• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 34 of 1313

    Pravin Wankhade

    Bawankule : बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर जोरदार पलटवार: “खंडणीखोरांचे सरदार कोण, हे जनतेला ठाऊक आहे”

    मुंबईत राजकीय तापमान चढवणारा शाब्दिक वाद सुरू झाला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी महायुती सरकारवर आणि विशेषतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर “चीफ नव्हे तर थीफ मिनिस्टर” असा आरोप करत जोरदार हल्ला चढवला होता. त्यांच्या या वक्तव्यावर ज्येष्ठ भाजप नेते तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट पलटवार करत उद्धव ठाकरेंवर खंडणीखोरीचे गंभीर आरोप लावले.

    Read more

    Zelenskyy Modi : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांची मोदींशी फोनवर चर्चा; रशियन हल्ल्यांबद्दल माहिती दिली

    युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी सोमवारी पंतप्रधान मोदींना फोन करून त्यांच्याशी चर्चा केली. झेलेन्स्की यांनी एक्स वर याबद्दल माहिती दिली. ते म्हणाले- भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदींशी माझी दीर्घ चर्चा झाली. आम्ही द्विपक्षीय सहकार्य आणि जागतिक राजनैतिक मुत्सद्देगिरीवर सविस्तर चर्चा केली.

    Read more

    Kundeshwar : कुंडेश्वर येथे भीषण अपघात: 9 महिला भाविकांचा मृत्यू, 35 हून अधिक जखमी

    जिल्ह्यातील राजगुरूनगर तालुक्यातील कुंडेश्वर येथे आज दुपारी एक भीषण अपघात झाला. महादेवाच्या दर्शनासाठी निघालेली भाविकांची पिकअप व्हॅन भरधाव वेगात दरीत कोसळली. या अपघातात 9 महिला भाविकांचा मृत्यू झाला असून 35 हून अधिक जण जखमी झाले आहेत. मृतांपैकी 7 जणींचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर दोन महिलांनी रुग्णालयात नेताना प्राण सोडले.

    Read more

    राहुल गांधींच्या पुढाकाराने सकाळी 300 खासदारांचा दिल्लीच्या रस्त्यावर मोर्चा; संध्याकाळी खर्गेंची ताज पॅलेस हॉटेलमध्ये 5 स्टार डिनर पार्टी!!

    मतांच्या चोरी विरोधात राहुल गांधींच्या पुढाकाराने सकाळी 300 खासदारांचा दिल्लीच्या रस्त्यावर मोर्चा; संध्याकाळी मल्लिकार्जुन खरेदींची ताज पॅलेस हॉटेलमध्ये 5 स्टार डिनर पार्टी!!,

    Read more

    Rahul Gandhi : राहुल गांधी यांना भोवणार शकुन राणी प्रकरण, निवडणूक आयोगाची नोटीस, पुरावे सादर करण्याचे निर्देश

    काँग्रेस नेते राहुल गांधी यांना शकुन राणी प्रकरण चांगलेच भोवणार असल्याची चिन्हे आहेत. निवडणूक आयोगावर गंभीर आरोप करताना राहुल गांधी यांनी शकुन राणी या महिलेचा संदर्भ दिला होता. त्या शकुन राणीने दोन वेळा मतदान केल्याचा दावा राहुल गांधींनी केला. त्यावर आता निवडणूक आयोगाने राहुल गांधींना नोटीस बजावली आहे. या संबंधी सर्व पुरावे सादर करा असे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत.

    Read more

    American Soldier : रशियासाठी लढणाऱ्या अमेरिकन सैनिकाला पदक; गतवर्षी युक्रेनमध्ये हत्या; आई अमेरिकन गुप्तचर संस्था CIAची उपसंचालक

    युक्रेनविरुद्धच्या युद्धात रशियाकडून लढणाऱ्या एका अमेरिकन सैनिकाला राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी मरणोत्तर ऑर्डर ऑफ लेनिन पदक प्रदान केले आहे. बीबीसीच्या वृत्तानुसार, या अमेरिकन तरुणाचे नाव मायकेल ग्लॉस (२१) होते. गेल्या वर्षी युक्रेनमध्ये रशियाकडून लढताना तो शहीद झाला होता.

