खेळाच्या राजकारणात पवार काका – पुतणे भाजपच्या दारात!!
शरद पवारांनी डाव टाकला, त्यांनी खेळी केली, धोबीपछाड दिला, कात्रजचा घाट दाखविला, अशा स्वरूपाने शरद पवारांच्या सगळ्या बातम्या त्यांच्या समर्थकांनी कितीही रंगविल्या
शरद पवारांनी डाव टाकला, त्यांनी खेळी केली, धोबीपछाड दिला, कात्रजचा घाट दाखविला, अशा स्वरूपाने शरद पवारांच्या सगळ्या बातम्या त्यांच्या समर्थकांनी कितीही रंगविल्या
गेल्या आठवड्यात, भारतीय-अमेरिकन जोहरान ममदानी यांनी न्यूयॉर्कच्या महापौरपदाच्या निवडणुकीत विजय मिळवून इतिहास रचला. आता, भारतीय-अमेरिकन डेमोक्रॅट सैकत चक्रवर्ती हेडलाइन्समध्ये येत आहेत.
महायुती होवो न होवो, पुण्यात मात्र शिंदे सेना आणि पतित पावन संघटना यांनी युती केली. त्यामुळे भाजप आणि अजितदादांच्या संघर्षात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पतित पावन संघटनेची एक नवी ताकद मिळाली. मधल्या मध्ये एकनाथ शिंदे यांनी बेरजेचे राजकारण करून घेतले. Alliance of Shinde Sena
झारखंडमधील गोड्डा येथील भाजप खासदार निशिकांत सिंह यांनी राहुल गांधींच्या परदेश दौऱ्यांवर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी विचारले आहे की, “जेव्हा तुमचे कुटुंब दावा करते की त्यांच्याकडे कोणतीही मालमत्ता नाही, तेव्हा सर्व पैसे कुठून येतात? तुम्ही कोलंबिया किंवा कंबोडियाला का जात आहात, कोणत्या कारणासाठी? तुमच्या कुटुंबाची इटलीमध्ये कोणती मालमत्ता आहे? प्रत्येक गोष्टीची चौकशी केली जाईल.”
गुजरात दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) अहमदाबादमधील अडालज येथे दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या तीन जणांना अटक केली आहे. एटीएस पथक गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर लक्ष ठेवून होते. विश्वसनीय माहितीच्या आधारे कारवाई करत एटीएसने रविवारी सकाळी तिघांना अटक केली. तपासात हे तिघेही आयसिससाठी काम करत असल्याचे समोर आले.
गेल्या काही दिवसांपासून महायुती सरकारमधील मंत्री आणि नेतेमंडळींकडून कर्जमाफीवरून शेतकऱ्यांवर बेताल वक्तव्ये करण्याची एक मालिकाच सुरू आहे. आता या यादीत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भर पडली आहे. विखे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीवर अत्यंत वादग्रस्त विधान केले आहे. त्यांनी ‘आधी कर्जबाजारी व्हायचं आणि नंतर पुन्हा कर्जमाफी मागायची, हे गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे,’ असे म्हणत मुक्ताफळे उधळली.
जिल्ह्यात भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये सुरू असलेला अंतर्गत वाद थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत, विशेषतः स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत युती करायची की नाही यावरून हा संघर्ष वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर, आता भाजपचे आमदार नितेश राणे आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांच्यात नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी मंत्री उदय सामंत यांनी केलेल्या वक्तव्यावर नितेश राणे यांनी आता जशास तसे उत्तर देत थेट आव्हान दिले आहे.
काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी केलेल्या विधानापासून काँग्रेस पक्षाने स्वतःला दूर ठेवले आहे. ज्यांनी म्हटले होते की, लालकृष्ण अडवाणी यांचे मूल्यांकन एकाच घटनेपुरते (१९९० ची रथयात्रा) मर्यादित ठेवणे योग्य नाही.
1971च्या युद्धानंतर पहिल्यांदाच शनिवारी पाकिस्तानी युद्धनौका बांगलादेशात दाखल झाली. नौदलाची पीएनएस सैफ बंगालच्या उपसागरातून प्रवास करून दोन्ही देशांमधील संरक्षण संबंध मजबूत करण्याच्या उद्देशाने चार दिवसांच्या सदिच्छा भेटीसाठी बांगलादेशी बंदरात पोहोचली.
पाकिस्तानी संसदेने संविधानात सुधारणा करून लष्करप्रमुख असीम मुनीर यांना तिन्ही सशस्त्र दलांचे प्रमुख बनवले आहे. आता त्यांना देशाचे पहिले संरक्षण दल प्रमुख (CDF) म्हणून नियुक्त केले जाईल. हे भारताच्या संरक्षण प्रमुख (CDS) सारखेच असेल.
पुण्यातील बहुचर्चित मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणावरून विरोधी पक्षांनी केलेल्या आरोपांवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बारामती येथे माध्यमांसमोर मन मोकळे केले. पार्थ पवार यांच्या ‘अमेडिया’ कंपनीमार्फत करण्यात आलेला हा जमीन खरेदीचा व्यवहार नंतर रद्द करण्यात आला असला तरी, या अनुषंगाने उपस्थित झालेल्या प्रश्नांची उत्तरे देत अजितदादांनी आपल्यावरील जुन्या आरोपांचे ‘शल्य’ बोलून दाखवले. निवडणुका सुरु झाल्या की आमच्यावर आरोप होतात. याआधी देखील माझ्यावर असेच आरोप झाले. पण त्यातून काही निष्पन्न झाले नाही. मात्र बदनामी झाली, असे अजित पवार म्हणालेत.
