• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 266 of 1430

    Pravin Wankhade

    White House डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रस्थापित माध्यमांची मक्तेदारी मोडल्या बरोबर अमेरिकेत अविष्कार स्वातंत्र्याचा नावाने आरडाओरडा सुरू!!

    जेव्हा बिल क्लिंटन आणि टोनी ब्लेअर वगैरेंनी जगात लेफ्ट लिबरल सिस्टीम सुरू केली, तेव्हा त्यांना मोठे लोकशाहीवादी “स्टेट्समन” म्हणून गौरविण्यात आले

    Read more

    Chief Minister : जिथे संपादन होणार, तिथल्या जमिनी विकू नका, दलालांच्या भानगडीत पडू नका; मुख्यमंत्र्यांचे शेतकऱ्यांना भावनिक आवाहन

    जिथे जमिनीचे संपादन होणार आहे, तेथील शेतकऱ्यांनी जमीन विकली नाही पाहिजे, दलालांच्या भानगडीत पडले नाही पाहिजे, असे भावनिक आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना केले. कोणीतरी अचानक तुमची जमीन विकत घेतोय तर हा जमीन का घेतोय याची माहिती घ्या. कारण जमिनीचा पैसा हा थेट शेतकऱ्यांनाच मिळाला पाहिजे, अशी आमची भावना असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

    Read more

    Vijay Thalapathy : साऊथ सुपरस्टार विजय थलापती विरोधात फतवा; बरेलीतील मौलाना म्हणाले- चित्रपटात मुस्लिमांना राक्षस दाखवले, विश्वास ठेवू नका

    तमिळ चित्रपट अभिनेते विजय थलापथी यांच्याविरुद्ध फतवा जारी करण्यात आला आहे. ऑल इंडिया मुस्लिम जमातचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि दारूल इफ्ताचे प्रमुख मुफ्ती मौलाना शहाबुद्दीन रझवी बरेलवी यांनी बुधवारी हा फतवा जारी केला.

    Read more

    Robert Vadra : रॉबर्ट वाड्रांची आज पुन्हा चौकशी; बँक खाती, दस्तऐवजांच्या फॉरेन्सिक चौकशीची तयारी

    हरियाणाच्या शिकोहपूर येथील ३.५ एकर जमीन व्यवहार प्रकरणात काँग्रेस नेते प्रियंका गांधी-वाड्रा यांचे पती व उद्योजक रॉबर्ट वाड्रा यांची बुधवारी ईडीकडून पाच तास चौकशी करण्यात आली. ईडीने त्यांना गुरुवारीही बोलावले आहे.

    Read more

    कृत्रिम बुद्धिमत्तेची “कमाल”, नाशकात बाळासाहेब गरजले; पण उद्धवचे स्क्रिप्ट “वाचून” भाजपला धुवावे लागले!!

    कृत्रिम बुद्धिमत्तेची कमाल, नाशकात बाळासाहेब गरजले; उद्धवचे स्क्रिप्ट वाचून भाजपला धुवावे लागले!! उद्धव ठाकरेंनी आयोजित केलेल्या नाशिक मधल्या निर्धार मेळाव्यात हे घडले.

    Read more

    Kiren Rijuju : ‘बंगालच्या मुख्यमंत्री वक्फच्या नावाखाली हिंसाचार भडकावत आहेत – किरेन रिजिजू

    केंद्रीय संसदीय कामकाज आणि अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू म्हणाले की, वक्फ कायदा दुरुस्तीचा उद्देश मुस्लिम समुदायाला लक्ष्य करणे नाही तर भूतकाळातील चुका सुधारणे आहे.

    Read more

    Assam : तमिळ-मराठी वादाच्या पार्श्वभूमीवर आसाममध्ये आसामी भाषा सक्तीची

    आसाममध्ये, बराक खोऱ्यातील तीन जिल्हे आणि बोडोलँड टेरिटोरियल रीजन (BTR) चे पाच जिल्हे वगळता राज्यातील सर्व अधिकृत कामांमध्ये आसामी भाषेचा वापर अनिवार्य असेल.

    Read more

    Waqf Act : ‘पाकिस्तानने स्वतःच्या खराब रेकॉर्डकडे लक्ष द्यावे’, वक्फ कायद्याविरोधात बोलणाऱ्याला भारताने फटकारले!

    संसदेत नुकत्याच मंजूर झालेल्या वक्फ दुरुस्ती विधेयकावर पाकिस्तानने केलेल्या टिप्पण्या प्रेरित आणि निराधार असल्याचे सांगत भारत सरकारने मंगळवारी त्या फेटाळून लावल्या. पाकिस्तानने इतरांना उपदेश करण्याऐवजी अल्पसंख्याकांच्या हक्कांचे रक्षण करण्याच्या बाबतीत स्वतःच्या ‘खराब’ रेकॉर्डकडे लक्ष द्यावे असे ते म्हणाले.

    Read more

    Devendra Fadanvis : विदर्भातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना 832 कोटींचे सानुग्रह अनुदान निधीचे वाटप!!

