• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 411 of 1510

    Pravin Wankhade

    Iltija Kathua : मेहबूबा यांच्या कन्येचे 2 खासगी सुरक्षा अधिकारी निलंबित; नजरकैदेत असूनही इल्तिजा कठुआला पोहोचल्या

    जम्मू आणि काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांची मुलगी इल्तिजा हिच्या दोन वैयक्तिक सुरक्षा अधिकाऱ्यांना (PSO) निलंबित करण्यात आले आहे. श्रीनगरमध्ये नजरकैदेत असूनही इल्तिजा कठुआला पोहोचल्यानंतर ओमर सरकारने ही कारवाई केली आहे.

    Read more

    Punjab Congress : पंजाब काँग्रेसने म्हटले- आपचे 30 आमदार आमच्या संपर्कात; केजरीवालांनी सर्वांना दिल्लीला बोलावले

    दिल्ली विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर पंजाबमध्येही गोंधळ सुरू झाला आहे. पंजाब काँग्रेसचा दावा आहे की, आम आदमी पक्षाचे (आप) 30 आमदार त्यांच्या संपर्कात आहेत.

    Read more

    २०२४ मध्ये तब्बल २५,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे ड्रग्ज जप्त

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील अमली पदार्थांविरुद्ध शून्य सहनशीलता धोरणांतर्गत, २०२४ मध्ये एनसीबीसह देशभरातील सर्व कायदा अंमलबजावणी संस्थांनी सुमारे २५३३० कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले, जे २०२३ मध्ये जप्त केलेल्या १६१०० कोटी रुपयांच्या तुलनेत ५५ टक्क्यांहून अधिक आहे.

    Read more

    Mamta Kulkarni : ममता कुलकर्णी यांनी किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर पदाचा राजीनामा दिला

    ममता कुलकर्णी यांनी किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रसिद्ध करून राजीनामा जाहीर केला. ममता कुलकर्णी म्हणाल्या की, आज किन्नर आखाड्यात किंवा दोन्ही आखाड्यांमध्ये माझ्याबद्दल वाद आहे, ज्यामुळे मी राजीनामा देत आहे.Mamta Kulkarni

    Read more

    दिल्लीचा धडा शिकायला ममतांचा नकार; म्हणाल्या, बंगाल मधून काँग्रेसच हद्दपार!!

    दिल्ली विधानसभा निवडणुकीतून धडा शिकायला ममता बॅनर्जींचा नकार; म्हणाल्या बंगाल मधून काँग्रेसच हद्दपार!! Bengal दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज 10 फेब्रुवारी रोजी तृणमूळ काँग्रेसच्या सगळ्या आमदारांची कोलकत्यात बैठक घेतली त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी बोलताना ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगाल मध्ये काँग्रेसशी आघाडी करायला नकार दिला. पश्चिम बंगालमध्ये मूळात काँग्रेस आता अस्तित्वातच उरलेली नाही. त्यामुळे त्या पक्षाबरोबर युती काय करणार??, असा सवाल त्यांनी केला. पण दिल्लीमध्ये आम आदमी पार्टी आणि काँग्रेस यांनी एकत्रित निवडणूक लढवली असती तर निकाल वेगळा लागला असता असा दावाही त्यांनी केला.

    Read more

    Israeli : इस्रायली सैन्याने गाझामधून माघार घेण्यास केली सुरुवात

    इस्रायल आणि गाझा यांच्यात सुरू असलेल्या युद्धादरम्यान आता शांतता करार झाला आहे. याअंतर्गत, इस्रायल अटक केलेल्या हमास कैद्यांना सोडेल आणि हमास अपहरण केलेल्या इस्रायली नागरिकांना सोडेल.

    Read more

    Mumbai airport : मुंबई विमानतळावर ८ कोटी रुपयांच्या गांजाची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक

    कस्टम्सच्या एअर इंटेलिजेंस युनिटने मुंबई विमानतळावर बँकॉकहून अवैध वस्तूंची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक केली आहे. आरोपींकडून ८.१५५ किलो हायड्रोपोनिक गांजा जप्त करण्यात आला आहे, ज्याची किंमत सुमारे ८.१५ कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे.

    Read more

    US President Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा आणखी एक धक्कादायक निर्णय!

