Shashi Tharoor : भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांवर अखेर शशी थरूर यांनी सोडलं मौन, म्हणाले…
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी मंगळवारी (२४ जून २०२५) म्हटले की, ऑपरेशन सिंदूरच्या जागतिक पोहोचाबाबतचा त्यांचा लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पक्षात सामील होण्याचे संकेत नाही. ते म्हणाले की, हा राष्ट्रीय एकता, हित आणि भारतासाठी उभे राहण्याचा संदेश आहे.