• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 256 of 1505

    Pravin Wankhade

    FATF Report : FATFचा अहवाल : पुलवामा हल्ल्यासाठी अमेझॉनवरून स्फोटकांची खरेदी; अतिरेक्याला PayPal द्वारे पैसे

    २०१९ च्या पुलवामा दहशतवादी हल्ल्यात वापरलेले स्फोटक साहित्य ई-कॉमर्स वेबसाइट अमेझॉनवरून खरेदी करण्यात आले होते. जगभरातील दहशतवादी निधीवर लक्ष ठेवणारी संस्था फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स (FATF) ने त्यांच्या अहवालात हे उघड केले आहे.

    Read more

    CJI Gavai : संविधान रक्तहीन क्रांती निर्माण करण्याचे साधन; CJI गवई यांचे विधिमंडळ सत्कार सोहळ्यात भाषण

    भारतीय संविधान हे रक्तहीन क्रांती निर्माण करण्याचे साधन असल्याचे मत भारताचे सरन्यायाधीश भूषण रामकृष्ण गवई यांनी मंगळवारी विधिमंडळात बोलताना व्यक्त केले. हे विधान करताना त्यांनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा दाखला दिला. भारताची राज्यघटना ही देशात एक रक्तहीन क्रांती निर्माण करण्याचे साधन आहे असे बाबासाहेब म्हणायचे. निश्चितच आपण मागील 75 वर्षांच्या कालखंडात याच दृष्टिकोनातून काम केले आहे, असे ते म्हणाले.

    Read more

    धर्मांतर केल्यानंतरही आरक्षणाचा लाभ घेणाऱ्यांविरोधात व्यापक लढा; धर्मांतर बंदी कायद्यासाठी पुण्यात सकल हिंदू समाजाचा मोर्चा

    धर्मांतर केलेल्या हिंदुंना आरक्षणाचा लाभ घेता येत नाही. यासंबंधी न्यायालयानेच निकाल दिला असून, आपल्या भागातील अशा धर्मांतरितांना शोधून त्यांच्या नोकऱ्या काढून घ्या

    Read more

    Maharashtra : विरोधी पक्षनेता नसणे म्हणजेच लोकशाहीचा गळा घोटणे, विधानसभेत गदारोळ करतविरोधकांचा कामकाजावर बहिष्कार

    महाराष्ट्र विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदाची जागा अद्यापही रिकामीच असल्याने महाविकास आघाडीच्या आमदारांनी जोरदार आक्रमक भूमिका घेतली आहे. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या विधानसभेतील स्वागत सोहळ्याच्या दिवशीच विरोधकांनी लोकशाहीच्या मूल्यांचा आणि परंपरेचा मुद्दा उपस्थित करत सभागृहात गोंधळ घातला. त्यांनी हे प्रकरण केवळ राजकीयच नव्हे तर लोकशाहीच्या प्रतिष्ठेशी निगडित असल्याचा आरोप करत कामकाजावर बहिष्कार टाकला.

    Read more

    Former Russian : रशियाच्या माजी वाहतूक मंत्र्यांची आत्महत्या; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्रिमंडळातून हाकलले होते

    रशियाच्या TASS वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, माजी रशियन वाहतूक मंत्री रोमन स्टारोवोइट यांनी सोमवारी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी त्यांना कोणतेही कारण न देता काही तासांपूर्वीच पदावरून काढून टाकले होते. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप होता.

    Read more

    निशिकांत दुबे यांनी दिली उद्धव ठाकरेंच्या भ्रष्टाचाराची यादी; पण “नॅचरल करप्ट पार्टीच्या” सोबतीची कुणी घ्यायची जबाबदारी??