    चार वर्षांनंतर सत्तेत परतल्यापासून, डोनाल्ड ट्रम्प एकामागून एक जलद निर्णय घेत आहेत. आता पुन्हा एकदा त्यांनी धक्कादायक निर्देश जारी केले आहेत. ट्रम्प यांनी ट्रेझरी विभागाला नवीन नाणी तयार करणे थांबवण्याचे निर्देश दिले आहेत. ट्रम्प यांनी यामागे जास्त खर्च असल्याचे सांगितले आहे.

    Read more

    PM Modi : पंतप्रधान मोदी फ्रान्सला रवाना, एआय अॅक्शन समिटचे सह-अध्यक्षपद भूषवतील

    पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी फ्रान्सला रवाना झाले. ते तिथे एआय अॅक्शन समिटचे सह-अध्यक्षपद भूषवतील. पंतप्रधान मोदी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत फ्रान्समधील पहिल्या भारतीय वाणिज्य दूतावासाचे उद्घाटन करतील.

    Read more

    Tirupati temple : तिरुपती मंदिर प्रसाद प्रकरणात चार आरोपींना अटक ; सीबीआयने सांगितले कसे करायचे हेराफेरी?

    जगातील सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी एक असलेल्या तिरुपती मंदिरातील प्रसादात भेसळ केल्याप्रकरणी सीबीआयने चार जणांना अटक केली आहे. सीबीआय अंतर्गत या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटीने चारही जणांना अटक केली आहे.

    Read more

    मुंबईत रंगल्या भेटीगाठी आणि झाले नाश्तापाणी; दिल्लीत केली डिनर डिप्लोमसी!!

    मुंबईत बऱ्याच दिवसांनी रंगल्या भेटीगाठी, झाले नाश्तापाणी तसेच दिल्लीत झाली डिनर डिप्लोमसी!! आजचा 10 फेब्रुवारी 2025 चा दिवस असा संमिश्र राजकीय घडामोडींचा ठरला.

    Read more

    Draupadi Murmu : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कुंभनगरी गाठली अन् संगमात केले पवित्र स्नान

    सोमवारी देशाच्या प्रथम नागरिक, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी तीर्थराजच्या पवित्र भूमीवर पोहोचून संगमात पवित्र स्नान केले. राष्ट्रपतींचे स्वागत करण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ विमानतळावर पोहोचले. यानंतर दोघेही संगम क्षेत्रात पोहोचले. त्या आज आठ तासांपेक्षा जास्त काळ संगम शहरात असतील.

    Read more

    Manipur : वाढत्या असंतोषामुळे मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा कसा झाला?

    मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी रविवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. राज्यात जवळपास दोन वर्षांपासून सुरू असलेल्या जातीय हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर हा राजीनामा देण्यात आला आहे, ज्यामध्ये आतापर्यंत २५० हून अधिक लोकांचा बळी गेला आहे.

    Read more

    Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये 31नक्षली ठार, 2 जवान शहीद, 2 जखमी; बिजापूरच्या इंद्रावती राष्ट्रीय उद्यान परिसरातून 12 मृतदेह व शस्त्रे जप्त

    वृत्तसंस्था बिजापूर : Chhattisgarh छत्तीसगड-महाराष्ट्र सीमेवर रविवारी झालेल्या चकमकीत १००० हून अधिक सैनिकांनी ३१ नक्षलवाद्यांना ठार मारले आहे. या चकमकीत २ डीआरजी आणि एसटीएफ जवान […]

    Read more

    Jarange’s : वाळू तस्करीत जरांगेंच्या मेहुण्यासह, 7 मराठा आंदोलक हद्दपार; अवैध उत्खनन, शासकीय कामात अडथळा, धमकीचे गुन्हे

    अवैध वाळू उत्खनन, चोरटी वाहतूक, शासकीय कामात अडथळा, धमकीचे गुन्हा दाखल असलेल्या ९ जणांना चार जिल्ह्यांतून हद्दपार करण्याची कारवाई अंबडचे उपविभागीय अधिकारी पुलकित सिंह यांनी केली. त्यांना जालना, संभाजीनगर, बीड, परभणी जिल्ह्यांत प्रवेशास मनाई केली.

    Read more

    पंकजा मुंडे यांनी सोडून दिली स्वतंत्र पक्षाची “पुडी”; महाराष्ट्रातल्या राजकीय असंतुष्टांनी घेतली त्यात उडी!!

    पंकजा मुंडे यांनी सोडून दिली स्वतंत्र पक्षाची पुडी; महाराष्ट्रातल्या राजकीय असंतुष्टांनी घेतली त्यामध्ये उडी!! असे चित्र महाराष्ट्रात दिसले.

