Hyderabad हैदराबादमध्ये बॉम्बस्फोटाचा कट उधळला, आयसिसशी संबंधित दोन जणांना अटक
आंध्र प्रदेश आणि तेलंगणा पोलिसांनी संयुक्त कारवाईत हैदराबादमध्ये बॉम्बस्फोटाची योजना आखणाऱ्या दोघांना अटक केली आहे.
आंध्र प्रदेश आणि तेलंगणा पोलिसांनी संयुक्त कारवाईत हैदराबादमध्ये बॉम्बस्फोटाची योजना आखणाऱ्या दोघांना अटक केली आहे.
पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या ज्योती मल्होत्राशी घनिष्ठ संबंध आणि पाकिस्तानातील करतारपूर कॉरिडॉरला झालेल्या दौऱ्यामुळे ओडिशातील यूट्यूबर प्रियांका सेनापती सध्या तपास यंत्रणांच्या रडारवर आली आहे. गुप्तचर विभागाने तिच्या हालचाली आणि संबंधांची चौकशी सुरू केली आहे.
भारतीय सैन्याचे शौर्य आणि पराक्रम पुन्हा एकदा संपूर्ण जगासमोर आले आहे. वेस्टर्न कमांडने जारी केलेल्या ताज्या व्हिडिओमध्ये, भारतीय सैनिक पाकिस्तानकडून होणाऱ्या ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देताना दिसत आहेत. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत, लष्कराने हे सिद्ध केले आहे की भारत केवळ आपल्या सीमांचे रक्षणच करू शकत नाही तर गरज पडल्यास शत्रूंना त्यांच्याच हद्दीत घुसून प्रत्युत्तर देखील देऊ शकतो.
कर्नल सोफिया कुरेशी यांच्याविषयी झालेल्या वादग्रस्त विधानांनंतर मध्य प्रदेश भाजपने आपल्या नेत्यांसाठी सार्वजनिक भाषण कौशल्यावर आधारित प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले आहे. हे शिबिर जून महिन्यात भोपाल येथे होणार असून, नेत्यांनी बोलताना होणाऱ्या चुकांपासून बचाव करावा आणि प्रभावी संवाद साधावा यावर भर दिला जाणार आहे.
“मौत का सौदागर” नंतर पुढची चूक! अनेक वर्षे मार खाऊ नये काँग्रेसची भागेना भूक!!, असे म्हणायची वेळ काँग्रेस पक्षाच्या नव्या टीकेने आणली आहे.
भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर झालेल्या संघर्षादरम्यान पाकिस्तानी हवाई तळ उद्ध्वस्त करण्यासाठी स्वदेशी विकसित ब्रह्मोस क्षेपणास्त्रांचा वापर करण्यात आल्याची पुष्टी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली.
उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या पेन्शनबाबत सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांसाठी ‘एक पद, एक पेन्शन’ देण्याचा आदेश दिला आहे.
व्हॅटिकनमधील सेंट पीटर्स स्क्वेअर येथे नवीन पोप लिओ-१४ यांचा शपथविधी समारंभ संपन्न झाला आहे. यामध्ये सहभागी होण्यासाठी जगभरातील अनेक नेते व्हॅटिकनला पोहोचले आहेत. या कार्यक्रमात हजारो लोक सहभागी झाले आहेत.
पोलिसांच्या हेल्पलाइन नंबरवर मुंबईत मोठ्या बॉम्बस्फोटाच्या धमकीचा फोन आला आणि तेव्हापासून पोलिस हाय अलर्टवर आहेत. मुंबई पोलिसांच्या हेल्पलाइन रूम नंबर ११२ वर हा धमकीचा फोन आला होता आणि फोन करणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इस्रोने रविवारी सकाळी ५.५९ वाजता श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहन (PSLV-C61) द्वारे आपला १०१ वा उपग्रह EOS-09 (पृथ्वी वेधशाळा उपग्रह) प्रक्षेपित केला, परंतु हे प्रक्षेपण यशस्वी झाले नाही.
काँग्रेसचे खासदार गौरव गोगोई हे पाकिस्तान सरकारच्या थेट निमंत्रणावर आयएसआयच्या संपर्कात येऊन तिकडे गेले होते आणि परतल्यावर त्यांनी राफेल लढाऊ विमान खरेदीचा तीव्र विरोध केला, असा गंभीर आरोप आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी केला आहे.
मेक्सिकन नौदलाचे प्रशिक्षण जहाज कुआउतेमोक अमेरिकेतील न्यू यॉर्कमधील ब्रुकलिन ब्रिजवर आदळले. शनिवारी संध्याकाळी जहाज पुलाखालून जात असताना ही घटना घडली.
परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री परराष्ट्र व्यवहारावरील संसदीय स्थायी समितीसमोर ऑपरेशन सिंदूर आणि भारत आणि पाकिस्तानमधील अलिकडच्या तणावाबाबत सविस्तर माहिती देतील.