    निशिकांत दुबे यांनी दिली उद्धव ठाकरेंच्या भ्रष्टाचाराची यादी, पण त्यामुळेच “नॅचरल करप्ट पार्टीच्या” सोबतीची कुणी यायची जबाबदारी??, असा सवाल तयार झाला.भाजपचे बडबोले खासदार निशिकांत दुबे यांनी मराठी लोकांविरुद्ध बोलून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अडचणीत आणले. ठाकरे बंधूंना ठोकता ठोकता निशिकांत दुबे मराठी लोकांवर घसरले. बाहेरच्यांच्या टॅक्स वर मराठी लोक जगतात, असे बोलून बसले. शेवटी देवेंद्र फडणवीस यांना त्या संदर्भात खुलासा करावा लागला. निशिकांत दुबे यांच्या वक्तव्यापासून महाराष्ट्र भाजपला अंतर राखावे लागले. पण जे काही झाले ते “पॉलिटिकली कॅल्क्युलेटेड” झाले असेच बोलले गेले. कारण त्यातून मराठी – अमराठी मतांचे ध्रुवीकरण समोर आले.

    Read more

    Raheel Khan : राहील खानच्या वर्तनाचा मनसेकडून निषेध, पक्षाचा कोणताही संबंध नाही; पोलिस कारवाईची मागणी

    दारूच्या नशेत सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर राजश्री मोरेच्या गाडीला धडक देणे, अपमानास्पद भाषा वापरणे आणि धमकी देणे, अशा गंभीर प्रकारात अडकलेल्या राहील खान या याच्यापासून मनसेने स्पष्टपणे अंतर ठेवले आहे. मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी यासंदर्भात परिपत्रक काढून सांगितले की, राहील हा मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष जावेद शेख यांचा मुलगा असला तरी, त्याच्या वर्तनाशी पक्षाचा कोणताही संबंध नाही. त्याच्या वर्तनाचे समर्थन मनसे करत नसून, पोलिसांनी त्याच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

    Read more

    विरोधी पक्षनेते पदासाठी संख्याबळ तोकडे, म्हणून महाविकास आघाडीचे नेते सरन्यायाधीशांकडे धावले!!

    विधानसभेत विरोधी पक्षनेते पद मिळवण्यासाठी संख्याबळ तोकडे, म्हणून महाविकास आघाडीचे नेते सरन्यायाधीशांकडे धावले!!, असे आज विधिमंडळात घडले.

    Read more

    ठाकरे बंधूंनी गाजवला मराठीचा मुद्दा, पण पवारांच्या हाती लढायला मुद्दाच लागेना!!

    ठाकरे बंधूंनी गाजवला मराठीचा मुद्दा, पण पवारांच्या हाती लढायला मुद्दाच लागेना!!, अशी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था होऊन बसली

    Read more

    Bilawal Bhutto : बिलावल म्हणाले- सईदला भारतात प्रत्यार्पण करण्यास तयार; अतिरेकी हाफिज सईदचा मुलगा संतापला

    हाफिज सईदचा मुलगा तल्हा सईदने पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांच्यावर जागतिक स्तरावर पाकिस्तानचा अपमान केल्याचा आरोप केला. खरं तर, बिलावल यांनी दोन दिवसांपूर्वी म्हटले होते की, जर भारताने या प्रक्रियेत सहकार्य केले तर पाकिस्तान हाफिज सईद आणि मसूद अझहरला भारताच्या स्वाधीन करण्यास तयार आहे.

    Read more

    Vice President : उपराष्ट्रपती म्हणाले- न्यायमूर्ती वर्मा प्रकरणात तत्काळ FIR आवश्यक; एवढी रोख रक्कम कुठून आली हे जाणून घेणे महत्त्वाचे

    उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी सोमवारी न्यायमूर्ती वर्मा यांच्या घरात सापडलेल्या जळालेल्या नोटा प्रकरणी तात्काळ एफआयआर दाखल करण्याची मागणी केली. ते म्हणाले – हे केवळ चिंताजनक नाही, तर ते आपल्या न्यायव्यवस्थेचा पाया हादरवणारे आहे.

    Read more

    Sharad Pawar रायगड मध्ये शरद पवारांची भाषा पुरोगामी, पण त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची फरफट ठाकरे बंधूंच्या पक्षांच्या दारी!!