    Read more

    Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे प्रमुख राज ठाकरेंची घेतली भेट

    महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) प्रमुख राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांची राज ठाकरेंशी ही पहिलीच भेट आहे.

    Read more

    Meta : 3,000 हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार मेटा; कंपनी प्रभावित कर्मचाऱ्यांना ई-मेल करणार

    फेसबुकची मूळ कंपनी मेटा ३,००० हून अधिक नोकऱ्या कमी करत आहे. या कपातीचा परिणाम कंपनीच्या अंदाजे ५% कर्मचाऱ्यांवर होईल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनीच्या कर्मचाऱ्यांना शुक्रवारी एका इंटर्नल मेमोद्वारे याबद्दल माहिती देण्यात आली.

    Read more

    राष्ट्रपतींची ही भेट केवळ प्रयागराजसाठी ऐतिहासिक नाही तर देशभरातील भाविकांसाठी एक प्रेरणादायी क्षण आहे

    सोमवारी देशाच्या प्रथम नागरिक, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी तीर्थराजच्या पवित्र भूमीवर पोहोचून संगमात पवित्र स्नान केले.

    Read more

    Air Force : हवाई दल आणि लष्कर प्रमुखांचे तेजसमध्ये उड्डाण; पहिल्यांदाच 2 लष्करप्रमुख एकाच लढाऊ विमानात एकत्र

    रविवारी हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल ए. पी. सिंग आणि लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी एलएसी येथे तेजस लढाऊ विमानातून उड्डाण केले. बंगळुरूमध्ये एअरो इंडिया-२०२५ सुरू होण्याच्या एक दिवस आधी दोन्ही लष्कर प्रमुख तेजस लढाऊ विमानात बसले. एअरो इंडिया-२०२५ कार्यक्रम १० फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी दरम्यान चालेल.

    Read more

    महाकुंभात भाविकांची अभूतपूर्व गर्दी, संगम स्टेशन १४ फेब्रुवारीपर्यंत बंद

    महाकुंभात भाविकांची अलोट गर्दी होत आहे. गर्दीमुळे परिस्थिती बिघडू लागली आहे. त्या पार्श्वभूमीवर, संगम स्टेशन १४ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्यात आले आहे.

    Read more

    CM Atishi : पीएम मोदींच्या अमेरिका भेटीनंतर दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाचा निर्णय; CM आतिशी यांचा राजीनामा

    दिल्लीत भाजपला बहुमत मिळाल्यानंतर आता मुख्यमंत्रिपदाच्या निर्णयाबाबत चर्चा सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावरून परतल्यानंतर मुख्यमंत्र्यांचे नाव फायनल केले जाईल, असा दावा सूत्रांनी केला आहे. खरंतर, पंतप्रधान मोदी फ्रान्स-अमेरिकेच्या दौऱ्यावर जात आहेत. अशा परिस्थितीत, दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा त्यांच्या दौऱ्यानंतरच होईल. यामध्ये भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचाही समावेश असेल.

    Read more

    PM Modi : PM मोदी फ्रान्समध्ये होणाऱ्या AI समिटला उपस्थित राहणार; AIच्या वापरासाठी मार्गदर्शक तत्त्वे निश्चित होणार

    पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या म्हणजेच 10 फेब्रुवारी रोजी फ्रान्स दौऱ्यावर रवाना होतील. येथे पंतप्रधान मोदी 11 फेब्रुवारी रोजी पॅरिसमध्ये होणाऱ्या आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) शिखर परिषदेचे सह-अध्यक्षपद फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत करतील. यामध्ये, जगभरातील नेते आणि तंत्रज्ञान तज्ञ एआयसाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करतील.

    Read more

    Manoj Jarange : मनोज जरांगेंच्या मेहुण्याला तडीपारीची नोटीस; मुख्यमंत्री म्हणाले- कोणाचा साला कोणाचा नातेवाईक हे बघून कारवाई नसते!

    मनोज जरांगे पाटील यांच्या मेहुण्यावर जालना पोलिसांनी तडीपारची कारवाई केली आहे. जालना जिल्ह्यात 9 वाळू माफियांविरोधात पोलिसांनी तडीपारीची कारवाई केली आहे. यात मनोज जरांगे यांचा मेहुणा देखील आहे. विलास खेडकर असे त्याचे नाव आहे. यावर बोलताना मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरच टीका केली होती. आता यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

    Read more