मुंबईचे महापौर पद कायमचे हुकताच ठाकरेंच्या शिवसेना आणि काँग्रेसला दिसला “अन्याय”!!, पण नियम तर होताच काँग्रेस – राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळातलाच!!
मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र आले, तरी त्यांना बहुमत मिळाले नाही.
मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र आले, तरी त्यांना बहुमत मिळाले नाही.
भारतीय वायुसेना प्रमुख एअर चीफ मार्शल एपी सिंह यांनी आधुनिक युद्धात वायुसेनेच्या वाढत्या भूमिकेवर भर दिला आहे. त्यांनी सांगितले की, दहशतवादाविरुद्धची कारवाई असो किंवा संघर्ष क्षेत्रातील ऑपरेशन्स असोत, वायुसेनेने जलद आणि निर्णायक परिणाम दिले आहेत.
महाराष्ट्राने आशियातील सर्वात मोठा विकेंद्रित सौर ऊर्जा कार्यक्रम राबवून यशोगाथा रचली आहे, असे नमूद करून या वर्षाच्या अखेर पर्यंत १६ गिगा वॅट वीज सौर ऊर्जेच्या माध्यमातून उपलब्ध होईल
पश्चिम बंगालमध्ये विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) ची मुदत वाढवली जाऊ शकते. निवडणूक आयोग 14 जानेवारी रोजी प्रसिद्ध होणाऱ्या अंतिम मतदार यादीची तारीख वाढवण्याचा विचार करत आहे.
कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी बुधवारी विधानसभा आणि विधान परिषदेच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करण्यास नकार दिला आहे. हे अधिवेशन 22 जानेवारीपासून सुरू होईल आणि 31 जानेवारीपर्यंत चालेल.
जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्या मारेकऱ्याला न्यायालयाने बुधवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. 8 जुलै 2022 रोजी नारा शहरात निवडणूक प्रचारादरम्यान शिंजो आबे यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.
अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंस यांच्या पत्नी आणि सेकंड लेडी उषा वेंस चौथ्यांदा आई होणार आहेत. या जोडप्याने सांगितले आहे की उषा वेंस जुलैच्या अखेरीस एका मुलाला जन्म देतील.
भारत आपल्या अंतराळ सुरक्षा धोरणात मोठा बदल करत आहे. सरकार केवळ खाजगी उपग्रहांचा वापर करणार नाही, तर परदेशातील ग्राउंड सपोर्ट स्टेशन आणि स्वतःच्या उपग्रहांचे संरक्षण करण्यासाठी “बॉडीगार्ड उपग्रह” तयार करण्याची तयारीही करत आहे. उपग्रह-ते-उपग्रह थेट डेटा लिंक्स सारख्या प्रगत लष्करी अवकाश क्षमता देखील विकसित केल्या जात आहेत.
स्वित्झर्लंडमधील दावोस येथे सुरू असलेल्या ५६ व्या जागतिक आर्थिक परिषदेत दोन दिवसांत महाराष्ट्रात ३७ लाख २७ हजार ७८७ लाख कोटी रुपयांचे ८१ सामंजस्य करार झाले. यातून ४२ लाख रोजगार निर्माणहोणार असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील महिलांना डिसेंबरचा लाभ देण्यासाठी राज्य सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाने ३९३.२५ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास मान्यता दिली. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पात्र महिला लाभार्थींना डिसेंबर २०२५ चा लाभ मतदानापूर्वीच खात्यात जमा होणार आहे. तसेच तांत्रिक चुकांमुळे नोव्हेंबर-डिसेंबरपासून अडकलेले हप्तेही पडताळणीनंतर मिळणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी सोमवारी पोलंडला कठोर आणि स्पष्ट संदेश देत म्हटले की, दहशतवादाविरोधात शून्य सहनशीलता (झिरो टॉलरन्स) ठेवावी. भारताच्या शेजारी कोणत्याही प्रकारच्या दहशतवादी संरचनेला प्रोत्साहन देऊ नये.
स्वित्झर्लंडमध्ये वर्ल्ड ईकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक बैठकीच्या निमित्ताने करण्यात येणारा दावोस दौरा हा भारतात आणि पर्यायाने महाराष्ट्रात ज्ञान, तंत्रज्ञान आणि विदेशी गुंतवणूक मिळविण्यासाठीचा महत्वाचा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय कंपन्यांशीच दावोस मध्ये जाऊन करार केल्याचा आरोप शिवसेना आणि काँग्रेस या दोन पक्षांच्या नेत्यांनी केला होता. प्रत्यक्षात युरोप आणि अमेरिकेतल्या कंपन्यांशी महाराष्ट्राने तिथे करार केले.