    रायगड मध्ये शरद पवारांची भाषा पुरोगामी, पण त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची फरफट ठाकरे बंधूंच्या पक्षांच्या दारी!!, अशी अवस्था झाल्याचे समोर आलेय.

    Read more

    BRICS : चीनने म्हटले- ब्रिक्सला संघर्ष नको, व्यापार युद्धामुळे सर्वांनाच नुकसान; अमेरिकेची ब्रिक्स देशांवर 10% अधिक कर लादण्याची धमकी

    अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीनंतर चीनने सोमवारी म्हटले की, ब्रिक्स गटाला कोणत्याही प्रकारचा संघर्ष नको आहे. हे विधान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीनंतर आले आहे.

    Read more

    Vaibhav Taneja : एलन मस्क यांच्या राजकीय पक्षाचे आर्थिक व्यवहार पाहणार भारतीय वंशाचे वैभव तनेजा; सुंदर पिचाईंपेक्षा 12 पट जास्त कमाई

    भारतीय वंशाचे वैभव तनेजा यांना एलन मस्क यांच्या नवीन राजकीय पक्ष ‘अमेरिका पार्टी’चे कोषाध्यक्ष बनवण्यात आले आहे. याचा अर्थ असा की ते आता मस्क यांच्या पक्षाच्या आर्थिक बाबींची जबाबदारी सांभाळतील. वैभव हे टेस्लाचे सीएफओ देखील आहेत. त्यांनी कमाईच्या बाबतीत गुगलचे सीईओ सुंदर पिचाई आणि मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला यांना मागे टाकले आहे.

    Read more

    शी जिनपिंग यांच्या हातातून चीनची सत्ता निसटली, माओ नंतरचा “महान नेता” बनलेल्याची सद्दी संपली!!

    चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हे हयात भर चीनचे सर्वोच्च नेते राहणार होते. चिनी कम्युनिस्ट पार्टीने त्यांचे स्थान कम्युनिस्ट क्रांतीचा सर्वोच्च नेता माओ झेडॉंग यांच्यानंतरचे असल्याचे सुनिश्चित केले होते.

    Read more

    Bhaskar Jadhav : निधीवरून भास्कर जाधव यांचा अजित पवारांवर जोरदार हल्लाबोल; अर्थविभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह

    राज्याच्या अर्थसंकल्पीय व्यवहारांवर आणि निधीच्या वितरणावरून शिवसेना (ठाकरे गट) नेते व आमदार भास्कर जाधव यांनी उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांच्यावर विधानसभेत कडक शब्दांत टीका केली. “कोणाला किती निधी द्यायचा, हे अर्थमंत्री कसे ठरवू शकतात?” असा थेट सवाल करत त्यांनी अर्थविभागाच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

    Read more

    मनसेच्या मोर्चाआधीच मीरा भाईंदरच्या व्यापाऱ्यांची दिलगिरी; मनसेच्या मोर्चाला परवानगी नाकारून विषय मिटवायचा फडणवीसांचा प्रयत्न, पण मनसे मोर्चावर ठाम!!

    मराठी – अमराठी वादात मराठी बोलणार नाही अशी मुजोरी करणाऱ्या व्यापाऱ्याला मनसे कार्यकर्त्यांनी फटकावल्यानंतर व्यापाऱ्यांनी मीरा-भाईंदर मध्ये मोठा मोर्चा काढला.

    Read more

    Pune Youth : पुण्यात तरुणाकडून महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना; भगवे वस्त्र घालून केले कोयत्याने वार, पोलिसांनी घेतले ताब्यात

    पुण्यात रविवारी रात्रीच्या सुमारास सुरज शुक्ला नामक तरुणाने भगवे वस्त्र परिधान करत महात्मा गांधींच्या पुतळ्यावर कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून तणाव निर्माण झाला आहे. सुरज शुक्ला या तरुणाला पोलिसांनी अटक केली असून, घटनेनंतर कॉंग्रेस आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.

