• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 217 of 1504

    Pravin Wankhade

    India China : भारत-चीन सीमा वाद सोडवण्यासाठी तज्ज्ञ समिती स्थापन करणार; चीन रेअर अर्थ मेटल देण्यास तयार

    भारत आणि चीनने सीमावाद सोडवण्यासाठी एक तज्ञ समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. ही समिती शक्य तितक्या लवकर सीमांकनावर तोडगा काढेल.चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी मंगळवारी दिल्लीत पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची भेट घेतली, त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.

    Read more

    Thackeray brothers : एकत्र आलेल्या ठाकरे बंधूंना ‘बॅलेट पेपर’वरही भाेपळा, बेस्ट साेसायटीत दारुण पराभव

    मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट- मनसे युतीची लिटमस टेस्ट मानल्या जात असलेल्या बेस्ट एम्प्लॉइज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीत दाेन्ही ठाकरे बंधूंना माेठा धक्का बसला आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या ‘उत्कर्ष’ पॅनलचा दारुण पराभव झाला. 21 पैकी एकही जागा मिळवता आलेली नाही. दुसरीकडे, शशांक राव यांच्या पॅनलने 14 जागा जिंकत एकहाती यश संपादन केले. महायुतीच्या पॅनलला 7 जागांवर समाधान मानावे लागले.

    Read more

    बेस्ट पतपेढीची निवडणूक जिंकल्यानंतर शशांक राव + प्रसाद लाड यांना नेमले भाजपने स्टार प्रचारक; मुंबईत आशिष शेलारांनी तयार केले political buffer!!

    मुंबईमध्ये बेस्ट कामगारांच्या पतपेढीची निवडणूक जिंकल्यानंतर महापालिका निवडणूक जिंकण्यासाठी मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी बेस्टची निवडणूक जिंकणारे शशांक राव यांना आणि ज्यांच्या पॅनलला त्यांनी पराभूत केले

    Read more

    Balasaheb Thorat : देशाच्या निवडणूक आयुक्तांनी स्वतःचा पक्ष काढावा; बाळासाहेब थोरात यांचा निवडणूक आयोगाला टोला

    काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना स्वतःचा राजकीय पक्ष काढण्याचा सल्ला दिला आहे. देशाचे निवडणूक आयुक्त एखाद्या राजकीय पक्षाच्या नेत्यासारखे बोलत आहेत. त्यांची बोलण्याची पद्धत पाहता ते जनतेसाठी काम करतात असे वाटत नाही. त्यामुळे त्यांनी स्वतःचा राजकीय पक्ष काढावा, असे ते म्हणालेत. दरम्यान, मी गांधी नाही, पण विचारांसाठी बलिदान स्वीकारण्याची माझी तयारी आहे, असेही ते यावेळी कीर्तनकारक संग्राम भंडारे यांनी दिलेल्या धमकीवर भाष्य करताना म्हणाले.

    Read more

    तुरुंगात जाऊनही खुर्चीला चिकटून राहणाऱ्यांची उचलबांगडी; मोदी सरकारने विधेयक मांडताच लोकसभेत कागदांची फाडाफाडी!!

    भ्रष्टाचार किंवा फौजदारी स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये अटक झाल्यानंतर 30 दिवसांपेक्षा जास्त तुरुंगात राहणाऱ्या मंत्र्यांची त्यांच्या खुर्च्यांवरून उचलबांगडी करायचे विधेयक मोदी सरकारने आज लोकसभेत मांडले

    Read more

    ISRO : इस्रो प्रमुख म्हणाले- भारत 40 मजली उंच रॉकेट बनवतोय; 75,000 किलो वजन वाहून नेण्याची क्षमता असेल

    इस्रो जगातील सर्वात मोठ्या रॉकेटपैकी एक बनवण्याची तयारी करत आहे. मंगळवारी हैदराबादमधील उस्मानिया विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात इस्रो प्रमुख व्ही. नारायणन यांनी सांगितले की, अंतराळ संस्था ४० मजली इमारतीइतके उंच रॉकेट बनवत आहे. हे रॉकेट ७५,००० किलो म्हणजेच ७५ टन वजन पृथ्वीच्या खालच्या कक्षेत वाहून नेण्यास सक्षम असेल.

