• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 229 of 1504

    Pravin Wankhade

    PM Modi : गलवान संघर्षानंतर पंतप्रधान मोदी पहिल्यांदाच चीनला भेट देणार; SCOच्या बैठकीला उपस्थित राहतील

    पंतप्रधान मोदी SCO शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी चीनला भेट देणार आहेत. हा दौरा ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी होणार आहे. २०२० मध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या भारत-चीन लष्करी संघर्षानंतर मोदींचा हा पहिला चीन दौरा असेल.

    Read more

    Manoj Jarange : मनोज जरांगे म्हणाले- 29 ऑगस्ट रोजी मुंबईत आझाद मैदानावर आंदोलन करणार; फडणवीसांवर समाजाचा राग

    मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा आंदोलन सुरू केले आहे. ते २९ ऑगस्ट रोजी मुंबईत आझाद मैदानावर आंदोलन करणार आहेत. पूर्वतयारीसाठी बुधवारी सोलापुरात आले होते. दिवसभर मराठा बांधवांच्या भेटीगाठी घेऊन चर्चा केली. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना जरांगे यांनी, ‘एक घर, एक गाडी’ असा नारा दिला. आजही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर समाजाचा राग असून भेदभाव करणारा गृहमंत्री आम्हाला नको.’

    Read more

    Delhi High Court : दिल्ली हायकोर्टाचा सरकारला सवाल- महिला अधिकाऱ्यांना सैन्यात कायमस्वरूपी नोकरी का नाही?

    CDS (कम्बाइंड डिफेन्स सर्व्हिसेस) परीक्षेद्वारे इंडियन मिलिटरी अकादमी (IMA), नेव्हल अकादमी (INA) आणि एअर फोर्स अकादमी (AFA) मध्ये महिलांचा समावेश न करण्याबाबत दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारकडून उत्तर मागितले आहे.

    Read more

    Sarsanghchalak Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- जगाला विविधता स्वीकारणाऱ्या धर्माची गरज; जसे की हिंदू धर्म

    राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) प्रमुख मोहन भागवत यांनी बुधवारी म्हटले की, जगाला अशा धर्माची आवश्यकता आहे जो हिंदू धर्माप्रमाणे विविधतेला स्वीकारतो.नागपूरमधील धर्म जागरण न्यासच्या नवीन कार्यालयाच्या उद्घाटन समारंभात भागवत बोलत होते. ते म्हणाले की, धर्म आपल्याला एकतेची भावना बाळगण्यास आणि विविधतेचा स्वीकार करण्यास शिकवतो. आपण विविध आहोत, पण वेगळे नाही. अंतिम सत्य हे आहे की आपण वेगळे दिसू शकतो, परंतु प्रत्यक्षात आपण एक आहोत.

    Read more

    PM Modi : पंतप्रधान मोदींनी कर्तव्य भवनचे केले उद्घाटन; सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाचा एक भाग

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी दिल्लीतील कर्तव्य पथावरील कर्तव्य भवन-०३ इमारतीचे उद्घाटन केले. ही इमारत २०१९ मध्ये सुरू झालेल्या सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाचा एक भाग आहे आणि कॉमन सेंट्रल सेक्रेटरीएट (CSS) च्या १० इमारतींपैकी पहिली आहे.

    Read more

    Trump : ट्रम्प यांनी भारतावर 25% अतिरिक्त टॅरिफ लादला; आता एकूण 50% टॅरिफ; भारताने म्हटले- ही अन्याय्य कारवाई, आवश्यक पावले उचलू

    अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर २५% अतिरिक्त कर लादण्याची घोषणा केली आहे. त्यांनी बुधवारी यासंबंधीच्या कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली. हा आदेश २१ दिवसांनी म्हणजेच २७ ऑगस्टपासून लागू होईल.

    Read more

    RBI Governor Sanjay Malhotra : भारताची अर्थव्यवस्था जागतिक विकासाचा कणा, ‘डेड इकॉनॉमी’ टिप्पणीवर आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा ट्रम्प यांना चोख प्रतिवाद

    अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेला “डेड इकॉनॉमी” म्हटल्याच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की भारताची अर्थव्यवस्था सध्या जगातील सर्वात वेगाने प्रगती करणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक असून, जागतिक विकासात भारताचे योगदान अमेरिकेपेक्षा अधिक आहे.

    Read more

    Rahul Gandhi राहुल गांधींचा परदेशी अजेंडा? भारताच्या अंतर्गत प्रश्नांमध्ये परदेशी शक्तींना हस्तक्षेप करण्यासाठी चिथावणी

    मोदीविरोधात आंधळे झालेल्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर पुन्हा एकदा भारताच्या अंतर्गत प्रश्नांमध्ये परदेशी शक्तींना हस्तक्षेप करण्यासाठी चिथावणी दिल्याचा आरोप होत आहे.

