• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 218 of 1504

    Pravin Wankhade

    Achyut Potdar : ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार यांचे निधन; वयाच्या 91व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, हिंदी चित्रपटांत गाजवल्या भूमिका

    मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार यांचे निधन झाले आहे. ते 91 वर्षांचे होते. ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने मराठी रंगभूमी, हिंदी सिने सृष्टी आणि मालिकांच्या जगतातील एक अत्यंत प्रगल्भ, अनुभवी व लोकप्रिय कलाकार हरपला आहे.

    Read more

    Pak Minister Mohsin Naqvi : पाकिस्तानी मंत्री म्हणाले- भारत चकचकीत मर्सिडीझ, तर पाकिस्तान डंपर ट्रक; दोन्हींची टक्कर झाली तर नुकसान कोणाचे?

    पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसीन नक्वी यांनी १७ ऑगस्ट रोजी लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्याप्रमाणे भारताचे वर्णन चकाकणारी मर्सिडीज असे केले. खरंतर, ११ ऑगस्ट रोजी अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेल्या मुनीर यांनी भारताची तुलना चमकणाऱ्या मर्सिडीजशी आणि पाकिस्तानची तुलना वाळूने भरलेल्या डंपर ट्रकशी केली होती. ते म्हणाले – जर ट्रक कारला धडकला तर नुकसान कोणाचे होईल?

    Read more

    INDI alliance ची रणनीती; लढायला अण्णा आणि निवृत्ती न्यायमूर्ती; पंतप्रधान बनणार मात्र राहुल गांधी!!

    लढायला अण्णा आणि निवृत्त न्यायमूर्ती; पंतप्रधान बनणार मात्र राहुल गांधी!!, असली तिरपागडी आणि पळपुटी राजकीय रणनीती INDI alliance मधल्या नेत्यांनी आज समोर आणली. मतदान चोरीच्या विरोधात अण्णांना लढायला सांगा

    Read more

    INDI आघाडीतल्या नेत्यांना पराभवाची भीती; म्हणून सुप्रीम कोर्टाच्या माजी न्यायमूर्तींच्या गळ्यात घातली उपराष्ट्रपती पदाची उमेदवारी!!

    INDI आघाडीतल्या नेत्यांना पराभवाची भीती म्हणून सुप्रीम कोर्टाच्या माझी न्यायमूर्तींच्या गळ्यात घातली उपराष्ट्रपदाची उमेदवारी!!, असे राजकारण आज दिल्लीत घडले.

    Read more

    Lok Sabha : लोकसभेत अंतराळवीर शुभांशू शुक्लांवर विशेष चर्चा; जितेंद्र सिंह म्हणाले- देश अंतराळ मोहिमेचे यश साजरे करत आहे, विरोधकांची नारेबाजी

    मतचोरीच्या आरोपावरून विरोधकांच्या गदारोळात, भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्या यशस्वी अंतराळ मोहिमेवर लोकसभेत दुपारी २ वाजता चर्चा सुरू झाली. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह म्हणाले की, आज देश शुभांशूंच्या परतीच्या अंतराळ मोहिमेचा आनंद साजरा करत आहे परंतु विरोधी पक्ष अजूनही गोंधळ घालत आहेत आणि चर्चेसाठी तयार नाहीत.

    Read more

    नेहरूंनी आधी देशाचे, मग पाण्याचेही विभाजन केले, NDAच्या बैठकीत पीएम मोदींचा हल्लाबोल

    दिल्लीमध्ये झालेल्या एनडीए (राष्ट्रीय लोकशाही आघाडी) संसदीय दलाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणातून मोठे विधान केले. या बैठकीत NDAच्या उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवार म्हणून सी.पी. राधाकृष्णन यांचा औपचारिक परिचय करून देण्यात आला.

    Read more

    ट्रम्पच्या सल्लागाराची भारताला पुन्हा दमबाजी; तर भारताला खते, दुर्मिळ खनिजे आणि बोअरिंग मशिन्स पुरवायची चीनची तयारी; याचा नेमका अर्थ काय??