    Read more

    Supreme Court : सुप्रीम कोर्टाने म्हटले- राष्ट्रपतींनी न्यायालयाचा सल्ला घेणे चुकीचे नाही; आम्ही निर्णय नाही, तर मत बदलू शकतो

    मंगळवारी, सर्वोच्च न्यायालयात राष्ट्रपती आणि राज्यपालांना विधेयकांवर स्वाक्षरी करण्यासाठी अंतिम मुदत देण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी झाली. यादरम्यान, न्यायालयाने म्हटले की, ‘राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कलम १४३ अंतर्गत न्यायालयाचे मत मागणे चुकीचे नाही.’

    Read more

    Hamas : गाझामध्ये युद्धबंदीवर हमास सहमत; इस्रायली कैद्यांपैकी निम्मे कैदी सोडले जातील; नेतन्याहू म्हणाले होते- सर्वांना सोडले तरच करार होईल

    अमेरिका, इजिप्त आणि कतार यांच्या मध्यस्थीनंतर जूनमध्ये अमेरिकेचे राजदूत स्टीव्ह विटकॉफ यांनी सादर केलेला प्रस्ताव, हमासने गाझामध्ये युद्धबंदी आणि इस्रायली बंधकांच्या सुटकेसाठी सहमती दर्शविली आहे.

    Read more

    0 + 0 = 0; पण आयातवीरांची बेरीजही अपूर्ण; हेच बेस्ट निवडणुकीच्या निकालाचे खरे चित्र!!

    0 + 0 = 0; पण आयातवीरांची बेरीजही अपूर्ण; हेच बेस्ट निवडणुकीच्या निकालाचे खरे चित्र!!, असे म्हणायची वेळ ठाकरे बंधूंच्या पराभवाने आणि त्या पाठोपाठ भाजपच्या आयातवीर नेत्यांनी केलेल्या जल्लोषामुळे आली आहे.

    Read more

    PM Modi : पंतप्रधान मोदींनी अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांची मुलाखत घेतली; म्हणाले- देशाला आता 40-50 अंतराळवीर तयार करावे लागतील

    सोमवारी संध्याकाळी लखनौचे अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधान मोदींनी शुभांशूशी हस्तांदोलन केले आणि त्यांना मिठी मारली. त्यांनी त्यांच्या पाठीवर थाप देऊन त्यांचे कौतुकही केले. यादरम्यान पंतप्रधान मोदींनी शुभांशूंची सुमारे ८ मिनिटे मुलाखत घेतली.

    Read more

    माळेगाव ते बेस्ट; पवार + ठाकरे ब्रँडचे स्वहस्ते विसर्जन!!

    माळेगाव सहकारी साखर कारखाना ते बेस्ट पतपेढी निवडणूक यामध्ये पवार आणि ठाकरे या दोन्ही ब्रँडचे स्वहस्ते विसर्जन झाले, असे जाहीर करायला शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्रित पत्रकार परिषद घ्यायला हरकत नाही!

    Read more

    Indigo : इंडिगो विमानात सहवैमानिकाने जबरदस्तीने शौचालयात प्रवेश केल्याचा प्रवाशाचा आरोप; एअरलाइनने नंतर माफी मागितली

    मुंबईतील एका महिला प्रवाशाने इंडिगो विमानाने तिच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप केला आहे. सेफगोल्ड (गिटल गोल्ड प्लॅटफॉर्म) च्या सह-संस्थापक रिया चॅटर्जी यांनी लिंक्डइन या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले की, ती उड्डाणादरम्यान शौचालयात गेली होती, त्यादरम्यान सह-वैमानिकाने शौचालयाचा दरवाजा उघडला आणि तिच्याकडे पाहू लागला.

