माफी नाही मागणार, कुणाल कामराची मस्ती; अजूनही बिळात लपूनच अविष्कार स्वातंत्र्याची वकिली!!
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विकृत विनोद खिल्ली उडवणाऱ्या कुणाल कामरा याने आपल्या सोशल मीडिया अकाउंट वरून माफी नाही मागणार अशी मस्ती केली
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विकृत विनोद खिल्ली उडवणाऱ्या कुणाल कामरा याने आपल्या सोशल मीडिया अकाउंट वरून माफी नाही मागणार अशी मस्ती केली
पेमेंट कौन्सिल ऑफ इंडियाने सोमवारी पंतप्रधान मोदींना एक पत्र लिहिले आहे. पत्रात, पंतप्रधान मोदींना झिरो मर्चंट डिस्काउंट रेट (MDR) धोरणाचा पुनर्विचार करण्यास सांगितले आहे. युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) आणि रुपे डेबिट कार्डद्वारे केलेल्या व्यवहारांवर व्यापाऱ्यांकडून व्यापारी शुल्क आकारू नये या परिषदेच्या बाजूने आहे.
मुख्यमंत्री रेखा गुप्ता मंगळवारी सकाळी ११ वाजता दिल्ली विधानसभेत त्याचा पहिले अर्थसंकल्प सादर करतील.
सरकारने खासदारांच्या पगारात २४% वाढ केली आहे. संसदीय कामकाज मंत्रालयाने सोमवारी याबाबतची अधिसूचना जारी केली. यानुसार, सध्याच्या खासदारांना आता दरमहा १.२४ लाख रुपये वेतन मिळेल. पूर्वी त्यांना दरमहा १ लाख रुपये मिळत होते.
कुणाल कामराने विंडबन गीताद्वारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्षपणे टिप्पणी केली होती. या टीकेमुळे शिंदे गटातील कार्यकर्ते चांगलेच संतप्त झाले. त्यांनी कुणाल कामराच्या स्टुडिओची तोडफोड केली. या सर्व वादावर कुणाल कामराची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. कोर्टाने विचारले, तर मी माफी मागेन अशी एका वाक्यात कुणालने प्रतिक्रिया दिली आहे. दुसरीकडे कुणालच्या स्टुडिओची तोडफोड करणाऱ्या सर्वांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.
कर्नाटकात मुस्लिमांना सार्वजनिक कंत्राटात ४% आरक्षण देण्याच्या मुद्द्यावर सोमवारी राज्यसभेत मोठा गदारोळ झाला. भाजप खासदारांनी हा मुद्दा उचलत काँग्रेसवर घटना बदलण्याचा आरोप केला. संसदीयकार्य मंत्री किरेन रिजिजू म्हणाले, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, जे घटनात्मक पदावर आहे, त्यांनी सांगितले की, पक्ष घटना बदलून मुस्लिमांना आरक्षण देईल. हे कुणी सामान्य माणसाने म्हटले असते तर आम्ही गांभीर्याने घेतले नसते.
मृत खातेदारांच्या वारसांना शेतजमिनीशी संबंधित अधिकार सहज आणि वेगाने मिळावेत यासाठी “जिवंत सातबारा’ मोहीम राज्यभर राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये मृत खातेदारांची नावे कमी होऊन वारसांच्या नावे सातबारा करण्याची मोहीम राबवण्यात येणार असून राज्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन सहभागी व्हावे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवन, मुंबई येथे महापारेषण प्रलंबित प्रकल्पासंदर्भात आढावा बैठक संपन्न झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रसंगी महापारेषणच्या विविध जिल्ह्यातील प्रलंबित कामांचा सविस्तर आढावा घेऊन सर्व कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथे 100 दिवसांच्या आराखड्यानुसार ऊर्जा विभागाअंतर्गत महावितरण, महानिर्मिती, महापारेषण व महाऊर्जा या कंपन्यांनी केलेल्या कामगिरीच्या प्रगती पुस्तकाचे प्रकाशन केले.
प्रकल्पग्रस्तांना एक महिन्यात सानुग्रह अनुदान वितरित करण्यासही सांगतिले आहे.
राज्यातील २५ हजार विद्यार्थ्यांसाठी राज्याच्या विविध भागांत सामाजिक न्याय विभागाकडून १२५ वसतिगृहे सुरू करण्यात येणार आहेत.
कोराडी विद्युत प्रकल्पासाठी वेस्टर्न कोल इंडियाचा कोळसा वापरावा, असंही फडणवीसांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विनोदी कलाकार कुणाल कामराने केलेल्या टीकेमुळे एक नवीन वाद निर्माण झाला आहे. शिंदे समर्थक प्रचंड चिडले असून, कारवाई करण्याची मागणी होत आहे.