    जगातली 6 मोठी युद्धे थांबवल्याच्या बाता मारणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीय सल्लागाराने भारताला अमेरिकेशी करायच्या वर्तणुकीबाबत दमबाजी केली

    Read more

    Tej Pratap Yadav : तेज प्रताप यांचा नवा पक्ष- जनशक्ती जनता दल; 2024 मध्ये स्थापना, चिन्ह बासरी; बिहार निवडणूक लढवणार

    बिहारमध्ये, आरजेडी सुप्रीमो लालू प्रसाद यादव यांचे मोठे पुत्र तेज प्रताप यादव जनशक्ती जनता दलाकडून बिहार विधानसभा निवडणूक लढवतील. तेज प्रताप यांचे जवळचे सहकारी बालेंद्र दास यांनी हा पक्ष स्थापन केला होता आणि २०२४ मध्ये लोकसभा निवडणूक लढवली होती.

    Read more

    Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- संघात पुरुषांइतक्याच महिलाही आहेत, समाज बदलायचा असेल तर निम्मी लोकसंख्या बाजूला ठेवू शकत नाही, महिलांचाही सहभाग आवश्यक

    राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) प्रमुख मोहन भागवत यांनी सोमवारी दिल्लीत एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात सांगितले- मला जयपूरमध्ये विचारण्यात आले की संघात किती महिला आहेत? मी उत्तर दिले- संघात जितके पुरुष आहेत तितक्याच महिला आहेत.

    Read more

    Putin Calls PM Modi : पुतिन यांची PM मोदींशी फोनवरून चर्चा; ट्रम्प भेटीची दिली माहिती, रशियन तेल खरेदीवरून अमेरिकेने भारतावर कर लादला

    रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पंतप्रधान मोदींना फोन करून त्यांच्याशी चर्चा केली. राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी गेल्या आठवड्यात अलास्कामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी झालेल्या भेटीबद्दल त्यांना सांगितले.

    Read more

    Opposition Prepares : मुख्य निवडणूक आयुक्तांविरुद्ध विरोधकांची महाभियोगाची तयारी; भाजपचा पलटवार- एसआयआरवरून विरोधकांचे हल्ले

    बिहारमध्ये ‘मतचोरी’ आणि मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षणाबद्दल (एसआयआर) मुख्य निवडणूक आयुक्त (सीईसी) ज्ञानेश कुमार यांच्या पत्रकार परिषदेनंतर विरोधकांनी हल्ला तीव्र केला. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ‘मतदार हक्क यात्रे’च्या दुसऱ्या दिवशी बिहारमध्ये रस्त्यावर हा मुद्दा उपस्थित केला. त्याच वेळी, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षांनी संसदेत चर्चेची मागणी केली.

    Read more

    Pune Bus Fire : पुण्यात मुंबई-बंगळुरू मार्गावर बसला भीषण आग; 30 वर प्रवासी बचावले; सर्व वेळीच बाहेर पडल्याने अनर्थ टळला

    पुणे शहरात मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर नऱ्हे परिसरात प्रवासी वाहतूक करणाऱ्या एका बसला भीषण आग लागली. या आगीत बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे. बसमधील ३० वर सर्व प्रवासी वेळीच बाहेर पडल्याने मोठी दुर्घटना टळली असून सुदैवाने या घटनेत कुणीही जखमी झाले नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली.

    Read more

    नांदेडसह मराठवाड्यात अतिवृष्टीचा कहर; ५ ठार, हजारो शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान

    महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसाने मराठवाडा, विदर्भ आणि कोकणात हाहाकार माजवला आहे. नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात तब्बल ४२ वर्षांनंतर अशी विक्रमी अतिवृष्टी झाली आहे.

    Read more

    India China : भारत-चीनमध्ये चर्चेची 24वी फेरी; चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांना जयशंकर म्हणाले, मतभेद हे वाद व्हायला नको, मोदींच्या चीन दौऱ्याची तयारी

    सीमाप्रश्न सोडवण्यासाठी भारत आणि चीनमधील चर्चेचा २४ वा टप्पा मंगळवारी होणार आहे. यासाठी चीनचे विशेष प्रतिनिधी परराष्ट्रमंत्री वांग यी नवी दिल्लीत पोहोचले आहेत.