    Read more

    Iran Deports : इराण अफगाण निर्वासितांना तपासणीशिवाय बाहेर काढतोय; मुलांना कुटुंबांपासून वेगळे केले, 100 दिवसांत 10 लाख स्थलांतरित

    इराण अफगाण निर्वासितांना त्यांची कायदेशीर स्थिती तपासल्याशिवाय देशातून हाकलून लावत आहे. हा आरोप इराणी सामाजिक कार्यकर्त्यांनी स्थानिक प्रशासनावर केला आहे. यामुळे चुकीची ओळख, कुटुंब वेगळे होणे आणि हद्दपारी दरम्यान गैरवापर अशा असंख्य घटना घडल्या आहेत. तेहरानचे गव्हर्नर मोहम्मद सादिक मोतामेदियन म्हणाले की, गेल्या १०० दिवसांत १० लाखांहून अधिक अफगाणिस्तानवासीयांना बाहेर काढण्यात आले आहे. त्यापैकी ४ लाख जण एकट्या तेहरान प्रांतातील आहेत.

    Read more

    Parliament : सुधारित आयकर विधेयक आज संसदेत सादर होणार; करप्रणाली सोपी करण्यासाठी समितीने 566 बदल सुचवले

    सुधारित आयकर विधेयक २०२५ उद्या म्हणजेच सोमवार, ११ ऑगस्ट रोजी संसदेत सादर केले जाईल. शुक्रवारी (८ ऑगस्ट) अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी ३१ सदस्यीय निवड समितीने बदल सुचविल्यानंतर नवीन आयकर विधेयक २०२५ मागे घेतले.

    Read more

    Sonia Game : राहुल गांधींचे नेतृत्व INDI आघाडीवर लादण्यासाठी पुढाकार; पण निवडणूक आयोगाला सहीचे प्रतिज्ञापत्र द्यायला राहुलची माघार!!

    लोकसभेतले विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचे नेतृत्व INDI आघाडीवर लादण्यासाठी पुढाकार; पण निवडणूक आयोगाला सहीचे प्रतिज्ञापत्र द्यायला राहुलची माघार!!, हे सोनिया गांधी प्रणित राजकीय सत्य आजच्या मत चोरी प्रकरणाच्या खासदारांच्या मोर्चावरून सिद्ध झाले.

    Read more

    Rajnath Singh : राजनाथ म्हणाले- पहलगाममध्ये धर्म विचारून मारले, आम्ही कर्म पाहून मारले; छेडणाऱ्याला सोडणार नाही हा आमचा निर्धार

    केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले- मध्य प्रदेशमध्ये संरक्षण क्षेत्राचे केंद्र बनण्यासाठी सर्व गुण आहेत. त्यांच्याकडे सर्व संसाधने आहेत. रायसेनमध्ये केवळ रेल्वे कोचच तयार केल्या जाणार नाहीत तर विविध रेल्वे उत्पादने देखील बनवली जातील. मध्य प्रदेशमध्ये बनवलेल्या रेल्वे कोच देशभरातील स्पीड ट्रेनमध्ये वापरल्या जातील. मध्य प्रदेशचा औद्योगिक विकास देशाला विकासाच्या नवीन उंचीवर घेऊन जाईल.

    Read more

    Rahul Gandhi : निवडणूक आयोगाने राहुल गांधींकडून मत चोरीचे पुरावे मागितले; नोटिसीमध्ये म्हटले- महिलेच्या दोनदा मतदानाचा दावा चुकीचा

    कर्नाटकच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी (CEO) काँग्रेस नेते राहुल गांधी यांना नोटीस पाठवून त्यांच्या मतचोरीच्या विधानाचे पुरावे मागितले आहेत. ७ ऑगस्ट रोजी राहुल गांधी यांनी महादेवपुरा विधानसभा मतदारसंघात १ लाखाहून अधिक मते चोरीला गेल्याचा आणि एका महिलेने दोनदा मतदान केल्याचा आरोप केला होता.

    Read more

    US Blocks Afghanistan : अमेरिकेने अफगाणिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा पाकिस्तान दौरा रोखला; तालिबानशी संबंध असल्याने निर्बंध लादल्याचा दावा

    पाकिस्तानी माध्यम डॉनने आपल्या वृत्तात दावा केला आहे की अमेरिकेने अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्ताकी यांचा पाकिस्तान दौरा रद्द केला आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने (UNSC) लादलेल्या अमेरिकेच्या प्रवास निर्बंधांमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

    Read more

    “मागच्या” रांगेतून संजय राऊत “पुढे” आले; पोलिसांच्या बस मध्ये राहुल गांधींच्या शेजारी बसले!!

    लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधींच्या घरी झालेल्या मतचोरीच्या प्रेझेंटेशनच्या वेळी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षप्रमुख शरद पवार यांना शेवटच्या रांगेत बसवल्याची बातमी महाराष्ट्रभर गाजली.

    Read more

    खासदारांच्या 30 जणांच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी येण्याची निवडणूक आयोगाची परवानगी; पण विरोधकांच्या 300 खासदारांना आयोगात करायची होती घुसखोरी!!

    मतदान चोरीच्या मुद्द्यापासून ते मतदार यादीच्या शुद्धीकरणापर्यंत सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी निवडणूक आयोगाने सर्वपक्षीय खासदारांच्या 30 जणांच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी येण्याची परवानगी दिली होती

    Read more

    Manisha Kayande : जैन मुनींच्या इशाऱ्याल मनीषा कायंदेंचे प्रत्युत्तर- ज्यांना कबुतरे आवडतात, त्यांनी ती घरी पाळावीत; सार्वजनिक ठिकाणी त्रास नको!

    मुंबईच्या दादरच्या कबुतरखान्यावरून वाद चांगलाच चिघळला आहे. जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी या प्रकरणी सरकारला आव्हान दिले आहे. धर्माच्या विरोधात गेल्यास आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला. तसेच, भाजप आमदार चित्रा वाघ आणि शिंदे गटाच्या शिवसेना आमदार मनीषा कायंदे यांचा एकेरी उल्लेख केला.

    Read more

    Pakistan Army : पाकिस्तानी लष्करप्रमुखाची भारताला क्षेपणास्त्र हल्ल्याची धमकी; म्हणाले- सिंधू नदी भारताची खासगी मालमत्ता नाही, धरण बांधले तर नष्ट करू

    द प्रिंटच्या एका अहवालात असा दावा करण्यात आला आहे की पाकिस्तानचे फील्ड मार्शल असीम मुनीर यांनी भारताला अणुयुद्धाची धमकी दिली आहे. मुनीर यांनी सिंधू पाणी करार स्थगित केल्याबद्दल १० क्षेपणास्त्रांनी हल्ला करून भारताला नष्ट करण्याबद्दल बोलले.

    Read more

    ट्रम्पच्या नोबेल फुग्याला लाडक्या असीम मुनीरची टाचणी; अमेरिकेतून भारताच्या बरोबर अर्ध्या जगाला अण्वस्त्र हल्ल्यांची धमकी!!

    डोनाल्ड ट्रम्पने फुगवलेल्या नोबेल फुग्याला लाडक्या असीम मुनीरची टाचणी; अमेरिकेतून भारताच्या बरोबर जगाला दिली अण्वस्त्र हल्ल्यांची धमकी!!, असला प्रकार अमेरिकेतून समोर आला. Asim Munir

    Read more

    Nitin Gadkari : आर्थिकदृष्ट्या सक्षम देशांकडून सध्या गुंडगिरी, ट्रम्प टॅरिफवरून नितीन गडकरी यांचा टोला

    आर्थिकदृष्ट्या सक्षम देशांकडून सध्या गुंडगिरी सुरू आहे.” असे म्हणत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नाव न घेता अमेरिकेला टोला लगावला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला. तसेच, भारताने रशियाकडून तेल खरेदी करू नये

    Read more

    Prakash Ambedkar : किती खोटं बोलावं यालाही मर्यादा, प्रकाश आंबेडकर यांची शरद पवारांवर टीका

    राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर मत चोरीचा आरोप केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही निवडणूक प्रक्रियेवर संशय व्यक्त केला. दोघांनी भेटून विधानसभेत १६० जागा जिंकून देण्याची गॅरंटी दिली होती असे दावा त्यांनी केला. आता नाव आठवत नाही असे ते म्हणाले. यावरून प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवारांवर जोरदार हल्लाबोल केला असून किती खोटं बोलावं यालाही एक मर्यादा असते असे ते म्हणाले.

