरचे कानावर हात!!

    माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामतीतली PDCC बँक रात्री 11.00 वाजता उघडली. त्यावरून काका – पुतण्यांमध्ये वाद उसळला.

    Read more

    Iran Fordo Nuclear : इराणचा अणुप्रकल्प नष्ट करणे कठीण; फोर्डो लॅब 295 फूट खोल, फक्त अमेरिकन बॉम्बच भेदू शकतात

    इराण आणि इस्रायलमधील संघर्षादरम्यान, जगाच्या नजरा इराणच्या फोर्डो इंधन समृद्धी प्रकल्पावर खिळल्या आहेत. हा प्रकल्प इराणमधील एका पर्वतरांगात २९५ फूट खोलीवर म्हणजेच सुमारे ९० मीटर अंतरावर आहे.

    Read more

    Canadian Agency :कॅनेडियन एजन्सीचा भारतावर हस्तक्षेपाचा आरोप; म्हटले- हे सर्व खलिस्तान्यांमुळे; ते भारतात हिंसाचार पसरवत आहेत

    कॅनडाच्या गुप्तहेर संस्थेने (CSIS) बुधवारी प्रसिद्ध केलेल्या अहवालात भारतावर कॅनडात परकीय हस्तक्षेपाचा आरोप केला आहे. CSIS अहवालात म्हटले आहे की भारत “आंतरराष्ट्रीय दमन” (सीमापार दमन) मध्ये मुख्य भूमिका बजावतो.

    Read more