    Read more

    हवामानाचा अंदाज: आजही पावसाचा कहर? मुंबई, पुण्यासह 7 जिल्ह्यांना रेड अलर्ट; गडचिरोलीसह 4 जिल्ह्यांना यलो अलर्ट

    मुंबई, मराठवाड्यासह थेट विदर्भापर्यंत रविवारी रात्रीपासून पावसाने धूमशान घातले. आता आज मंगळवार, 19 ऑगस्ट रोजीही मुंबई पुण्यासह एकूण सात जिल्ह्यांना हवामान विभागाने रेड अलर्ट जाहीर केलाय.

    Read more

    आज एकाच दिवशी पुतिन यांचा मोदींना फोन कॉल; चीनचे परराष्ट्र मंत्री दिल्लीत येऊन भारतीय परराष्ट्र मंत्र्यांना भेटले!!

    ट्रम्प तात्यांची बडबड आणि रशिया – युक्रेन यांच्यातल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर जागतिक घडामोडींना उत आला असताना आज एकाच दिवशी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना स्वतःहून फोन कॉल केला आणि त्याच दिवशी चीनचे परराष्ट्रमंत्री दिल्लीत येऊन भारतीय परराष्ट्र मंत्र्यांना भेटले. या दोन महत्त्वाच्या घटनांचा राजकीय योगायोग राजधानीत घडल्या.

    Read more

    Trump : डोनाल्ड ट्रम्प म्हणाले- युक्रेनला नाटोत घेणार नाही; क्रीमियाही परत मिळणार नाही

    अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे की युक्रेनला लष्करी आघाडी नाटोमध्ये समाविष्ट केले जाणार नाही आणि २०१४ पासून रशियाने व्यापलेला क्रिमिया परत मिळणार नाही.ट्रम्प यांनी सोमवारी सोशल मीडियावर पोस्ट केले की जर झेलेन्स्की इच्छित असतील तर रशियासोबत सुरू असलेले युद्ध त्वरित संपू शकते. झेलेन्स्की लढाई सुरू ठेवू इच्छितात की शांततेचा मार्ग स्वीकारू इच्छितात यावर सर्व काही अवलंबून आहे.

    Read more

    काँग्रेसने लढविली आयडियेची कल्पना; तामिळनाडूतल्याच द्रविड मुन्नेत्र कळघमच्या नेत्याच्या हाती बांधला पराभवाचा गंडा!!

    जगदीप धनखड यांच्या बरोबर “राजकारण” खेळून त्यांना उपराष्ट्रपती पदावरून घालविण्याचा “पराक्रम” करणाऱ्या काँग्रेसने आता पुढचा “डाव” टाकला असून ओढवून घेतलेल्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत आपल्या पक्षातून उमेदवार देण्यापेक्षा द्रविड मुन्नेत्र कळघमच्या नेत्याला उमेदवार बनवून त्याच्या हाती पराभवाचा बांधायचा घाट घातल्याची राजकीय वस्तुस्थिती समोर आली.

    Read more

    Anna Hazare : पुण्यातील ‘अण्णा आता तरी उठा’ फ्लेक्सवर अण्णा हजारेंची नाराजी; म्हणाले – मीच लढत राहावे ही अपेक्षा चुकीची

    काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या मतांच्या चोरीच्या आरोपांनंतर राजकीय वातावरण तापले आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्यात सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांना लक्ष्य करणारे काही फ्लेक्स लावण्यात आले होते. या फ्लेक्सवरून अण्णा हजारे यांनी नाराजी व्यक्त केली असून देशातील तरुणाईला देखील चांगलेच खडसावले. मी दहा कायदे आणले आहेत, पण 90 वर्षांनंतरही मीच सगळे करत राहावे आणि तुम्ही झोपून राहावे ही अपेक्षा चुकीची आहे, असे अण्णा हजारे म्हणाले.