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज अमरावती येथे ‘विदर्भातील प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांना ₹832 कोटी सानुग्रह अनुदान निधीचे वाटप करण्यात आले. 2006 ते 2013 या कालावधीत सिंचन प्रकल्पाकरिता सरळ खरेदीने संपादित जमिनीसाठी लाभार्थी शेतकऱ्यांना प्रति हेक्टर ₹5 लाख सानुग्रह अनुदानाचे प्रातिनिधीक स्वरुपात धनादेश वाटप करण्यात आले.

    Read more

    ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेना मेळाव्याची “दमदार” कामगिरी!!

    ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेनेची “दमदार” कामगिरी!!, अशा शब्दांमध्येच शिवसेनेच्या नाशिक मधल्या आजच्या मेळाव्याचे वर्णन करावे लागेल.

    Read more

    Navneet Rana : ज्यांना वक्फ कायदा पाळायचा नाही त्यांनी पाकिस्तानात जावे – नवनीत राणा

    पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमध्ये वक्फ कायद्याच्या निषेधार्थ झालेल्या हिंसाचाराच्या विरोधात देशभरात संताप आहे. बंगालमध्ये हिंदूंवरील हिंसाचारावरून भाजप नेत्या नवनीत राणा यांनी ममता बॅनर्जी यांना आव्हान दिले आहे.

    Read more

    Retail inflation : किरकोळ महागाई 5 वर्ष 7 महिन्यांच्या नीचांकावर; मार्चमध्ये घटून 3.34% वर, खाद्यपदार्थांच्या किमती घटल्याचा परिणाम

    मार्चमध्ये किरकोळ महागाई दर जवळपास ५ वर्षे ७ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आला आहे. मार्चमध्ये तो ३.३४% होता. ऑगस्ट २०१९ मध्ये महागाई दर ३.२८% होता.

    Read more

    CM Yogi : सीएम योगी म्हणाले- वक्फच्या जमिनीवर घरे बांधू; ज्याला बांगलादेश आवडतो त्याने निघून जावे!

    वक्फ कायद्याच्या निषेधार्थ बंगालमध्ये होत असलेल्या हिंसाचारावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी हरदोई येथे म्हणाले- लातो के भूत बातो से नही मानते. दंगलखोर फक्त लाठ्यांचेच ऐकतील. ज्याला बांगलादेश आवडतो, त्याने बांगलादेशला जावे.

    Read more

    Rajasthan : राजस्थानमध्ये बसून अमेरिकन लोकांना फसवल्याप्रकरणी १३ जणांना अटक

    राजस्थानमधील झुंझुनू येथून अमेरिकन नागरिकांना फसवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करून पोलिसांनी १३ तरुण-तरुणींना अटक केली आहे. मायक्रोसॉफ्टशी संबंधित कोणत्याही समस्या सोडवण्यासाठी आरोपींनी इंटरनेट मीडियावर हेल्पलाइन नंबर पोस्ट केले होते.

    Read more

    Waqf law : भारताने वक्फ कायद्यावरील पाकिस्तानचे वक्तव्य फेटाळले; इतरांना उपदेश करण्याऐवजी स्वतःचे रेकॉर्ड पाहा!

    वक्फ कायद्याबाबत पाकिस्तानने केलेले विधान भारताने पूर्णपणे फेटाळून लावले आहे. भारताने म्हटले आहे की, इतरांना उपदेश करण्याऐवजी पाकिस्तानने अल्पसंख्याकांवरील अत्याचारांच्या स्वतःच्या रेकॉर्डकडे लक्ष द्यावे.

    Read more

    Hemant Soren : मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी स्वीकारली झारखंड मुक्ती मोर्चाची कमान

    झारखंडच्या राजकारणात मोठा बदल झाला आहे. झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम) ने आता पक्षाची कमान राज्याचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्याकडे सोपवली आहे. पक्षाच्या १३ व्या महाअधिवेशनात त्यांची झामुमोचे नवे अध्यक्ष म्हणून निवड झाली. त्याच वेळी, पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि झामुमोचे मजबूत चेहरा शिबू सोरेन यांना आता ‘संस्थापक संरक्षक’ म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

    Read more

    NCW अध्यक्षा विजयाताई रहाटकर उद्यापासून हिंसाचारग्रस्त बंगाल दौऱ्यावर; मुर्शिदाबाद, मालद्यात जाऊन देणार पीडित कुटुंबीयांना आधार!!

    waqf सुधारणा कायद्याला विरोध करण्याच्या नावाखाली पश्चिम बंगालमधल्या मुर्शिदाबाद, मालदा आणि जंगीपूर मध्ये प्रचंड हिंसाचार घडवून तिथल्या हिंदूंना कायमचे पलायन करायला लावण्याच्या निंदनीय घटनेची दखल राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजयाताई रहाटकर यांनी घेतली

    Read more

    Trump : ट्रम्प म्हणाले- आम्ही अतिरेक्यांना अण्वस्त्रे बाळगू देणार नाही; इराणवर अणु कराराला विलंब लावल्याचा आरोप

    अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे की, इराणने असा विचार करणे थांबवावे की त्यांच्याकडे अण्वस्त्रे असू शकतात. हे अतिरेकी लोक आहेत आणि त्यांना अण्वस्त्रे बाळगण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही.

