• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 25 of 1468

    Pravin Wankhade

    Supreme Court : बडे नेते-अधिकारी विशिष्ट समुदायाला लक्ष्य करू शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाने म्हटले – धर्म किंवा जातीच्या आधारे बदनामी करण्याचा अधिकार नाही

    सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, राजकारणी आणि उच्च संवैधानिक पदांवर असलेले अधिकारी धर्म, जात, भाषा किंवा प्रदेशाच्या आधारे कोणत्याही समुदायाला लक्ष्य करू शकत नाहीत. न्यायालयाने असे म्हटले आहे की असे करणे संविधानाच्या विरुद्ध आहे आणि कोणत्याही माध्यमातून समुदायाची बदनामी करणे अस्वीकार्य आहे.

    Read more

    टिपू सुलतानाने 75000 हिंदू आणि 33000 नायर यांची हत्या केल्याचा इतिहास आम्हाला नाही शिकवला; देवेंद्र फडणवीसांची घणाघाती टीका

    टिपू सुलतानने 75000 हिंदू आणि 33000 नायर यांची हत्या केली हा खरा इतिहास गेल्या 70 वर्षांमध्ये आम्हाला कोणी शिकवला नाही पण म्हणून खरा इतिहास बाहेर यायचा राहिला नाही

    Read more

    Odisha : ओडिशात मायनिंग अधिकाऱ्याच्या घरात 4.27 कोटी रोकड सापडली; नोटा मोजण्याची यंत्रे आणावी लागली, 30 हजारांची लाच घेताना पकडले होते

    ओडिशा दक्षता विभागाने बुधवारी कटक सर्कलचे उपसंचालक (खाणी) देबब्रत मोहंती यांच्या घरातून 4.27 कोटी रुपये रोख जप्त केले.

    Read more

    भारताचा जागतिक सन्मान : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा इजरायलच्या स्पीकर ऑफ द नेसेट मेडलने गौरव!!

    आत्तापर्यंत 27 देशांचा सर्वोच्च नागरी सन्मान मिळवणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा इजरायली संसदेने सुद्धा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन गौरव केला.

    Read more

    Amol Mitkari : अजितदादांचा घात डीजीसीएने जाणीवपूर्वक घडवून आणला का? अमोल मिटकरी आक्रमक; अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

    झारखंडच्या छपरामध्ये झालेल्या अपघातानंतर एआयबीने संबंधित कंपनीच्या कार्यालयावर तात्काळ छापा टाकत चौकशी सुरू केली. मग व्हीएसआर (VSR) प्रकरणात तशीच तत्परता का दिसून येत नाही, असा संतप्त सवाल राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे.

    Read more

    शरद पवारांच्या राज्यसभा खासदारकीसाठी दिल्ली आणि मुंबईत करावे लागतेय लॉबिंग आणि FIR दाखल करण्यासाठी बारामतीत वकिलांच्या फौजेसह करावे लागतेय शक्तिप्रदर्शन!!

    शरद पवारांच्या राज्यसभा खासदारकीसाठी दिल्ली आणि मुंबईत करावी लागतेय लॉबिंग आणि अजित पवारांच्या विमान अपघात संदर्भात FIR दाखल करण्यासाठी बारामतीत वकिलांच्या फौजेसह करावे लागतेय शक्तिप्रदर्शन!!, हे महाराष्ट्रातले राजकीय वास्तव आज समोर आले.

    Read more

    अजितदादांना न्याय देण्याच्या बहाण्याने रोहित पवारांचे बारामतीत शक्तिप्रदर्शन; साथीला अजितदादांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढलेले युगेंद्र पवार!!

    अजितदादांना न्याय मिळवण्याची मागणी बारामतीत रोहित पवारांच्या शक्ती प्रदर्शनात परावर्तित आणि साथीला अजितदादांविरुद्ध विधानसभा निवडणूक लढले युगेंद्र पवार!!, असे राजकीय चित्र समोर आले.