सीबीआयने एनएचएआयच्या जीएमला लाच घेताना रंगेहाथ अटक केली आहे. जेव्हा सीबीआयने त्याला पकडले तेव्हा तो १५ लाख रुपयांची लाच घेत होता. सीबीआयने जीएमसह आणखी ३ जणांना अटक केली आहे. जीएमचे नाव रामप्रीत पासवान असल्याचे सांगितले जात आहे, तो सध्या पाटणा प्रादेशिक कार्यालयात रूजू आहे. त्याच वेळी, NHI ने त्याच्या घरावरही छापा टाकला, ज्यामध्ये कोट्यवधी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली.
सर्व समस्या संवैधानिक पद्धतीने सोडवता येतात, असे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बीआर गवई यांनी रविवारी सांगितले. जेव्हा संवाद असतो, तेव्हा उपाय सहज सापडतात.न्यायमूर्ती गवई म्हणाले, ‘मणिपूरमधील लोक वांशिक संघर्षामुळे खूप त्रस्त आहेत. सर्वांनाच शांतता प्रस्थापित करायची आहे. सध्याची स्थिती कायम ठेवण्यात कोणालाही रस नाही.”
विश्व हिंदू परिषदेच्या पथकाने रविवारी दिल्लीतील हुमायूनच्या कबरीची पाहणी केली. औरंगजेबाच्या कबरीबाबत वाद सुरू असतानाच विश्व हिंदू परिषदेच्या सदस्यांनी हुमायूनच्या कबरीची पाहणी केली आहे. तथापि, हुमायूनच्या कबरीची पाहणी केल्यानंतर, विश्व हिंदू परिषदेने रविवारी सांगितले की संघटनेच्या एका शिष्टमंडळाने येथील हुमायूनच्या कबरीची “तपासणी” केली. ते पुढे म्हणाले की, यामागचा उद्देश दिल्लीच्या “ऐतिहासिक संदर्भाचा” अभ्यास करणे आहे.
छत्तीसगड नक्षलमुक्त करण्यासाठी सरकार आणि सुरक्षा दल सतत प्रयत्न करत आहेत. राज्याच्या विविध भागात नक्षलवाद्यांशी सतत चकमकी सुरू आहेत आणि त्यांचा खात्मा केला जात आहे. त्याच वेळी, नक्षलवादी आता मोठ्या संख्येने आत्मसमर्पण करत आहेत.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यावर्षी विजयादशमीला शंभर वर्षे पूर्ण करत आहे. शताब्दी वर्षात संघ कार्याचा विस्तार आणि समाज परिवर्तन यावर भर देण्यात येणार असून अधिक गुणात्मक आणि व्यापक काम करण्याचा संकल्प करत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेची सांगता (रविवार, २३ मार्च २०२५) झाली.
खासदारांच्या पगारात मोठी वाढ झाली आहे. आता खासदारांना दरमहा १ लाख २४ हजार रुपये मिळतील, जे पूर्वी १ लाख रुपये होते. याशिवाय दैनिक भत्ताही दोन हजारांवरून अडीच हजार रुपये करण्यात आला आहे.
औरंगजेबाची कबर हटवण्याबाबत नागपूरमध्ये झालेल्या निदर्शनानंतर अचानक हिंसाचार उफाळला होता. दरम्यान, महाराष्ट्र सरकारने आता हिंसाचारातील मुख्य आरोपी फहीम खानवर कारवाई केली आहे
एकीकडे संघावर हल्लाबोल, तर दुसरीकडे मुस्लिम आरक्षणासाठी घटना बदल, हा राहुल गांधी आणि काँग्रेस त्यांचा डाव झाला उघड!!
विनोदी अभिनेता कुणाल कामरा याने महाराष्ट्राच्या राजकारणावर टिप्पणी करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता केलेली टीका यामुळे शिवसैनिक प्रचंड चिडलेले आहेत. मुंबईतील याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात कुणाल कामरा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
“लाल संविधानी” कुणाल कामराभोवती लिबरल लोकांचा प्रचंड जमावडा; तरीही समोरून लढण्याऐवजी तो पळून का गेला??, असा सवाल हातात लाल संविधान फडकावून स्टॅन्ड अप कॉमेडी करणाऱ्या कुणाल कामराच्या पळून जाण्यामुळे समोर आलाय!!
नागपुरात औरंगजेब प्रेमींनी घडविलेल्या दंगल आणि हिंसाचाराचा मास्टर माईंड फहीम खान याने अतिक्रमण करून बांधलेल्या तीन मजली घरावर अखेर नागपूर महापालिकेने बुलडोझर चालविला.
विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गद्दारीची स्टँड अप कॉमेडी करणारा कुणाला कामरा हातात लाल संविधान घेऊन महाराष्ट्र सरकारला आव्हान देत होता, पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कायद्याचा बडगा उगारताच हा लाल संविधानी कुणाल कामरा अटकेच्या भीतीने रफूचक्कर झाला.