    Read more

    Sanjay Shirsat : मंत्री संजय शिरसाट पुन्हा वादात; तब्बल 5 हजार कोटींची जमीन बिवलकर कुटुंबाला दिल्याचा रोहित पवारांचा आरोप

    महाराष्ट्रातील मंत्री संजय शिरसाट पुन्हा एकदा मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत शिरसाटांवर गंभीर आरोप केले. त्यांच्या मते, सिडकोचे अध्यक्षपद मिळताच संजय शिरसाट यांनी नियम धाब्यावर बसवून बिवलकर कुटुंबाला तब्बल ५ हजार कोटींची किंमत असलेली १५ एकर जमीन दिली.

    Read more

    ECI : निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग आणू शकतात विरोधक; लोकसभेत ‘वोट चोर-गद्दी छोड’च्या घोषणा

    मतदार पडताळणी आणि मत चोरीच्या आरोपांवरून विरोधी पक्ष संसदेत मुख्य निवडणूक आयुक्तांविरुद्ध महाभियोग प्रस्ताव आणू शकतात. काँग्रेसचे राज्यसभा खासदार सय्यद नसीर हुसेन यांनीही वृत्तसंस्थेला सांगितले की, गरज पडल्यास महाभियोग प्रस्तावासह सर्व लोकशाही पद्धती वापरण्यास पक्ष तयार आहे. तथापि, अद्याप कोणतीही औपचारिक चर्चा झालेली नाही.

    Read more

    Trump : ट्रम्प यांनी नोबेल पुरस्कारासाठी नॉर्वेला फोन केला; टॅरिफबद्दलही बोलले; भारत-पाकसह 6 युद्धे थांबवल्याचा दावा केला

    अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नॉर्वेचे अर्थमंत्री जेन्स स्टोल्टनबर्ग यांना फोन करून नोबेल पुरस्काराची मागणी केली आहे. नॉर्वेजियन वृत्तपत्र डेगेन्स नेरिंगस्लिव्हनुसार, ट्रम्प यांनी गेल्या महिन्यात स्टोल्टनबर्ग यांच्याशी नोबेल आणि टॅरिफबद्दल चर्चा केली.

    Read more

    Congress : काँग्रेस नेत्याने RSSला भारतीय तालिबान म्हटले; भाजपचा पलटवार- काँग्रेसला PFI-सिमी संघटना आवडतात

    काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बीके हरिप्रसाद यांनी आरएसएसला तालिबान म्हटले आहे, या विधानावर भाजपने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. भाजपने म्हटले आहे की काँग्रेस प्रत्येक राष्ट्रवादी संघटनेचा गैरवापर करते आणि पीएफआय आणि सिमी सारख्या बंदी घातलेल्या कट्टरपंथी संघटनांवर प्रेम करते.

    Read more

    जगदीप धनखड यांना घालवून बसले; आता मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश्वर कुमारांच्या मागे लागले, पण हाती काय लागण्याची चिन्हे??

    जगदीप धनखड यांना घालवून बसले; आता मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश्वर कुमार यांच्या मागे लागले, पण हाती काय लागण्याची चिन्हे??, असा सवाल विचारण्याची वेळ राहुल गांधींच्या नादी लागलेल्या विरोधकांच्या राजकीय वर्तणुकीतून समोर आली.

    Read more

    Rahul Gandhi : बिहारमध्ये ‘वोटर अधिकार यात्रा’, लालू-राहुल म्हणाले- ही संविधान वाचवण्याची लढाई; तेजस्वी निवडणूक आयोगाला कठपुतली म्हणाले

    बिहारमध्ये विशेष सघन सुधारणा (SIR, सामान्य शब्दात मतदार यादी सुधारणा) विरुद्ध राहुल गांधी यांची ‘वोटर अधिकार यात्रा’ सासाराम येथून सुरू झाली. येथील सुआरा विमानतळ मैदानावर झालेल्या जाहीर सभेत राहुल म्हणाले, ‘ही संविधान वाचवण्याची लढाई आहे. भाजप-आरएसएस संपूर्ण देशात संविधान नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत.’

    Read more