चीन आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर पॅलेस्टिनी हक्कांचे समर्थन करतो, परंतु प्रत्यक्षात परिस्थिती उलट आहे. तो गाझा आणि पॅलेस्टाईनच्या पश्चिम किनाऱ्यावर ज्यू वसाहतींच्या बांधकामात सक्रिय भूमिका बजावत आहे.
दहशतवादावर पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यासाठी विविध देशांना भेट देणाऱ्या सर्वपक्षीय शिष्टमंडळापासून तृणमूल काँग्रेस (टीएमसी) दूर राहिली आहे. तृणमूल काँग्रेसने केंद्र सरकारला कळवले
अभिनेते आणि राजकारणी मिथुन चक्रवर्ती यांना नुकतीच बीएमसी (बृहन्मुंबई महानगरपालिका) ने कायदेशीर नोटीस बजावली आहे. मिथुन चक्रवर्ती यांनी मालाडमधील एका भूखंडावर बेकायदेशीर बांधकाम केल्याचा आरोप आहेत. जर मालमत्ता मालकाकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही तर बेकायदेशीर बांधकाम पाडले जाईल आणि कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही नोटीसमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. तथापि, मिथुन यांनी हे वृत्त निराधार असल्याचे म्हटले आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत देशसेवेसाठी किंवा कुठल्या आंदोलनात सहभागी झाले होते, म्हणून तुरुंगात गेले नव्हते तर पत्राचाळ प्रकरणात गैरव्यवहार केला, म्हणून तुरुंगात गेले हाेते, असे हल्लाबाेल विधान परिषदेच्या उपसभापती आणि शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या डाॅ. नीलम गाेऱ्हे यांनी राऊत यांच्यावर केला
हरियाणातील लष्कराच्या ‘ऑपरेशन सिंदूर’वर भाष्य करणारे प्राध्यापक अली खान महमूदाबाद यांना सोनीपत पोलिसांनी दिल्लीतील ग्रेटर कैलास येथून अटक केली आहे. अशोका विद्यापीठात शिकवणाऱ्या या प्राध्यापकाने कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांच्यावरही आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. यावर जठेडी गावच्या सरपंचाने राय पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती.
ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे ‘नरेडको विदर्भ – चेंज ऑफ गार्ड कार्यक्रम’ येथे प्रमुख उपस्थिती दर्शवली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले. ते म्हणाले की, पॉझिटिव्ह इंटरव्हेन्शन हा नरेडकोचा सर्वात महत्त्वाचा गुण आहे. नरेडको संस्था विकासक, सरकार आणि ग्राहक अशा सर्वांच्या हिताचे रक्षण करण्याकरिता सातत्याने काम करत आहे, असे सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘नरेडको विदर्भ – चेंज ऑफ गार्ड कार्यक्रम’ येथे पदग्रहण केलेल्या, जेन नेक्स्ट आणि वुमन्स विंग या सर्वांचे अभिनंदन केले.
हा पुरस्कार सोहळा जुलै २०२५ च्या शेवटच्या आठवड्यात नवी दिल्ली येथे आयोजित केला जाईल
operation Sindoor च्या यशस्वी मोहिमे दरम्यान जगभरातल्या देशांमध्ये संदेश देण्यासाठी पाठवण्यात येणाऱ्या खासदारांच्या शिष्टमंडळात नेमका कुणाचा समावेश करायचा
operation sindoor चा मुकाबला करताना पाकिस्तानी लष्कराने किती आणि कोणते विषारी कारस्थान रचले होते आणि ते भारतीय सैन्याने कसे उधळून लावले, यांचे एकापाठोपाठ एक धक्कादायक खुलासे समोर आलेत.
भारतासोबत वाढत्या तणावाबद्दल आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) पाकिस्तानला इशारा दिला आहे. जर परिस्थिती सुधारली नाही तर पाकिस्तानच्या १ अब्ज डॉलर्स (सुमारे ८,५४२ कोटी रुपये) च्या बेलआउट कार्यक्रमाचा पुढील हप्ता थांबवला जाऊ शकतो, असे आयएमएफने म्हटले आहे.
बसपा सुप्रीमो मायावती यांनी पुन्हा एकदा त्यांचा भाचा आकाश आनंदवर मोठी जबाबदारी सोपवली आहे. आकाशला मुख्य राष्ट्रीय समन्वयक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. हे दुसऱ्या क्रमांकाचे स्थान आहे. म्हणजेच मायावतींनंतर आता आकाश पक्षात असेल.
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी रविवारी पश्चिम बंगाल, कर्नाटक, हिमाचल प्रदेश, तेलंगणा, केरळ, झारखंड, पंजाब आणि जम्मू-काश्मीर या आठ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले. ज्यामध्ये त्यांनी राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयात मागितलेल्या संदर्भाला विरोध करण्याचे आवाहन केले आहे.