    Read more

    Budget 2026-27 : मुंबई महापालिकेचा 80952 कोटींचा अर्थसंकल्प; विकासासाठी मोडणार 36 हजार कोटींच्या ठेवी

    मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी आज सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी 80952.56 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प स्थायी समितीचे अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांना सादर केला. ज्यात 89.84 कोटी रुपयांची शिल्लक रक्कम दाखवण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या 74427.41 कोटी रुपयांच्या तुलनेत यंदाच्या अर्थसंकल्पात 8.77 टक्क्यांची भरीव वाढ झाली असून, यामध्ये विकासकामांवर विशेष लक्ष केंद्रित करतानाच प्रशासकीय खर्चात कपात करण्याचे धोरण अवलंबण्यात आले आहे. दरम्यान, विकासकामांसाठी निधी उभारण्याच्या उद्देशाने महापालिका आपल्या काही मुदत ठेवी मोडण्याच्या तयारीत असल्याची मोठी माहितीही या अर्थसंकल्पातून समोर आली आहे.

    Read more

    Sunetra Pawar : बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार रिंगणात; पक्षाच्या कोअर कमिटीचे मोठे निर्णय

    बारामती विधानसभा मतदारसंघात लवकरच पोटनिवडणूक होण्याची चिन्हे स्पष्ट झाली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे ही जागा रिक्त झाली. त्यानंतर निवडणूक आयोगाने या मतदारसंघासाठी विशेष संक्षिप्त मतदारयादी पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. 1 जानेवारी 2026 पर्यंत नाव नोंदविलेल्या मतदारांना पोटनिवडणुकीत मतदानाचा अधिकार असेल. 10 मार्च रोजी अंतिम मतदारयादी प्रसिद्ध केली जाणार असून त्यानंतर कोणत्याही क्षणी निवडणुकीची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

    Read more

    Supriya Sule : शरद पवार यांच्या राज्यसभेसाठी सुप्रिया सुळेंची संजय राऊतांशी चर्चा

    जित पवार यांच्या विमान अपघातप्रकरणी सखोल आणि पारदर्शक चौकशी व्हावी, अशी ठाम मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे. रोहित पवार यांनी या प्रकरणात उपस्थित केलेल्या मुद्द्यांमध्ये तथ्य असेल, तर त्याची गांभीर्याने चौकशी झालीच पाहिजे, असे त्या म्हणाल्या. रोहितने अभ्यासपूर्वक पाठपुरावा केला असून त्याचा मला अभिमान वाटतो, असेही त्यांनी स्पष्ट केले. अजित पवारांच्या अपघातामागील सत्य समोर यावे, हीच आमची अपेक्षा आहे. कोणतीही शंका राहू नये म्हणून तपास प्रक्रिया पारदर्शक असणे अत्यावश्यक असल्याचे सुळे यांनी नमूद केले.

    Read more

    ‘Supreme Court : न्यायिक भ्रष्टाचार’ प्रकरण असलेल्या NCERT पुस्तकाच्या विक्रीवर बंदी; CJI म्हणाले होते- न्यायपालिकेला बदनाम करण्याची परवानगी कोणालाही नाही

    सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या आक्षेपानंतर ‘न्यायिक भ्रष्टाचार’ (ज्यूडीशियल करप्शन) या प्रकरणाच्या NCERT पुस्तकाच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. NCERT च्या सूत्रांनी वृत्तसंस्था ANI ला याची पुष्टी केली आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी बुधवारी या मुद्द्यावर नाराजी व्यक्त केली होती.

    Read more

    Rohit Pawar : रोहित पवारांचा पोलिसांसोबत वाद] अजितदादांच्या अपघाताप्रकरणी DGCA, VSR वर गुन्हा दाखल करण्यास नकार, आता बारामतीत FIR दाखल करणार

    अजितदादांच्या विमान अपघातप्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलिसांनी बुधवारी रोहित पवारांचा ‘एफआयआर’ दाखल करून घेतला नाही. कोणाच्या तरी पाठिंब्यामुळेच पोलिस अधिकाऱ्यांची मग्रुरी सुरू आहे. अजितदादा प्रकरणी आमदारांचे असे होत असेल, तर इतरांची काय, असा सवालही रोहित पवार यांनी केला.

