Bengaluru : बंगळुरू चेंगराचेंगरीप्रकरणी हायकोर्ट RCBच्या याचिकेवर सुनावणी करणार; फौजदारी खटला रद्द करण्यासाठी अपील
चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या चेंगराचेंगरीप्रकरणी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) विरुद्ध दाखल केलेला फौजदारी खटला रद्द करण्याबाबतची सुनावणी उद्या होणार आहे. या प्रकरणात त्यांना गोवण्यात आले आहे, असे म्हणत फ्रँचायझीने सोमवारी कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.