Anmol Ambani : अनिल अंबानींनंतर मुलगा अनमोलवर FIR; युनियन बँकेकडून ₹228 कोटींच्या फसवणुकीचा आरोप
CBI ने रिलायन्स ग्रुपचे चेअरमन अनिल अंबानी यांचा मोठा मुलगा जय अनमोल यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. रिलायन्स होम फायनान्स आणि रिलायन्स कमर्शियल फायनान्सशी संबंधित कंपन्यांनी युनियन बँक ऑफ इंडियासोबत २२८.०६ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.