Rajnath Singh : ‘आपली क्षेपणास्त्रे जगासाठी आकर्षणाचे केंद्र बनली आहेत’
केंद्रीयमंत्री संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बुधवारी एअरो इंडिया २०२५ च्या स्वदेशीकरण कार्यक्रम आणि समारोप समारंभाला संबोधित केले. ते म्हणाले, भारत बदलाच्या एका क्रांतिकारी टप्प्यातून जात आहे. देशातील लढाऊ विमाने, क्षेपणास्त्र प्रणाली, नौदल जहाजे केवळ आपल्या सीमांचे रक्षण करत नाहीत तर संपूर्ण जगासाठी आकर्षणाचे केंद्र बनत आहेत.