“जिथे” भाजपला कुणी नव्हते विचारत; “तिथे” पक्षाला आणि NDA ला उमेदवार मिळाले 21 हजार 65!!
जिथे भाजपला कुणी नव्हते विचारत; तिथे पक्षाला आणि NDA ला उमेदवार मिळाले 21 हजार 65!!, हा राजकीय चमत्कार केरळ मध्ये दिसून आला.
जिथे भाजपला कुणी नव्हते विचारत; तिथे पक्षाला आणि NDA ला उमेदवार मिळाले 21 हजार 65!!, हा राजकीय चमत्कार केरळ मध्ये दिसून आला.
लोहा नगरपरिषद निवडणुकीत शरद पवार नावाचा फायदा की तोटा??; कुणाला बसणार फटका??, असे विचारायची वेळ तिथल्या राजकीय घडामोडींनी आणली.
संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये बुधवारी १५० वा संविधान दिवस साजरा करण्यात आला. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संविधान ९ नवीन भाषांमध्ये, म्हणजे मल्याळम, मराठी, नेपाळी, पंजाबी, बोडो, काश्मिरी, तेलुगु, ओडिया आणि आसामीमध्ये जारी केले.
बुधवारी सर्वोच्च न्यायालयात SIR विरुद्ध दाखल केलेल्या तामिळनाडू, बंगाल आणि केरळच्या याचिकांवर सुनावणी झाली. यावेळी निवडणूक आयोगाने म्हटले की, SIR प्रक्रियेबाबत राजकीय पक्ष जाणूनबुजून भीतीचे वातावरण निर्माण करत आहेत.
महाराष्ट्रातली नगरपालिका नगरपंचायतींची निवडणूक शिगेला पोहोचली पण तरीसुद्धा शरद पवारांनी अजून विरोधकांना “हा” सवाल का नाही विचारला
आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) ने म्हटले आहे की, जागतिक अनिश्चिततांसारख्या बाह्य आव्हानांनंतरही भारताची अर्थव्यवस्था मजबूत राहील. आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये भारताची वास्तविक जीडीपी वाढ 6.6% राहण्याचा अंदाज आहे.
बुडत्याला दिसली आधाराची काडी; पवारांच्या नेत्याने पाहिली भविष्याची नांदी!!, असेच म्हणायची वेळ पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांच्या भाषणामुळे आली.
कर्नाटकात मुख्यमंत्री बदलण्याच्या अटकळांदरम्यान, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी बुधवारी सांगितले की, पक्षाचे हायकमांड ही समस्या सोडवतील आणि गरज पडल्यास मध्यस्थीही करतील. त्यांनी एएनआयशी बोलताना सांगितले, तिथली जनताच सांगू शकते की सरकार कसे काम करत आहे. पण मी एवढे नक्की सांगेन की राहुल गांधी, सोनिया गांधी एकत्र बसून यावर चर्चा करतील.
सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी सांगितले की, कायद्यापासून वाचण्यासाठी परदेशात पळून गेलेल्या आरोपींना परत आणण्याचा देशाला पूर्ण अधिकार आहे. न्यायालयाने दुबईत राहणाऱ्या विजय मुरलीधर उधवानीच्या याचिकेवर सुनावणी करण्यास नकार दिला. यामध्ये उधवानीने भारताने UAE ला पाठवलेली त्याला परत आणण्याची विनंती (प्रत्यार्पण विनंती) रद्द करण्याची मागणी केली होती.
दिल्लीत वाढत्या प्रदूषणामुळे लोकांची तब्येत बिघडत आहे आणि श्वास घेण्यास त्रास होत आहे. CJI सूर्यकांत यांनाही याचा फटका बसलेला दिसला.
एरवी स्वतःला नास्तिक म्हणणाऱ्या शरद पवारांना ध्यानधारणेची पुस्तके भेट मिळाली आणि त्याबरोबर perfect political timing साधल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. देव देव करण्यापासून दूर राहिलेल्या शरद पवारांना ध्यान धारणेची पुस्तके भेट दिली आणि ती त्यांनी स्वीकारली याचे बरेच राजकीय अर्थ मुंबईच्या राजकीय वर्तुळात काढले गेले. शरद पवारांनी आत्तापर्यंत “राजयोग” साधायचे बरेच प्रयत्न केले, पण ते सगळे भौतिक पातळीवरचे होते. आता ध्यानधारणेने द्वारे तरी त्यांना या वयात “राजयोग” साध्य होईल का??, असा सवाल राजकीय वर्तुळातून समोर येतोय.
हाँगकाँगच्या उत्तर ताई पो जिल्ह्यात बुधवारी एका 35 मजली निवासी संकुलातील 3 इमारतींना आग लागली. साउथ चायना मॉर्निंग पोस्टनुसार, या दुर्घटनेत चार लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 9 लोक जखमी झाले आहेत. अहवालात म्हटले आहे की, आग किमान तीन इमारतींपर्यंत पसरली होती. बीबीसीनुसार, किमान 13 लोक अजूनही इमारतीच्या आत अडकले आहेत.