    Read more

    मोदींच्या जपान आणि चीन दौऱ्यानंतर ट्रम्प भारताच्या विरोधातले टेरिफ युद्ध पुढे रेटू शकतील का??

    भारत रशियाकडून तेल खरेदी‌ करतो म्हणून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50% टेरिफ लादायची हिमाकत केली. चीनवर दादागिरी करता येत नाही म्हणून त्यांनी भारतावर दादागिरी करून पाहिली.

    Read more

    बेस्ट कर्मचारी पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या राजकीय युतीची लिटमस टेस्ट!!

    बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या राजकीय युतीची लिटमस टेस्ट होणार आहे. 20 वर्षानंतर एकत्र आलेल्या ठाकरे बंधूंनी फक्त ऐक्याच्या मेळाव्यात भाषणे केली होती

    Read more

    Satyapal Malik : जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; 4 राज्यांचे राज्यपाल पद भूषवले

    जम्मू – काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे मंगळवारी दिल्लीतील राम मनोहर लोहिया रुग्णालयात दीर्घ आजाराने निधन झाले. दुपारी 1:12 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

    Read more

    चीनवर दादागिरी करता येईना म्हणून ट्रम्प यांची भारतावर दादागिरी; आयात – निर्यातीच्या वस्तूंवर 50 % tariff लादणी!!

    चीनवर करता येईना म्हणून ट्रम्प यांची भारतावर दादागिरी; आयात – निर्यातीच्या वस्तूंवर 50 % tariff लादणी!!, असला प्रकार अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज सायंकाळी केला.

    Read more

    संतशक्तीच्या आशीर्वादाने मुख्यमंत्र्यांचा महाराष्ट्रामध्ये परिवर्तनाचा संकल्प!

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज छत्रपती संभाजीनगर येथे ‘श्री संत सद्‌गुरु योगिराज गंगागिरीजी महाराज 178 वा अखंड हरिनाम सप्ताह’ येथे उपस्थित होते. यावेळी त्यांनी भगवंताच्या नामस्मरणात रमत फुगडीचा आनंद लुटला.

    Read more

    Dummy Bomb : लाल किल्ल्यात मॉक ड्रीलच्या वेळी डमी बॉम्ब पोलिसांना सापडला नाही; 7 जण निलंबित

    दिल्लीच्या लाल किल्ल्याच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांना डमी बॉम्ब सापडला नाही. यानंतर कॉन्स्टेबल आणि हेड कॉन्स्टेबलसह सात पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. ही घटना २ ऑगस्ट रोजी घडली. दिल्ली पोलिसांनी सोमवारी ही माहिती दिली.

    Read more

    Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मृत महिलेच्या खात्यात 10 लाख कोटींची रक्कम; बिहारच्या एका प्लंबरच्या खात्यातही इतके पैसे

    उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये कोटक महिंद्रा बँकेच्या खात्यात १० लाख कोटींहून अधिक रुपये जमा झाल्याची प्रकरणे समोर आली आहेत. नोएडामधील एका मृत महिलेच्या खात्यात १० लाख १ हजार ३५६ लाख कोटींहून अधिक (१००१३५६००००००.०००१००२३५६) रुपये जमा झाल्याचा मेसेज आला. महिलेच्या मुलाने त्याच्या मोबाईलवर मेसेज पाहिल्यावर तो बँकेत पोहोचला.

    Read more

    Modi : ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल मोदींचा सन्मान; राजनाथ यांनी पुष्पहार घातला, हर हर महादेवच्या घोषणा

    मंगळवारी सकाळी १० वाजता दिल्लीतील संसद भवन संकुलात एनडीए खासदारांची बैठक सुरू झाली. बैठकीपूर्वी एनडीए खासदारांनी ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पंतप्रधान मोदींना पुष्पहार घातला.

    Read more

    DRDO : हेरगिरीच्या संशयावरून DRDO गेस्ट हाऊसच्या मॅनेजरला अटक; भारतातील सर्वोच्च संरक्षण तज्ज्ञ, शास्त्रज्ञ येथेच थांबतात

    जैसलमेरमधील संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेच्या (DRDO) गेस्ट हाऊस मॅनेजरला हेरगिरीच्या संशयावरून ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपी महेंद्र प्रसाद हा पोखरण फील्ड फायरिंग रेंजच्या गेस्ट हाऊसमध्ये तैनात आहे.

    Read more

    कुठेही कुठलेही आंदोलन दिसले, की रोहित पवार त्यात घुसलेच!!

    कुठेही कुठलेही आंदोलन दिसले, की रोहित पवार त्यात घुसलेच!!, असे चित्र आज पुन्हा एकदा समोर आले. मुंबईत दादर मधल्या कबूतर खान्यासाठी जैन समाजाने कबूतर खान्यापाशी आंदोलन केले. जैन समाज आणि पोलीस प्रशासन समोरासमोर आले.