    Read more

    B. Sudarshan Reddy : निवृत्त न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी विरोधी पक्षाचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार; NDAचे सीपी राधाकृष्णन यांच्या विरोधात निवडणूक लढवणार

    भारताने मंगळवारी उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश बी. सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी दिली. त्यांचा सामना एनडीएचे उमेदवार सी.पी. राधाकृष्णन यांच्याशी होईल.

    Read more

    Fadnavis : राहुल गांधी ‘सिरियल लायर’ त्यांच्याकडून माफीची अपेक्षाच नाही; देवेंद्र फडणवीस यांची टीका; लोकनीती-CSDSच्या माफीने वातावरण तापले

    महाराष्ट्रातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांतील मतदार संख्येतील फरकाबाबत मोठा वाद निर्माण झाल्यानंतर अखेर लोकनीती-CSDS या नामांकित सर्वेक्षण संस्थेने माघार घेतली आहे. मतदार संख्या तुलना करताना संस्थेकडून गंभीर घोडचूक झाल्याचे स्पष्ट झाले असून, याची कबुली संस्थेचे सह-संचालक संजय कुमार यांनी स्वतः दिली आहे. त्यासाठी त्यांनी माफी देखील मागितली आहे. मात्र, आता राहुल गांधी माफी मागतील का? असा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे.

    Read more

    महाराष्ट्र निवडणुकीत मत चोरी नाही; राहुल गांधींनी ज्या आकडेवारीवरून केले आरोप, तीच चुकीची; लोकनीती-CSDS सह-संचालकांनी मागितली माफी

    सामाजिक आणि राजकीय शास्त्र क्षेत्रात काम करणारे लोकनीती-CSDSचे प्राध्यापक संजय कुमार यांनी महाराष्ट्र निवडणुकीसंदर्भात एक्स वर केलेली पोस्ट डिलीट केली आहे.

    Read more

    मुंबईत मोनो रेल अधांतरी अडकली; 2 तासानंतर काचा फोडून प्रवाशांची सुखरूप सुटका, चेंबूर ते भक्ती पार्क मार्गावरील घटना

    चेंबूर ते भक्ती मार्गादरम्यान एक मोनो रेल आज सायंकाळी 6.15 वाजताच्या सुमारास बंद पडली आणि एका बाजूला झुकली होती.

    Read more

    ऑनलाइन गेमिंग उद्योगावर गदा येण्याची शक्यता, केंद्र सरकारकडून बंदीची तयारी!

    ऑनलाइन गेमिंग उद्योगावर गदा येण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने पैसे लावून खेळल्या जाणाऱ्या ऑनलाइन गेम्सवर बंदी घालण्याचा प्रस्तावित कायदा तयार केला आहे.

    Read more

    CSDS’ Sanjeev Kumar : खाेट्या आकडेवारीमुळे काॅंग्रेसवर ताेंडावर पडण्याची वेळ, सीएसडीएसचे संजीव कुमार यांनाही मागावी लागली माफी

    राजकारणात आकडेवारी ही सर्वात धारदार शस्त्र असते. पण तीच आकडेवारी चुकीची ठरली तर? काँग्रेस प्रवक्ते पवन खेऱा आणि सीएसडीएसचे संजय कुमार यांना या प्रश्नाचे उत्तर मिळाले. सहा महिन्यांत मतदार यादीत तब्बल ४० टक्के घटवाढ झाली असल्याचा त्यांचा दावा ४८ तासांत कोसळला आणि माफी मागण्याची वेळ आली.

    Read more

    ही पाहा काँग्रेसची कृतघ्नता; सर्वोच्च नेत्यांना वाचविण्याचे निर्णय देणाऱ्या न्यायमूर्तींना हरणाऱ्या निवडणुकीत केलंय उभा!!