पाकिस्तानने अयोध्येतील राम मंदिरात पंतप्रधान मोदींच्या ध्वजारोहणावर आक्षेप घेतला आहे. पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाने मंगळवारी दावा केला की, हे भारतात धार्मिक अल्पसंख्याकांवरील वाढत्या दबावाचा आणि मुस्लिम वारसा मिटवण्याच्या प्रयत्नाचा भाग आहे.
आयएएस अधिकारी असल्याचे भासवून ६ महिने शहरातील पंचतारांकित हॉटेलात राहिलेल्या कल्पना त्र्यंबकराव भागवत या महिलेचे प्रकरण आता राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करणारे ठरत आहे. कारण पोलिसांना तिच्या मोबाइलमध्ये पाकिस्तान लष्कराचे मोबाइल नंबर, अफगाणी नेटवर्कशी चॅटिंग तसेच हटवलेली चॅट हिस्ट्री आणि मोठे आर्थिक व्यवहार सापडले.
पार्थ पवारच्या जमीन घोटाळ्यात अजित पवार यांनी त्यांच्या उपमुख्यमंत्रीपद आणि पालकमंत्री पदाचा 24 तासांत त्यांचा राजीनामा द्यावा. देवेंद्र फडणवीस यांनी हा राजीनामा ताबडतोब घ्यावा.
इस्त्रायलने भारताच्या ईशान्येकडील राज्यांमध्ये राहणाऱ्या बनेई मेनाशे समुदायाच्या उर्वरित ५८०० ज्यूंना आपल्या देशात स्थायिक करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना पुढील ५ वर्षांत इस्त्रायलमध्ये नेले जाईल.
सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी भारतीय लष्करातील ख्रिश्चन अधिकारी सॅम्युअल कमलेसन यांची बडतर्फी योग्य ठरवली. त्या अधिकाऱ्यावर आरोप होता की त्यांनी आपल्या रेजिमेंटच्या साप्ताहिक धार्मिक संचलनांमध्ये आणि मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश करण्यास नकार दिला होता.
आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी मंगळवारी विधानसभेत सांगितले की, गायक जुबीन गर्ग यांचा मृत्यू अपघात नसून हत्या होती. सरमा म्हणाले की, ही अनवधानाने झालेली हत्या किंवा गुन्हेगारी कट नव्हता, तर स्पष्टपणे खून होता. मुख्यमंत्र्यांनी दावा केला की, एका आरोपीने गायकाचा जीव घेतला, तर इतर लोकांनी हत्येत त्याला मदत केली.
राज्याच्या फडणवीस मंत्रिमंडळातले मंत्री आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मालेगाव मधले नेते दादा भुसे यांना राष्ट्रवादीच्या संस्कारांचे लागण झाल्याची चिन्हे दिसली. एकनाथ शिंदेंच्या पेक्षा दादा भुसे यांनाच त्यांच्या मुख्यमंत्रीपदाची तहान लागली.
पुण्यातल्या कोरेगाव पार्कच्या जमीन घोटाळ्यात पार्थ पवारच्या अमेडिया कंपनीने बरेच झोल केले. याची सगळी यादी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषदेत वाचून दाखविली.
केंद्रात मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून संविधानाला धोका असल्याचा ढोल काँग्रेस, कम्युनिस्ट आणि बाकीच्या सगळ्या विरोधी पक्षांनी पिटला. प्रत्यक्षात असा कुठलाही धोका कुठे निर्माण झाल्याचे किंवा सुप्रीम कोर्टाने तसे ताशेरे ओढल्याचे कुठे दिसले नाही. पण म्हणून विरोधकांनी आपल्या भाषणांमध्ये संविधानाला धोका असल्याचा narrative तयार करणे थांबविले नाही.
कॅनडातील ओटावा येथे रविवारी खालिस्तान जनमतसंग्रहादरम्यान, खलिस्तानी दहशतवाद्यांनी भारतीय ध्वज ‘तिरंग्याचा’ अपमान केला. या लोकांनी भारतीय पंतप्रधान आणि अधिकाऱ्यांना ठार मारण्याच्या घोषणा दिल्या.
दिल्ली उच्च न्यायालयाने एका प्रकरणात पतीला घटस्फोटाची परवानगी देताना म्हटले की, गर्भधारणेला पतीवर झालेल्या क्रूरतेविरुद्ध ढाल बनवता येणार नाही. न्यायालयाने असे मानले की, पत्नीच्या वागण्यामुळे पतीने मानसिक छळ सोसला आणि यामुळे वैवाहिक संबंधही पूर्णपणे तुटले.
चीनने अरुणाचल प्रदेशात जन्मलेल्या भारतीय महिला पेम वांगजॉम थांगडॉक यांच्यासोबत शांघाय विमानतळावर गैरवर्तन केल्याचे आरोप फेटाळून लावले आहेत.
28 वर्षांनंतर लालू कुटुंबाला राबडी निवासस्थान रिकामे करण्याची नोटीस मिळाली आहे. गृहनिर्माण विभागाने नोटीस पाठवून 10 सर्कुलर रोड येथील सरकारी निवासस्थान रिकामे करण्यास सांगितले आहे.