    Read more

    Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांचा पुन्हा अल्टिमेटम; जून महिन्यात उपोषणाला बसण्याचा इशारा; जीआर काढला, पण अंमलबजावणी का नाही?

    मराठा आरक्षणाच्या संदर्भात सरकारने लवकरात लवकर कार्यवाही केली नाही, तर जून महिन्यात पुन्हा उपोषणाला बसण्याचा इशारा मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द झाले किंवा त्यांना आरक्षणाचा लाभ मिळाला नाही, तर कोणाच्याही विनंतीकडे लक्ष दिले जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. या संदर्भात संबंधित मंत्र्यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घ्यावे, असेही त्यांनी म्हटले. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारने ठोस निर्णय घेणे आवश्यक असून, नव्या समितीच्या माध्यमातून प्रक्रिया वेगाने पूर्ण होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

    Read more

    Anil Ambani : ईडीने अनिल अंबानींचे 17 मजली घर जप्त केले; किंमत ₹3716 कोटी; 40 हजार कोटींच्या फसवणूक प्रकरणात चौकशी सुरू

    अंमलबजावणी संचालनालयाने (ED) रिलायन्स ग्रुपचे चेअरमन अनिल अंबानी यांचा मुंबईतील ‘एबोड’ हा बंगला जप्त केला आहे. पीटीआय (PTI) नुसार, त्याची किंमत सुमारे 3,716 कोटी रुपये अंदाजित करण्यात आली आहे.

    Read more

    PM Modi : मोदींना इस्रायली संसदेचा सर्वोच्च सन्मान; हमासच्या हल्ल्याची निंदा केली; म्हणाले- तुमचे दुःख समजू शकतो

    पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी दोन दिवसांच्या इस्रायल दौऱ्यासाठी इस्रायलमध्ये पोहोचले. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि त्यांच्या पत्नी सारा नेतन्याहू यांनी विमानतळावर मोदींचे स्वागत केले.

    Read more

    AIADMK : तामिळनाडू विधानसभा निवडणूक, AIADMKच्या जाहीरनाम्याचा तिसरा टप्पा; प्रत्येक कुटुंबाला एकरकमी ₹10 हजारची मदत

    तामिळनाडूच्या ऑल इंडिया अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम (AIADMK) ने मंगळवारी विधानसभा निवडणुकीसाठी जाहीरनाम्याचा तिसरा टप्पा प्रसिद्ध केला. आज AIADMK च्या प्रमुख नेत्या आणि तामिळनाडूच्या 6 वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या जे. जयललिता यांची 78 वी जयंती देखील आहे.

    Read more

    Lok Sabha : लोकसभेने 64 पार्लियामेंट्री फ्रेंडशिप ग्रुप्स तयार केले, प्रत्येक गटामध्ये एक नेता आणि 11 खासदार

    लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मंगळवारी भारत आणि इतर देशांमधील संवाद वाढवण्यासाठी 64 पार्लियामेंट्री फ्रेंडशिप ग्रुप्स (PFG) बनवले आहेत. 18 व्या लोकसभेअंतर्गत स्थापन झालेल्या या गटांमध्ये विविध पक्षांचे लोकसभा आणि राज्यसभा खासदार समाविष्ट आहेत.

    Read more

    Shankaracharya Swami : शंकराचार्यांना अटकेची भीती, उच्च न्यायालयात पोहोचले; युवकाचा दावा- आशुतोष महाराजांनी आमिष दाखवले

    मुलांच्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणात शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी मंगळवारी अलाहाबाद उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन याचिका दाखल केली आहे. प्रयागराज पोलिस त्यांना अटक करू शकतात, अशी त्यांना भीती आहे.

    Read more

    शरद पवार महाविकास आघाडीचे उमेदवार झाले, तर दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण दूरच; पवार कुटुंबाचा फायदा पण अनुयायी तोट्यात!!