बीकेसी सर्व्हेच्या नावाखाली आमच्या घरावर नजर ठेवली जात आहे का? असा संतप्त सवाल शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. मातोश्रीच्या परिसरात ड्रोन फिरताना दिसल्यानंतर आदित्य ठाकरेंनी संताप व्यक्त करत महायुती सरकारवर टीका केली आहे. कोणता सर्व्हे एखाद्याच्या घरात डोकावण्याची आणि दिसताच लगेच पळून जाण्याची परवानगी देतो? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसंदर्भात राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. या वक्तव्यावर प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली असून, त्यांनी थेट विखे पाटील यांच्या गाडी फोडणाऱ्याला एक लाख रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा केली आहे.
दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान उड्डाणांमध्ये अचानक झालेल्या व्यत्ययाची उच्चस्तरीय चौकशी सुरू आहे. यामध्ये बाह्य शक्तींचा किंवा सायबर हल्ल्यांचा समावेश होता का याचाही तपास सुरू आहे.
राष्ट्रीय लोकशाही आघाडी NDA ने लालूप्रसाद यादव यांच्या “जंगलराज”ला पूर्णविराम दिला आहे.
नेपाळची राजधानी काठमांडू येथील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर शनिवारी तांत्रिक बिघाडामुळे सर्व देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणे थांबवण्यात आली.
जम्मू आणि काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील केरन सेक्टरमध्ये शनिवारी सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांना ठार केले. नियंत्रण रेषेवरून (एलओसी) घुसखोरी होत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर भारतीय लष्कराने शुक्रवारी दहशतवाद्यांवर शोध मोहीम सुरू केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज गडचिरोली येथे रुबी हॉस्पिटल अँड वेलनेस प्रा. लि. च्या हॉस्पिटल, मेडिकल कॉलेज आणि एज्युकेशनल कॅम्पसची पायाभरणी आणि कोनशिला अनावरण संपन्न झाले. एकेकाळी नक्षलग्रस्त असलेल्या जिल्ह्यात विकासाची पेरणी झाली.
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ डिसेंबर २०२५ रोजी सुरू होईल आणि १९ डिसेंबर २०२५ पर्यंत चालेल. संपूर्ण अधिवेशनात १५ बैठका होतील, अशी घोषणा केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी शनिवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सांगितले की, कायदेशीर भाषा सामान्य लोकांना समजेल इतकी सोपी असावी. ते म्हणाले की, प्रत्येक नागरिकाला मग तो गरीब असो वा श्रीमंत, न्याय सहज उपलब्ध असावा.
पुण्यातील मुंढवा येथील वादग्रस्त जमीन प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. या प्रकरणातील जमीन व्यवहार रद्द करण्यासाठी आता पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला 21 कोटी रुपयांचं मुद्रांक शुल्क भरावं लागणार आहे, अशी अट सहदुय्यम निबंधक कार्यालयाने घातली आहे. अजित पवार यांनी या वादग्रस्त जमिनीचा व्यवहार रद्द करण्याची घोषणा केल्यानंतर अमेडिया कंपनीने नोंदणी कार्यालयाकडे लेखी स्वरूपात अर्ज सादर केला होता. मात्र, या व्यवहारासाठी पूर्वी आयटी पार्क उभारण्याच्या कारणावरून जी मुद्रांक शुल्क सवलत मिळाली होती, ती आता लागू होणार नाही, असं निबंधक कार्यालयानं स्पष्ट केलं आहे.
पार्थ पवारचा घोटाळा, मधल्या मध्ये जय पवारचा पत्ता काटला??, असा सवाल बारामतीतून समोर आला. राज्यातल्या नगर परिषदा आणि नगर पंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या.
राज्यातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना सरकारकडून मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. या योजनेत महिलांना दरमहा आर्थिक सहाय्य दिले जाते. मात्र पुढचा हप्ता मिळवण्यासाठी लाभार्थ्यांनी आपले ई-केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे. सरकारने या प्रक्रियेची अंतिम तारीख 18 नोव्हेंबर निश्चित केली आहे. परंतु आतापर्यंत केवळ 80 लाख महिलांनीच केवायसी पूर्ण केली, अशी माहिती मिळाली आहे. अजून लाखो महिला या प्रक्रियेत सहभागी झालेल्या नाहीत, त्यामुळे अनेकांकडून केवायसीची मुदतवाढ मागणी होत आहे.
भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना नेते उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. दोघं भाऊ आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी एकत्र बोलत आहेत. पण सत्तेवर येण्याची ताकद त्यांच्यात नाही, असा टोला राणेंनी लगावला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी राज्यासाठी काहीच केलं नाही, त्यांचं अस्तित्व संपत चाललंय आणि आता त्यांच्या हाती फक्त भाषणे उरली आहेत, अशी टीका करत राणेंनी ठाकरे बंधूंवर निशाणा साधला.
पवार फॅमिलीचा झोलझाल, मोदी + फडणवीसांच्या गळ्यात घाल!!, असलाच प्रकार कोरेगाव पार्क जमीन घोटाळा बाहेर आल्यापासून काँग्रेस आणि पवार कुटुंबीयांच्या प्रतिक्रियांवरून दिसून राहिलाय.