    ही पहा काँग्रेसची कृतघ्नता; सर्वोच्च नेत्यांना वाचविण्याचे निर्णय देणाऱ्या न्यायमूर्तींना करणाऱ्या निवडणुकीत उभा केलंया!!, असं म्हणायची वेळ INDI आघाडीच्या उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवार निवडीवरून आली.

    Read more

    Sanjay Rathod : मुख्यमंत्री लवकरच शेतकरी कर्जमाफीची घोषणा करणार; कर्जमाफीवर मंत्रिमंडळात चर्चा सुरू, मंत्री संजय राठोड यांची माहिती

    राज्यात एकीकडे मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असताना, दुसरीकडे शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. याच पार्श्वभूमीवर, महायुती सरकारमधील मंत्री संजय राठोड यांनी शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच शेतकरी कर्जमाफीची घोषणा करतील, असे संकेत त्यांनी दिले आहेत. सोमवारी ते यवतमाळमधील पुसद येथे एका कार्यक्रमात बोलत होते.

    Read more

    राहुल गांधींचा घोटाळा, दुसऱ्या वरती विसंबला; कार्यभाग बुडाला!!

    राहुल गांधींचा घोटाळा, दुसऱ्या वरती विसंबला; कार्यभाग बुडाला!!, असे त्यांच्या बाबतीत अवघ्या काही दिवसांमध्ये दुसऱ्यांदा घडले.सावरकर अवमान प्रकरणात राहुल गांधींचे वकील मिलिंद पवार यांनी त्यांच्या जीवाला धोका असल्याचा अर्ज राहुल गांधींना किंवा त्यांच्या टीमला माहिती न देताच परस्पर पुण्याच्या कोर्टात सादर केला. त्यामुळे राहुल गांधींची पुरती गोची झाली. सगळीकडे बातम्या आल्यानंतर तो अर्ज मागे घेण्याची वेळ वकिलावर आली.

    Read more

    Semiconductor : द फोकस एक्सप्लेनर : गूढ आगीत जळून खाक झाले होते भारताचे सेमीकंडक्टरचे स्वप्न, 1989 मध्ये नेमके काय घडले?

    भारताला जगात तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात पुढे नेणारे एक मोठे स्वप्न १९८९ साली मोहाली येथे लागलेल्या एका आगीत जळून खाक झाले. मोहालीतील सेमीकंडक्टर कॉम्प्लेक्स लिमिटेड (SCL) हे देशातील पहिले चिप उत्पादन केंद्र होते. जगभरात त्या काळी ज्या काही देशांकडे अत्याधुनिक चिप बनवण्याची क्षमता होती, त्यामध्ये भारताचाही समावेश होत होता. परंतु ७ फेब्रुवारी १९८९ रोजी लागलेल्या आगीत हे संपूर्ण स्वप्न उद्ध्वस्त झाले.

    Read more

    Supreme Court : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत हेराफेरीची याचिका फेटाळली; हायकोर्टानंतर सुप्रीम कोर्टातूनही विरोधकांना दणका

    नोव्हेंबर 2024 मध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत गडबड झाली असल्याचा आरोप करत संपूर्ण विरोधी पक्ष रस्त्यावर उतरला आहे. मात्र, विरोधी पक्षाला या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने फटकारले आहे. ही तक्रार महाराष्ट्र उच्च न्यायालयानंतर आता सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीसाठी योग्य मानली नाही. जूनमध्ये उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरुद्ध याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयात अपील केले होते, जे सोमवारी फेटाळण्यात आले आहे.

    Read more

    Achyut Potdar : ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार यांचे निधन; वयाच्या 91व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, हिंदी चित्रपटांत गाजवल्या भूमिका

    मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार यांचे निधन झाले आहे. ते 91 वर्षांचे होते. ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने मराठी रंगभूमी, हिंदी सिने सृष्टी आणि मालिकांच्या जगतातील एक अत्यंत प्रगल्भ, अनुभवी व लोकप्रिय कलाकार हरपला आहे.

    Read more