    राज्यसभा निवडणुकीसाठी शरद पवार जर महाविकास आघाडीचे एकमेव उमेदवार झाले तर दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण आणखी दूर जाईल. यातल्या राजकारणात पवार कुटुंबाचा फायदा जरूर होईल, पण त्यांचे अनुयायी मात्र तोट्यात जातील.

    Read more

    PM Suicide : नॉर्वेच्या माजी पंतप्रधानांचा आत्महत्येचा प्रयत्न; एपस्टीन फाईलमध्ये नाव आले होते; भ्रष्टाचाराच्या प्रकरणात 10 वर्षांची शिक्षा शक्य

    नॉर्वेचे माजी पंतप्रधान थोरब्योर्न जगलँड यांना कथित आत्महत्येच्या प्रयत्नानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही घटना गेल्या आठवड्यात घडली.

    Read more

    बिनविरोध निवडणुकीची खात्री झाली, तर शरद पवार दाखल करणार अर्ज??; पराभवाच्या भीतीने घेणार निर्णय??

    राज्यसभेच्या बिनविरोध निवडणुकीची खात्री झाली, तरच शरद पवार अर्ज दाखल करणार का आणि पराभवाच्या भीतीने तसा निर्णय घेणार का??, असे दोन सवाल त्यांच्याच समर्थकांनी केलेल्या काही विश्लेषणावरून समोर आले.

    Read more

    AI मुळे जागतिक बाजारपेठेत मोठे बदल; कृत्रिम बुद्धिमत्ता, सेमीकंडक्टर आणि भविष्यसज्ज महाराष्ट्र घडवायचा संकल्प

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘नॅसकॉम टेक्नोलॉजी अँड लीडरशिप फोरम 2026’ या कार्यक्रमास उपस्थिती दर्शविली. मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले, एआयमुळे जागतिक बाजारपेठेत मोठा बदल घडत आहे. आपल्या शासनाने हा बदल सकारात्मक दृष्टीने स्वीकारला असून, महाराष्ट्राला भविष्यसज्ज करण्याचा संकल्प आहे

    Read more

    Amazon : ॲमेझॉनने आशियातील दुसरे सर्वात मोठे कार्यालय उघडले, बंगळुरूत 11 लाख स्क्वेअर फूटमध्ये 12 मजली कॅम्पस

    ई-कॉमर्स कंपनी ॲमेझॉनने २३ फेब्रुवारी रोजी बंगळूरुच्या बाहेरील कट्टिगेनाहल्ली येथे आशियातील आपले दुसरे सर्वात मोठे कार्यालय उघडले आहे. ११ लाख स्क्वेअर फूटमध्ये पसरलेले हे १२ मजली कॅम्पस अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे. कार्यालयात ई-कॉमर्स, ऑपरेशन्स, पेमेंट्स, टेक्नॉलॉजी आणि सेलर सर्व्हिसेस यांसारख्या विभागांचे ७,००० हून अधिक कर्मचारी एकाच वेळी काम करू शकतील.

    Read more

    Supreme Court : सर्वोच्च न्यायालयाचा सवाल- NOTAचा काय फायदा? नेत्यांची गुणवत्ता सुधारली का, एकच उमेदवार असताना हे गरजेचे आहे का?

    सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी NOTA (यापैकी कोणीही नाही) पर्यायाच्या उपयुक्ततेवर आणि परिणामांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. न्यायालयाने मंगळवारी सरकारला विचारले की, याचा काय फायदा आहे, NOTA आल्याने निवडून आलेल्या नेत्यांच्या गुणवत्तेत सुधारणा झाली आहे का?

    Read more

    पंतप्रधान पदाच्या शर्यतीतल्या नेत्याच्या राज्यसभा खासदारकीसाठी दिल्ली आणि मुंबईत लॉबिंग करावे लागतेय, हीच खरी बातमी!!

    एकेकाळी पंतप्रधान पदाच्या शर्यतीत असलेल्या नेत्याच्या राज्यसभा खासदारकीसाठी दिल्ली आणि मुंबईत लॉबिंग करावे लागते आहे, हीच खरी बातमी आहे, असे म्हणायची वेळ सध्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या हालचालींवरून आली आहे.

    Read more