    Read more

    Laxman Hake : जरांगे नावाच्या बबड्याला रसद पुरवणारे शरद पवार इच्छाधारी नागाप्रमाणे वेटोळे घालून बसलेत लक्ष्मण हाके यांची टीका

    जरांगे नावाच्या बबड्याला रसद पुरवणारे त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देणारे, भेट देणारे शरद पवार आज ओबीसींच्या बाजूने मंडल यात्रा काढत आहेत. शरद पवार हे इच्छाधारी नागाप्रमाणे वेटोळे घालून बसले आहेत, असा हल्लाबोल ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी केली आहे.

    Read more

    Jain Monk : कबुतरखान्याच्या मुद्द्यावरून जैन मुनींचा आंदोलनाचा इशारा; म्हणाले – धर्माविरोधात जाल, तर कोर्टालाही मानणार नाही

    मुंबईतील कबुतरखान्यांच्या परिसरात पक्ष्यांना खाद्य टाकण्यास उच्च न्यायालयाने घातलेली बंदी कायम ठेवल्यानंतर जैन समाजाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. न्यायालयाचा आदेश लागू असूनही अलीकडेच दादर कबुतरखान्याजवळ काही जैन बांधवांनी कबुतरांना धान्य टाकले होते. मात्र, पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत त्यांना थांबवले. या कारवाईनंतर जैन समाजाने आता आक्रमक पवित्रा घेतला असून, 13 ऑगस्टपासून उपोषणाला बसणार आहेत. तर वेळ पडल्यास शांतताप्रिय असणारा आमचा समाज शस्त्रंही हातात घेईल आणि कोर्टाच्या आदेशालाही जुमानणार नसल्याचा इशारा जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी दिला आहे.

    Read more

    India Tariffs : अमेरिकेवर रेसिप्रोकल टॅरिफ लादण्याची भारताची तयारी; काही US प्रॉडक्ट्सवर 50% पर्यंत लावण्याची शक्यता

    अमेरिकेने भारतीय स्टील, अॅल्युमिनियम आणि इतर अनेक उत्पादनांवर ५०% आयात शुल्क (आयात शुल्क) लादले आहे. हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, याला प्रत्युत्तर म्हणून, भारतही निवडक अमेरिकन उत्पादनांवर ५०% पर्यंत आयात शुल्क लादण्याचा विचार करत आहे.

    Read more

    निवडणूक आयोगाला टार्गेट करायचा बहाणा आहे; INDI आघाडीवर नेतृत्व लादायचा खरा निशाणा आहे!!

    मतदान चोरी प्रकरणावरून निवडणूक आयोगाला टार्गेट करायचा बहाणा आहे; INDI आघाडीवर नेतृत्व लादायचा खरा निशाणा आहे!!, असेच राहुल गांधींच्या आत्तापर्यंतच्या राजकीय खेळींवरून स्पष्ट होते. राहुल गांधींनी ज्या प्रकारे मतदान चोरीचा विषय लावून धरला आणि त्यांच्या पाठोपाठ सगळ्या प्रादेशिक नेतृत्वाची फरफट केली, ते पाहता वर उल्लेख केलेलाच मुद्दा खरा आहे.

    Read more

    PM Modi : PM मोदींचे ट्रम्प यांच्या मृत अर्थव्यवस्थेच्या विधानाला प्रत्युत्तर; भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या मार्गावर

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव न घेता त्यांना उत्तर दिले. मोदींनी बंगळुरूमध्ये म्हटले- भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. आपण १० व्या क्रमांकावरून पहिल्या ५ व्या क्रमांकावर आलो आहोत. लवकरच पहिल्या ३ मध्ये येऊ. ही ताकद सुधारणा, कामगिरी आणि परिवर्तनातून आली आहे. देशाच्या कामगिरीचा झेंडा आकाशात उंच फडकत आहे.

    Read more

    Prakash Ambedkar : शरद पवारांचा दावा म्हणजे वरातीमागून घोडे; प्रकाश आंबेडकरांची बोचरी टीका

    शरद पवारांनी 160 जागांसंदर्भात केलेला दावा हा वराती पाठीमागून घोडे असल्यासारखे आहे. आम्ही यापूर्वी सगळ्या पक्षांना कोर्टात जाण्याचे आवाहन केले होते, पण तेव्हा कोणीही सोबत आले नाही. आता फक्त बोंबलत बसले आहेत. किती खोटे बोलावे, यालाही एक सीमा असते,” अशी बोचरी टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. तसेच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या ‘मंडल यात्रे’वर टीका करत गंभीर आरोप केले आहेत.

    Read more