    Read more

    Priyanka Gandhi : प्रियांका गांधींची सुप्रीम कोर्टाच्या टिप्पणीवर प्रतिक्रिया, म्हणाल्या- खरा भारतीय कोण, हे जज ठरवणार नाहीत

    काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी मंगळवारी संसदेच्या आवारात सांगितले की, ‘माननीय न्यायाधीशांचा पूर्ण आदर करून मी हे सांगू इच्छिते की- खरे भारतीय कोण, हे ते ठरवू शकत नाहीत.”सरकारला प्रश्न विचारणे हे विरोधी पक्षनेत्याचे कर्तव्य आहे. माझा भाऊ कधीही सैन्याविरुद्ध बोलणार नाही, त्याला त्यांच्याबद्दल आदर आहे. माझ्या भावाच्या शब्दांचा चुकीचा अर्थ लावण्यात आला.’

    Read more

    सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींवर प्रियांका गांधी भडकल्या; खरा – खोटा भारतीय तुम्ही नाही ठरवू शकत, म्हणाल्या; पण आता कोर्टाचा अवमान केल्याबद्दल त्यांच्या विरोधात याचिका!!

    लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी चीनची बाजू उचलून धरून भारतीय सैन्य दलांवर टीका केल्यानंतर सुप्रीम कोर्टाने त्यांचे कान उपटले. सच्चा भारतीय असली वक्तव्ये करणार नाही, अशा शब्दात न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी राहुल गांधींना फटकारले.

    Read more

    Rajya Sabha : CISF कमांडोंवरून राज्यसभेत गदारोळ; खरगे म्हणाले- निषेध करण्याचा अधिकार, नड्डा म्हणाले- ही अलोकतांत्रिक पद्धत

    संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या १२ व्या दिवशीही बिहार मतदार यादी पडताळणीच्या मुद्द्यावर विरोधकांचा निषेध सुरूच आहे. लोकसभा आणि राज्यसभेत गोंधळ सुरू आहे. दोन्ही सभागृहांचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले आहे. बिहार स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन (SIR) वर चर्चा व्हावी अशी मागणी विरोधी पक्षाचे खासदार करत आहेत.

    Read more

    Supreme Court : जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा देण्यासाठी 8 ऑगस्टला सुनावणी; कलम 370 हटवल्यानंतर झाला केंद्रशासित प्रदेश

    जम्मू आणि काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा बहाल करण्याच्या बातम्यांदरम्यान, या प्रकरणाची सुनावणी ८ ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयात होणार आहे. जम्मू आणि काश्मीरचे प्राध्यापक झहूर अहमद भट्ट आणि सामाजिक कार्यकर्ते खुर्शीद अहमद मलिक यांनी ही याचिका दाखल केली आहे. यामध्ये केंद्र सरकारला निर्धारित वेळेत जम्मू आणि काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा बहाल करण्याचे निर्देश देण्याचे म्हटले आहे.

    Read more

    मराठीचे स्वाभिमानी दिल्लीश्वरांसमोर झुकले; मुंबईचे सगळे प्रश्न मिटल्यामुळे कबुतरांवरून आंदोलन पेटले!!

    मराठीचे स्वाभिमानी दिल्लीश्वरांसमोर झुकले; मुंबईचे सगळे प्रश्न मिटल्यामुळे कबुतरांवरून आंदोलन पेटले!!, हे आजच्या दिवसभरातल्या बातम्यांचे सार ठरले.

    Read more

    Centre Intervenes : महाराष्ट्र-कर्नाटक पाणी वादात अखेर केंद्राचा हस्तक्षेप; अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा फेरविचार होणार, CM फडणवीसांनी दिले होते पत्र

    कर्नाटकातील अलमट्टी धरण आणि हिप्परगी बॅरेजच्या बांधकामात आणि प्रस्तावित उंची वाढीतील कथित अनियमिततेची केंद्राने अधिकृत चौकशी सुरू केली आहे. या संदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने कर्नाटकच्या एकतर्फी कृतींमुळे संभाव्य पूर धोका आणि पाणी व्यवस्थापन आव्हाने अधोरेखित केले होते. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्र दिले होते. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

    Read more

    CM Fadnavis : माधुरी हत्तिणीला परत आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा पुढाकार; राज्य शासन सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार

    कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळा येथील नांदणी मठातील माधुरी हत्तीण पुन्हा नांदणीत यावी, अशी जन भावना आहे. ही जनभावना लक्षात घेऊन नांदणी मठाने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी. राज्य शासनही स्वतंत्र पुनर्विचार याचिका दाखल करून सर्वोच्च न्यायालयात हत्तीणीला परत देण्यासंदर्भात भूमिका मांडेल, असे सांगून याप्रकरणी राज्य शासन पूर्णपणे मठाच्या पाठीशी असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

    Read more