    Read more

    Sharad Pawar : शरद पवारांचे आवाहन- प्रागतिक विचारांच्या लोकांनो एकत्र या!; महाराष्ट्राचे समाजकारण योग्य मार्गावर आणण्याची गरज

    राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी महाराष्ट्राचे समाजकारण योग्य मार्गावर आणण्यासाठी प्रागतिक विचारांच्या लोकांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. महाराष्ट्र जोतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे राज्य आहे असे आपण म्हणतो, पण आज ज्यांच्या हाती महाराष्ट्राची सूत्रे आहेत त्यांना फुले, शाहू, आंबेडकरांविषयी किती आस्था आहे याबद्दलची शंका वाटावी असे चित्र आहे, असे ते म्हणालेत.

    Read more

    Tahawwur Rana : 26/11 हल्ल्याच्या वेळी दहशतवादी तहव्वूर राणा मुंबईत होता; NIA चौकशीदरम्यान दिली कबुली

    २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यादरम्यान दहशतवादी तहव्वूर राणा मुंबईत होता. एनआयएने केलेल्या चौकशीत त्याने हे कबूल केले आहे. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, राणाने कबूल केले आहे की, तो पाकिस्तानी सैन्याचा एजंट आहे.

    Read more

    Naresh Mhaske : उद्धव ठाकरेंनी आधी त्यांच्या खासदारांना मराठी शिकवावे; प्रियंका चतुर्वेदी दोन ओळीही बोलू शकत नाहीत; शिंदे गटाच्या नरेश म्हस्केंचा हल्लाबोल

    शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाषण केले आणि त्यांच्या बोलण्यात पराभवाची छाया स्पष्ट दिसत होती. राज ठाकरे यांनी आमच्याबद्दल काहीही म्हटले नाही, म्हणून आम्हीही त्यांच्यावर काही बोलणार नाही, असेही म्हस्के यांनी स्पष्ट केले.

    Read more

    PM Modi : मोदी म्हणाले- महामारीने दाखवून दिले की आजाराला पासपोर्टची गरज नाही; लोकांचे-पृथ्वीचे आरोग्य एकमेकांशी जोडलेले

    : पीएम मोदींनी ब्रिक्स शिखर परिषदेत पर्यावरण, हवामान परिषद (COP-30) आणि जागतिक आरोग्य यासारख्या मुद्द्यांवर भाष्य केले. ते म्हणाले की लोकांचे आणि पृथ्वीचे आरोग्य एकमेकांशी जोडलेले आहे.

    Read more

    India Census : देशात पहिल्यांदाच जनगणना-जात गणना ऑनलाइन होणार; लोक स्वतः डेटा भरू शकतील

    २०२७ मध्ये देशात होणारी १६ वी जनगणना ऑनलाइन होईल. जनगणना निबंधक महासंचालक कार्यालयाच्या म्हणण्यानुसार, जात गणना आणि जनगणना पहिल्यांदाच डिजिटल प्लॅटफॉर्मवरून केली जाईल. यासाठी एक विशेष वेब पोर्टल सुरू केले जाईल. नागरिक यावर स्वतः माहिती भरू शकतील.

    Read more

    Israel : इस्रायलने ट्रम्प यांना नोबेलसाठी नामांकित केले; नेतान्याहूंनी केले समर्थन; पाकिस्ताननेही दिला होता पाठिंबा

    इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकित केले आहे. नेतान्याहू यांनी मंगळवारी व्हाईट हाऊसमध्ये ट्रम्प यांना याबद्दल माहिती दिली.

    Read more

    Owaisi : ओवैसी म्हणाले- भारतीय मुस्लिम नागरिक नव्हे, ओलिस; रिजिजूंचे प्रत्युत्तर- अल्पसंख्याकांना जास्त सुविधा

    केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू आणि एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांच्यात अल्पसंख्याकांबद्दल सोशल मीडियावर वाद सुरू झाला. रिजिजू यांनी एक्स वर लिहिले – भारत हा एकमेव देश आहे जिथे अल्पसंख्याकांना बहुसंख्याकांपेक्षा जास्त सुविधा आणि सुरक्षा मिळते.

    Read more