केरळमध्ये लवकरच होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी महाराष्ट्रातले नेते आणि भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे यांच्याकडे केरळच्या प्रभारी पदाची जबाबदारी सोपविल्याच्या दुसऱ्या दिवशी केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी तिरुअनंतपुरम मध्ये जाऊन एक वेगळीच भाजप सूचना केली. त्यामुळे सत्ताधारी भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (NDA) वेगळीच राजकीय खळबळ माजली. अशी सूचना करून रामदास आठवले यांनी अशी सूचना करून कम्युनिस्टांना “गुगली” टाकली, की भाजपला “बाउन्सर” टाकला??, या विषयाची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली.
पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी दावा केला की, इस्लामच्या नावावर स्थापन झालेल्या पाकिस्तानचा खरा उद्देश पूर्ण होणार आहे. त्यांनी ही गोष्ट रविवारी लाहोरमध्ये पाकिस्तानी वृत्तपत्र ‘द न्यूज इंटरनॅशनल’शी बोलताना सांगितली.
कर्नाटक पोलिसांचे पोलीस महासंचालक (DGP) (नागरिक हक्क अंमलबजावणी) यांना निलंबित करण्यात आले आहे. सोमवार (19 जानेवारी) रोजी त्यांचा एक अश्लील व्हिडिओ समोर आला होता, त्यानंतर सरकारने त्यांच्यावर कारवाई केली आहे.
आसाममधील कोकराझार येथे बोडो समुदाय आणि आदिवासींमध्ये संघर्ष झाला. यानंतर दोन्ही समुदायांनी घरे आणि करिगाव पोलीस चौकीला आग लावली. जमावाने टायर जाळून करिगावजवळ राष्ट्रीय महामार्ग अडवला. कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती बिघडत असल्याचे पाहून प्रशासनाने रॅपिड ॲक्शन फोर्स तैनात केली आहे. खबरदारी म्हणून, पुढील आदेश येईपर्यंत या भागात इंटरनेटवरही बंदी घालण्यात आली आहे.
भारतीय स्त्रीशक्ती जागरणच्या वतीने नुकताच ‘सावित्री महिला जागृती मेळावा’ घेण्यात आला. नवीन मराठी शाळेच्या सभागृहात झालेल्या या मेळाव्यात प्रेरणादायी महिलांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सचिव सुनिती पारुंडेकर उपस्थित होत्या.
सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांवर कठोर टिप्पणी केली. न्यायालयाने म्हटले, ‘भटक्या कुत्र्यांच्या कोणत्याही हल्ल्यात दुखापत किंवा मृत्यू झाल्यास, नगरपालिकेसोबतच डॉग फीडर्सची जबाबदारीही निश्चित केली जाऊ शकते.’
अमेरिकेतील मिशिगन राज्यात बर्फाच्या वादळामुळे मोठा रस्ते अपघात झाला आहे. सोमवारी एका आंतरराज्यीय महामार्गावर 100 हून अधिक गाड्या एकमेकांवर आदळल्या. अनेक गाड्या रस्त्यावरून घसरल्या.
स्वित्झर्लंडमध्ये वर्ल्ड ईकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक बैठकीच्या निमित्ताने करण्यात येणारा दावोस दौरा हा भारतात आणि पर्यायाने महाराष्ट्रात ज्ञान, तंत्रज्ञान आणि विदेशी गुंतवणूक मिळविण्यासाठीचा महत्वाचा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले. दरम्यान, दुसऱ्या दिवशी तिसऱ्या मुंबईतील पहिले शहर म्हणून रायगड – पेण ग्रोथ सेंटरची घोषणा करण्यात आली.
केंद्र सरकारने जुना आयकर कायदा 1961 बदलून नवीन आयकर कायदा 2025 आणला आहे, जो 1 एप्रिल 2026 पासून लागू होईल. यामध्ये सर्वात मोठा बदल म्हणजे ‘असेसमेंट इयर’ आणि ‘प्रीव्हियस इयर’ ऐवजी ‘टॅक्स इयर’ वापरला जाईल.
तामिळनाडू विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान मंगळवारी सभागृहात पुन्हा एकदा हायव्होल्टेज ड्रामा घडला. राज्यपाल आर.एन. रवी यांनी पुन्हा एकदा राष्ट्रगीताचा अपमान झाल्याचा आरोप करत भाषण न देताच विधानसभेतून बाहेर पडले. गेल्या काही वर्षांप्रमाणे राज्यपालांनी सांगितले की, तामिळ गीतांनंतर राष्ट्रगीत वाजवले जावे. परंतु अध्यक्ष अप्पावू यांनी यासाठी नकार दिला.
उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांनी उपपंतप्रधान यांग सुंग-हो यांना पदावरून हटवले आहे. कोरियन वृत्तसंस्था KCNA नुसार, किम जोंग उन र्योंगसोंग मशीन कॉम्प्लेक्समध्ये सोमवारी औद्योगिक प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनासाठी पोहोचले होते.