    Read more

    मुर्शिदाबाद मधून हिंदू कुटुंबांचे झारखंडच्या पाकूर मध्ये कायमचे स्थलांतर; ममतांचा बंगाल पोहोचला काश्मीरच्या वळणावर!!

    Waqf सुधारणा कायद्याच्या विरोधात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आक्रस्ताळी भूमिका घेतल्यानंतर त्या राज्यातल्या कट्टरपंथी मुस्लिमांना चेव आला आणि त्यांनी मुर्शिदाबाद, जंगीपूर, मालदा या जिल्ह्यांमध्ये दंगली घडविल्या, पण या दंगलीच्या निमित्ताने तिथून त्यांनी हिंदू समाजाला कायमचे पलायन करायला भाग पाडले. याच्या बातम्या मात्र मराठी माध्यमांमध्ये फारशा आल्या नाहीत.

    Read more

    Tamil Nadu : अयोध्येतील राम मंदिर बॉम्बने उडवण्याची धमकी; तामिळनाडूहून आला ई-मेल, शोध मोहीम सुरू

    अयोध्येतील राम मंदिरावर बॉम्ब हल्ला करण्याची धमकी देण्यात आली आहे. १४ एप्रिल (सोमवार) रात्री राम जन्मभूमी ट्रस्टकडून एक ई-मेल आला. त्यात लिहिले आहे- मंदिराची सुरक्षा वाढवा. ट्रस्टचे अकाउंट ऑफिसर महेश कुमार यांनी मंगळवारी सायबर सेलमध्ये या संदर्भात तक्रार दाखल केली आहे.

    Read more

    Sudhanshu Trivedi : नरेंद्र मोदींचे सरकार सत्तेत येण्यापूर्वीच नॅशनल हेराल्ड प्रकरण दाखल झाले होते – सुधांशू त्रिवेदी

    नॅशनल हेराल्ड प्रकरणात, अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, राज्यसभा खासदार सोनिया गांधी आणि सॅम पित्रोदा यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. भाजपचे राज्यसभा खासदार सुधांशू त्रिवेदी यांनी याप्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, काँग्रेसने हे लक्षात ठेवावे की जेव्हा नरेंद्र मोदी सरकार केंद्रात सत्तेत आले नव्हते तेव्हा हा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

    Read more

    रॉबर्ट वाड्रा काल ED ऑफिसमध्ये पायी चालत, आज प्रियांका बरोबर गाडीत, गाडीतून उतरल्यावर मिठी, मग चौकशीसाठी दाखल!!

    हरियाणातल्या गुरुग्राम मधली जमीन हडपण्याच्या प्रकरणात सक्तवसुली संचलनालय अर्थात ED ने सोनिया गांधींचे जावई, प्रियांका गांधींचे पती रॉबर्ट वाड्रा यांना चौकशी आणि तपासाचे समन्स पाठवल्यानंतर ते काल घरातून पायी चालत येऊन ED ऑफिसमध्ये दाखल झाले.

    Read more

    National herald case : सोनिया + राहुल वरील खटल्याचा इंदिरा स्टाईल राजकीय वापर करायचा काँग्रेसचा इरादा, पण…

    National herald case मध्ये ED ने काँग्रेस संसदीय पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा आणि सुमन दुबे यांच्या विरोधात राऊज नवीन कोर्टात खटला दाखल केल्यानंतर काँग्रेसने आज देशभरात निदर्शने आयोजित केली.

    Read more

    Artificial Intelligence : मुंबई, पुणे अन् नागपूर येथे कृत्रिम बुद्धिमत्ता केंद्र उभारणार!

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालय, मुंबई येथे महाराष्ट्र शासन आणि आयबीएम टेक्नॉलॉजी (इंडिया) यांच्यामध्ये AI द्वारे प्रशासनिक परिवर्तनासाठी सामंजस्य करार करण्यात आला. या कराराचा उद्देश कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), हायब्रिड क्लाऊड, डेटा अ‍ॅनालिटिक्स, सायबर सुरक्षा आणि ऑटोमेशनसारख्या आधुनिक तंत्रज्ञानांचा उपयोग करून सार्वजनिक सेवा वितरण आणि प्रशासकीय कार्यक्षमतेत वाढ करणे आहे. या करारानुसार, राज्यात 3 कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) केंद्रे उभारण्यात येणार आहेत.

    Read more

    नाशिक मध्ये अनधिकृत दर्ग्यांवर आजच कारवाई हा शिवसेनेच्या शिबिरात अडथळा; संजय राऊतांचे अजब तर्कट!!

    नाशिक मधल्या काठे गल्ली परिसरातील सातपीर नावाच्या अनधिकृत दर्ग्यावर पोलिसांनी कठोर कायदेशीर कारवाई करून तो दर्गा काढून टाकला.

    Read more